एक्स्प्लोर

Sanjay Raut: जावेद मियाँदादला मातोश्रीवर बिर्याणी खाऊ घातली म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना संजय राऊतांचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले....

Sanjay Raut: मियाँदाद मातोश्रीवर आल्यावर काय घडलं होतं, हे दिलीप वेंगसरकर यांना विचारावे, अशा शब्दांत राऊतांनी फडणवीसांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर दिले.

मुंबई: क्रिकेटमध्ये पाकिस्तानविरोधात खेळण्याबाबत सुरू असलेल्या वादाचा राजकीय वर्तुळात मोठा परिणाम दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू जावेद मियाँदाद मातोश्रीवर आल्याची आठवण करून शिवसेना (ठाकरे गट)वर टोला लगावला. त्यावरून आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी थेट पलटवार करत फडणवीसांना ‘अर्धवट ज्ञानी’ ठरवले. केवळ फडणवीसच नव्हे तर भाजपच्या नेत्यांकडेही ‘मेंदू नाही’, सगळं भाजप अर्धवट ज्ञानी असल्याचा घणाघात संजय राऊतांनी केला आहे. मियाँदाद मातोश्रीवर आल्यावर काय घडलं होतं, हे दिलीप वेंगसरकर यांना विचारावे, अशा शब्दांत राऊतांनी फडणवीसांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर दिले.

काय म्हणाले संजय राऊत?

संजय राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले, देवेंद्र फडणवीस हे अर्धवट ज्ञानी आहेत. मुळात भाजप हाच अर्धवट ज्ञानी आहे. त्यांच्या गुडघ्यात सुद्धा मेंदू नाही. काहीजणांच्या गुडघ्यात मेंदू असतो. तो भाजपच्या गुडघ्यात देखील नाही. त्यांनी मी तयार केलेला ठाकरे चित्रपट पाहायला पाहिजे. माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या त्या काळातल्या मुलाखती समजून घ्यायला पाहिजेत. जे पुस्तक आहे एकवचनी त्यात बाळासाहेब यांनी भूमिका स्पष्ट मांडल्या आहेत. क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर जावेद मिया यांना घेऊन मातोश्री वर आले. जावेद मिया तिथे का आले होते? तर ते बाळासाहेबांना विनंती करण्यासाठी आले होते की, भारत पाकिस्तान क्रिकेट मॅचला विरोध करू नका, पुन्हा मॅच सुरू करा. बाळासाहेबांनी त्यांना तोंडावर सांगितलं, दहशतवाद आणि क्रिकेट एकत्र चालणार नाही. जोपर्यंत पाकिस्तानचा काश्मीरमध्ये रक्तपात सुरू आहे, तो थांबत नाही तोपर्यंत मी भारत पाकिस्तान क्रिकेट मॅचला परवानगी देणार नाही.

रक्त आणि पाणी एकत्र चालणार नाही 

मिस्टर फडणवीस तुमच्या नरेंद्र मोदींसारखं त्यांनी शेपूट घातलं नाही, पाकिस्तानसमोर किंवा ट्रम्प समोर, असं म्हणत संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे. रक्त आणि पाणी एकत्र चालणार नाही बाळासाहेबांनी तोंडावर सांगितलं, चाय पियो और निकल जाओ,  त्या घरात तू पाहूणा म्हणून आला आहे, चहा घे आणि जा हे तुम्ही दिलीप वेंगसरकर यांना विचारू शकता असेही पुढे राऊतांनी म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस हे खरोखर राष्ट्रभक्त, हिंदुत्ववादी वगैरे असतील आणि महाराष्ट्रातील ज्या महिलांनी आपला कुंकू पुसलं, त्या कुंकवाची त्यांना कदर असेल तर ते अशी विधाने करणार नाहीत, असेही संजय राऊतानी संतापून म्हटल आहे.

संजय राऊत पुढे म्हणाले की तुम्ही आरशाची फॅक्टरी सुरु केली आहे. मात्र तुम्ही तुमच्या आरशामध्ये उघडे Xगडे दिसाल. तुम्ही फक्त एकच सांगा पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट खेळण्यासाठी तुमचा पाठिंबा आहे की नाही? पैशासाठी तुम्ही पाकड्यांसमोर शेपूट घातली, अशा शब्दात राऊत यांनी हल्लाबोल केला. 

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime News: विक्रोळीतील ज्या घरात वडील-मुलाचा दुर्दैवी अंत झाला, आता 'सील' केलेल्या त्याच घराला लागली भीषण आग; सिलिंडरचाही स्फोट, नेमकं काय घडलं?
विक्रोळीतील ज्या घरात वडील-मुलाचा दुर्दैवी अंत झाला, आता 'सील' केलेल्या त्याच घराला लागली भीषण आग; सिलिंडरचाही स्फोट, नेमकं काय घडलं?
Maratha Reservation Hearing: मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
BMC iPads News: मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांना मिळणार आयपॅड; कारभार कागदविरहित करण्यासाठी प्रशासनाची तयारी 
मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांना मिळणार आयपॅड; कारभार कागदविरहित करण्यासाठी प्रशासनाची तयारी 

व्हिडीओ

Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
Maratha Reservation Hearing: मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
शुभमन, अभिषेक, अर्शदीप राहिले मागे; SRH चा खेळाडू ठरला सर्वात महागडा; लिलावात सर्वाधिक पैशांची लागली बोली!
शुभमन, अभिषेक, अर्शदीप राहिले मागे; SRH चा खेळाडू ठरला सर्वात महागडा; लिलावात सर्वाधिक पैशांची लागली बोली!
Kalyan Stray Dog: चोरांचा नाही, तर चक्क 'भटक्या कुत्र्याचा' शोध घेतायेत पोलीस, नगरसेवकही मैदानात; नेमकं काय घडलं?
चोरांचा नाही, तर चक्क 'भटक्या कुत्र्याचा' शोध घेतायेत पोलीस, नगरसेवकही मैदानात; नेमकं काय घडलं?
IND vs SL Sarfaraz Khan : टीम इंडियात परतताच सरफराजने काय केलं? दोन फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल, चाहतेही भावूक
टीम इंडियात परतताच सरफराजने काय केलं? दोन फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल, चाहतेही भावूक
BMC iPads News: मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांना मिळणार आयपॅड; कारभार कागदविरहित करण्यासाठी प्रशासनाची तयारी 
मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांना मिळणार आयपॅड; कारभार कागदविरहित करण्यासाठी प्रशासनाची तयारी 
IND vs SL : शेवटच्या षटकात 3 चेंडू, 3 षटकार अन् भारताचा थरारक विजय; सिराजच्या बॅटमध्ये असं काय होतं? श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली, गंभीरलाही विश्वास बसेना, पाहा Video
शेवटच्या षटकात 3 चेंडू, 3 षटकार अन् भारताचा थरारक विजय; सिराजच्या बॅटमध्ये असं काय होतं? श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली, गंभीरलाही विश्वास बसेना, पाहा Video
Embed widget