Sanjay Raut Shivsena Dasara Melava 2023 live : भ्रष्टाचाऱ्यांना उलटे लटकवू असे अमित शहा म्हणतात, एकनाथ शिंदे हा सर्वात मोठा घोटाळा, लटकवा उलटा; संजय राऊतांचा हल्लाबोल
भ्रष्टाचाऱ्यांना उलटे लटकवू असे अमित शहा म्हणतात मग इकडे यांची पप्पी का घेता? खोके घेऊन जे शिवसेनेतून फुटले आहेत, 40 आमदारांना उलटे लटकवा आम्ही तुमचा सत्कार करू, अशा शब्दात राऊत यांनी हल्लाबोल केला.
![Sanjay Raut Shivsena Dasara Melava 2023 live : भ्रष्टाचाऱ्यांना उलटे लटकवू असे अमित शहा म्हणतात, एकनाथ शिंदे हा सर्वात मोठा घोटाळा, लटकवा उलटा; संजय राऊतांचा हल्लाबोल Sanjay Raut Shivsena Dasara Melava 2023 live Eknath Shinde is the biggest scam hang and reverse Sanjay Raut attacks on Amit Shah Sanjay Raut Shivsena Dasara Melava 2023 live : भ्रष्टाचाऱ्यांना उलटे लटकवू असे अमित शहा म्हणतात, एकनाथ शिंदे हा सर्वात मोठा घोटाळा, लटकवा उलटा; संजय राऊतांचा हल्लाबोल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/24/72a7fa28a6ba445e93075c5000ecd0621698158479262736_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Sanjay Raut Shivsena Dasara Melava 2023 live : छत्तीसगडला सरकार आले तर भ्रष्टाचाऱ्यांना उलटे लटकवू असे अमित शहा म्हणतात मग इकडे यांची पप्पी का घेता? खोके घेऊन जे शिवसेनेतून फुटले आहेत, 40 आमदारांना उलटे लटकवा आम्ही तुमचा सत्कार करू, अशा शब्दात संजय राऊत यांनी हल्लाबोल केला. संजय राऊत यांनी अजित पवारांवरही टीका केली. तुमच्या सरकारमध्ये असलेल्या अजित पवारांनी 70 हजारांचा घोटाळा केल्याचं मोदी सांगतात, मुश्रीफांनी साखर कारखान्यात घोटाळा केला आहे. एकनाथ शिंदे हा सर्वात मोठा घोटाळा, लटकवा त्याला उलटा, अशा शब्दात त्यांनी तोफ डागली.
संजय राऊत म्हणाले की, दुसऱ्या मेळाव्याकडे महाराष्ट्र ढुंकून पाहत नाही, तो म्हणजे चायनीज फटाका आहे. भाजपचा माज 2024 ला पूर्ण उतरून जाईल. सुषमा अंधारे म्हणाल्या मी गेल्या वर्षी नव्हतो, मी मोडलो, नाही खचलो नाही. बाळासाहेब यांनी घडवलेला हा निखारा आहे.
किसी भ्रष्टाचारी को नही छोडूगा मोदी म्हणतात आणि सगळ्यांना भाजपत घेतात
संजय राऊत यांनी भाजपवर कडाडून हल्लाबोल केला. ते म्हणाले की, हसन मुश्रीफ कोल्हापूरला म्हणाले, भाजप मला तुरंगात टाकायला निघाले होते, पण मी इकडे आलो आणि फाईल बंद झाली. किसी भ्रष्टाचारी को नही छोडूगा मोदी म्हणतात आणि सगळ्यांना भाजपमध्ये घेतात. येत्या निवडणुकीत पाच राज्यात भाजपचा दणाणून पराभव होणार आहे. छत्तीसगडला सरकार आले, तर भ्रष्टाचाऱ्यांना उलटे लटकवू असे अमित शाह म्हणतात मग इकडे यांची पप्पी का घेता? अशी विचारणा त्यांनी केली.
40 आमदारांना उलटे लटकवा आम्ही तुमचा सत्कार करू
खोके घेऊन जे शिवसेनेतून फुटले आहेत, 40 आमदारांना उलटे लटकवा आम्ही तुमचा सत्कार करू. तुमच्या सरकारमध्ये असलेल्या अजित पवारांनी 70 हजारांचा घोटाळा केल्याचं मोदी सांगतात. मुश्रीफ यांनी साखर कारखान्यात घोटाळा केला. एकनाथ शिंदे हा सर्वात मोठा घोटाळा आहे त्यांना उलटा लटकवा. दादा भुसे याने 178 कोटी रुपयांची फसवणूक केली. गिरणा साखर कारखान्यात 200 रुपये हडप केले, त्याला उलटे लटकवण्याएवजी मंत्री केले. आता नवीन घोटाळा समोर आला आहे. उदय सामंत यांनी कोकणात 100 कोटींचा डांबर घोटाळा केला आहे. वाघनखांचं आम्ही स्वागत करू, समोर बसलेली वाघनखे 2024 ला तुमचा कोथळा काढल्याशिवाय राहणार नाही, 40 भ्रष्टाचाऱ्यांना आम्ही उलटे लटकवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)