Shashikant Shinde : म्हाडामध्ये रॅकेट कार्यरत, बिल्डर परस्पर घरं घेऊन बाहेर विकतात; आ. शशिकांत शिंदेंचा मोठा आरोप
Shashikant Shinde On MHADA : सगळ्याच खात्यातील अधिकारी खूप माजले आहेत. भ्रष्ट अधिकाऱ्यांवर सरकारचा अंकुश राहिला नाही असा आरोप शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी केला.

मुंबई : म्हाडामध्ये (MHADA) एक रॅकेट कार्यरत असून या ठिकाणी मोठा भ्रष्टाचार सुरू आहे. त्यामुळेच सर्वसामान्य नागरिकांचं मोठं नुकसान होत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना न्याय मिळत नाही. बिल्डर परस्पर घरं घेतात आणि ते जास्त किमतीने बाहेर विकत आहेत असा आरोप शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांनी केला. म्हाडातील या रॅकेटची, भ्रष्टाचाराची चौकशी करावी अशी मागणी त्यांनी विधान परिषदेत केली.
आमच्या अनेक सूचना आहेत, पण विरोधकांची केलेल्या सूचनांवर सत्ताधाऱ्यांनी किमान विचार करावा अशी अपेक्षा असते. दोन्ही सभागृहांना विरोधी पक्षनेता नाही असं पहिल्यांदच घडतंय असं आमदार शशिकांत शिंदे म्हणाले.
Shashikant Shinde Speech : गुन्ह्यांचं प्रमाण वाढलं
आमदार शशिकांत शिंदे म्हणाले की, "कर्ज माफी संदर्भात दिलेल्या आश्वासनाला सरकार न्याय देईल अशी अपेक्षा आम्ही व्यक्त करत आहोत. हे ट्रिपल इंजिन सरकार वेगाने पळतंय अशा जाहिराती केल्या जात आहेत. पण वस्तुस्थिती अशी काही नाही, उलट या सरकारच्या काळात क्राईम अधिक वेगवान झाल्याचं दिसतंय. या राज्यात अनेक मुली बेपत्ता होत आहेत, यावर सरकारने काय उत्तर दिलं ते बघा. जर मुलीसंदर्भात अशा घटना घडत असेल तर गृहखाते काय झोपलं होत का? व्यवस्थेमध्ये राजकीय हस्तक्षेप वाढलेला आहे, त्यामुळे क्राईम रेट फार वाढलेला आहे. ऑनलाईन गेम आणि इतर गुन्ह्यांवर काहीही कारवाई केली जात नाही, पण विरोधकांवर तात्काळ कारवाई होते."
Shashikant Shinde Vidhan Parishad : सत्तेची मस्ती म्हणून देशमुखांना जेलमध्ये टाकलं
अनिल देशमुख गृहमंत्री असताना त्यांच्यावर आरोप करण्यात आले होते. त्यांनी भ्रष्टाचार केला असा आरोप करत त्यावर चांदिवाल समिती नेमण्यात आली. पण त्या समितीचा अहवाल अजून का आला नाही? सत्तेच्या मस्तीमुळे तुम्ही त्याला जेलमध्ये टाकलं. 30 वर्षे काम केलेल्या प्रतिनिधीला अशी वागणूक दिली गेली. त्यांना क्लीचिट मिळाली अशा अनेक बातम्या वृत्तपत्रात येत आहेत. पण त्यानंतर चांदिवाल यांना पत्रकार परिषद घ्यायला भाग पाडलं. अनिल देशमुख हे स्वतः सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत.
संतोष देशमुख यांचा एक मारेकरी अजूनही फरार आहे, त्यांच्या आरोपींवर अद्यावर कारवाई झाली नाही हे सरकराचं अपयश आहे. एक वर्ष होऊनही जर आरोपी मिळत नसेल तर ते गृहखात्याचं अपयश आहे आणि ते तुम्ही मान्य करा असं शशिकांत शिंदे म्हणाले.
राज्यातील कोणत्याही खात्यातील अधिकारी असू द्यात, ते खूप माजले आहेत. ते मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करत आहेत, त्यावर मंत्र्यांनी अंकुश ठेवावा. जे अधिकारी व्यवस्थित काम करत नाहीत त्यांची दुसऱ्या कोणत्या तरी भागात बदली करा म्हणजे ते सरळ होऊन काम करतील.
ही बातमी वाचा:
























