एक्स्प्लोर
Advertisement
पवारांकडून मतदारसंघनिहाय चाचपणी, साताऱ्याचा उमेदवार ठरणार
उदयनराजे यांच्याबद्दल स्थानिक नेते काय मत व्यक्त करतात की दुसरा उमेदवार देण्याची मागणी करतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.
मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीवादीतर्फे मतदारसंघनिहाय आढावा बैठक होणार आहे. साताऱ्याचे खासदार उदयनराजे यांच्याविषयी काय निर्णय होणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
गेले काही दिवस सातारा मतदारसंघ चर्चेत आहे. साताऱ्याचे खासदार उदयनराजे यांच्याविरोधात पक्षात सूर आहे. बैठकीत उदयनराजे यांच्याबद्दल स्थानिक नेते काय मत व्यक्त करतात की दुसरा उमेदवार देण्याची मागणी करतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.
साताऱ्याला नवीन उमेदवाराबाबत चाचपणी सुरु असल्याची चर्चा काही दिवसांपूर्वी होती, मात्र शरद पवारांनी या बातम्यांचं खंडन केलं होतं. साताऱ्यातून माजी सनदी अधिकारी श्रीनिवास पाटील यांचं नाव चर्चेत आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत काय होतं, हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.
आज खालील मतदारसंघाचा होणार आढावा
कल्याण
ठाणे
यवतमाळ
अहमदनगर
उस्मानाबाद
माढा
सातारा
ईशान्य मुंबई
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
क्रीडा
क्रिकेट
राजकारण
Advertisement