एक्स्प्लोर
वसई-नालासोपाऱ्यातील सीरियल रेपिस्टच्या मुसक्या आवळल्या
नालासोपाऱ्यात 15 हून अधिक तरुणींवर रेहान कुरेशी या सिरीयल रेपिस्टनं बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. आतापर्यंत या रेपिस्टच्या विरोधात 11 तरुणींनी तक्रार दिलीय.
मुंबई : ठाणे, पालघर, नवी मुंबईत 15 हून अधिक तरुणींवर बलात्कार करणाऱ्या सीरियल रेपिस्टला नवी मुंबई पोलिसांनी अटक केलीय. रेहान कुरेशी असे या 34 वर्षीय नराधमाचे नाव आहे. नवी मुंबई, पालघर, ठाण्यासह 13 ठिकाणी कुरेशीवर बलात्काराच्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आलीय.
रेहान कुरेशी हा नराधम एका खासगी कंपनीत सेल्समनचं काम करायचा. काल सीसीटीव्ही फुटेजमध्ये नराधम दिसला होता, त्यानंतर त्याला संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आले. अखेर आज पोलिसांनी त्याच्यावर अटकेची कारवाई केली.
नालासोपाऱ्यात 15 हून अधिक तरुणींवर या सिरीयल रेपिस्टनं बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. आतापर्यंत या रेपिस्टच्या विरोधात 11 तरुणींनी तक्रार दिलीय. अजूनही भीतीपोटी अनेक तरुणींनी तक्रार दिली नसल्याची शक्यता आहे. त्यामुळे या सीरियल रेपिस्टने केलेल्या बलात्कारांची संख्या मोठी असण्याची शक्यता आहे.
नराधम ‘असा’ फसवायचा मुलींना
रेहान कुरेशी हा 9-14 वर्षे वयोगटातील लहान मुलींवर पाळत ठेवायचा. त्यानंतर घराचा अंदाज घेऊन दार ठोठावायचा. एखाद्या लहान मुलीने दरवाजा उघडला, की तो भावनिक जाळं फेकायचा. 'तुझ्या वडिलांनी तुला बोलावलं आहे' हे सभ्यपणे कारणासहित पटवून देण्यात हा माहीर होता. लहान मुलींना एखाद्या निर्मनुष्य ठिकाणी नेऊन जीवे मारण्याची धमकी देऊन बलात्कार करायचा.
नागरिक दहशतीत
ठाणे, पालघर, नवी मुंबईतील नागरिक दहशतीखाली होते. अल्पवयीन मुलींचा विनयभंग आणि बलात्कार करणारा सीरियल रेपिस्ट वसई, विरारमध्ये दाखल झाल्याची माहिती कळताच, इथले नागरिक हातात काठी घेऊन स्वतः पहारा देऊ लागले. आळीपाळीने टीम करून, ही मंडळी आपापल्य परिसरात पहारा देत होते. अनोळखी दिसणाऱ्या व्यक्तीची चौकशीही करत होते.
अखेर नवी मुंबई पोलिसांनी नराधम रेहान कुरेशी याला अटक केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
पर्सनल फायनान्स
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement