एक्स्प्लोर
मुंबई शेअर बाजाराचा ऐतिहासिक उच्चांक
दिवसाच्या सुरुवातीला 36 हजार 928 अंकांपासून शेअर बाजाराची सुरुवात झाली. त्यानंतर काही वेळातच सेन्सेक्सने 37 हजार 074.65 अंकांपर्यंत मजल मारली.

मुंबई : मुंबई शेअर बाजारानं आज ऐतिहासिक उच्चांक गाठला आहे. आज (गुरुवारी) मुंबई शेअर बाजारात सेन्सेक्सने 37 हजारांचा टप्पा पार केला. तर निफ्टीने 11 हजारांचा पल्ला गाठला आहे. शेअर बाजारात आज सकाळपासूनच मोठ्या तेजीत पाहायला मिळाला. दिवसाच्या सुरुवातीला 36 हजार 928 अंकांपासून शेअर बाजाराची सुरुवात झाली. त्यानंतर काही वेळातच सेन्सेक्सने 37 हजार 074.65 अंकांपर्यंत मजल मारली. तर निफ्टीमध्येही तेजी आली आहे. आज निफ्टी 11 हजार 172 अंकांवर पोहोचला. काल सेन्सेक्स 36 हजार 858 अंकांवर बंद झाला होता. बँकिंग, पब्लिक, ऑटो, हेल्थकेअर सेक्टर, इन्फ्रास्ट्रक्चर, पेट्रोलियम आणि गॅस कंपन्यांच्या समभागांमधील वाढीमुळे सेन्सेक्स या पातळीवर पोचला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
निवडणूक
व्यापार-उद्योग
निवडणूक






















