एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ram Mandir | राम मंदिर भूमिपूजनाच्या निमंत्रणावर संजय राऊत म्हणतात..
अयोध्येत 5 ऑगस्टला राममंदिर निर्माणाचं भूमीपूजन सोहळा होणार आहे. या कार्यक्रमाला शिवसेनेला अद्याप निमंत्रण देण्यात आलेले नाही. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भूमिका स्पष्ट केली.
मुंबई : काचेच्या घरात राहणाऱ्याने दुसऱ्याच्या घरावर दगड मारू नये, असा नियम आहे, असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधकांना लगावला. आज सांगितलं नाही तर मग बघू, हमाम मे सब नंगे होते है, कोणी कोणाकडे बोट दाखवू नये, राजकारणमध्ये सगळे काचेच्या घरात राहतात असे म्हणत माझा कोणवरती रोख नाहीये, असंही राऊत सांगायला विसरले नाहीत. येत्या 5 ऑगस्टला अयोध्येत राम मंदिराच्या निर्माणाचे भूमिपूजन होणार आहे, या समारंभाला अद्याप शिवसेनेला निमंत्रण दिलेले नाही, या पार्श्वभूमीवर राऊत बोलत होते.
गेली अनेक वर्षे देशाच्या राजकारणात गाजलेला मुद्दा निकालात निघाला असून अयोध्येत अखेर राम मंदिर बांधण्यात येणार आहे. 5 ऑगस्टला राम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. मात्र, या कार्यक्रमाला शिवसेनेला अद्याप निमंत्रण देण्यात आलेले नाही. या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी भूमिक स्पष्ट केलीय.
कारसेवकांची जी इच्छा, त्याप्रमाणे भव्य मंदीर साकारलं जात नाहीये : शिवसैनिक संतोष दुबे
अयोध्येत आसपास कोरोनाचा कहर, त्यामुळे.. : राऊत
अयोध्येत सध्या कोरोनाचा कहर आहे. मला वाटत तिथे कमीत कमी लोकांनी जावं आणि तो रखडलेला सोहळा पूर्ण करावा. पंतप्रधान जात आहेत हे महत्त्वाचं, मुख्यमंत्री तिथे केव्हाही जातील, असे राऊत म्हणाले. आम्हाला आनंद आहे, की आज मंदिर बनतंय. मंदिर निर्माणासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 1 कोटी रुपये निधी दिला आहे. पुढे ते म्हणाले, की आमचं योगदान इतिहासात आहे, लोक त्याला आठवतात, बाबरी नसती पडली तर मंदिर कसं बनलं असतं? भाजप, विश्व हिंदू परिषद, संघ यांनी मान्य बाबरी शिवसेनेने पाडली हे यापूर्वीचं मान्य केलंय.
पंतप्रधानांना शुभेच्छा : राऊत
राम मंदिर निर्माणाच्या भूमिपूजन कार्यक्रमात राजकारण आणू नका, हा मुहूर्त काढला होता. मेडीकल इमर्जन्सी आहे. आम्ही परत जाऊ त्यात काय? असेही राऊत यांनी स्पष्ट केले. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उमा भारती हे या कार्यक्रमाला नाहीयेत, मात्र, याला कारण आहे. दरम्यान, मुंबई पोलीस सुशांतसिंग प्रकरणात सक्षम आहेत. गृहमंत्री, मुख्यमंत्री, पोलीस आयुक्त याबाबत बोलतील, असेही राऊत यांनी सांगितले.
Ram Mandir | कारसेवकांची जी इच्छा, त्याप्रमाणे भव्य मंदीर साकारलं जात नाहीये : शिवसैनिक संतोष दुबे
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
राजकारण
राजकारण
मुंबई
Advertisement