एक्स्प्लोर

राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांचे संबंध अत्यंत मधुर, पिता-पुत्राप्रमाणेच : संजय राऊत

गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत सातत्याने राज्यपालांवर निशाणा साधत आहेत. त्यानंतर आज संजय राऊत राजभवनावर पोहोचल्याने सगळ्यांच्याच नजरा या भेटीकडे लागल्या होत्या.

मुंबई : "राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांचे संबंध मधुर आहेत. दोघांना एकमेकांविषयी आदर आणि आहे. दोघांचे संबंध पिता-पुत्रासारखे आहेत," अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली. संजय राऊत यांनी आज राजभवनात जाऊन महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली. जवळपास 20 मिनिटं या दोघांमध्ये चर्चा झाली. यानंतर ही केवळ सदिच्छा भेट असल्याचं संजय राऊत म्हणाले.

गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत सातत्याने राज्यपालांवर निशाणा साधत आहेत. त्यातच विरोधक आणि राज्यपालांच्या सतत होणाऱ्या भेटीवरुन 'राजभवन फालतू राजकारणाचा अड्डा बनू नये', अशी टीकाही त्यांनी केली होती. त्यानंतर आज संजय राऊत राजभवनावर पोहोचल्याने सगळ्यांच्याच नजरा या भेटीकडे लागल्या होत्या. परंतु ही सदिच्छा भेट असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं.

संजय राज्यपालांच्या भेटीविषयी संजय राऊत म्हणाले की, "राज्यपाल आमचे मार्गदर्शक आहेत. खूप दिवस त्यांना मी व्यक्तिश: भेटलो नव्हतो. ही केवळ सदिच्छा भेट होती. यापलिकडे काही नाही. राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांचे संबंध अत्यंत मधुर आहेत. दोघांना एकमेकांविषयी प्रेम आणि आदर आहे. मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांचे संबंध जसे पिता-पुत्राचे असावेत तसेच आहेत. दऱ्या वगैरे आमच्यात पडत नाही."

राज्यपाल अचानक प्रिय कसे झाले या प्रश्नावर उत्तर देताना संजय राऊत म्हणाले की, "राज्यपाल प्रियच असतात ते या राज्याचे पालक आहेत, घटनात्मक प्रमुख आहेत. विरोधक सतत इथे येतात त्यामुळे विरोधी पक्षनेत्याचं दालन किंवा बंगला राजभवन परिसरात असावं, असं अनेकांनी सांगितलं, याचा अर्थ ती राजभवनावर टीका होत नाही.

सरकारच्या कामाची इत्यंभूत माहिती राज्यपालांना आहे तसंच कोरोनाच्या संकटाशी सामना करण्यासाठी सरकार अपयशी ठरल्याची आरोप विरोधक सतत करत आहेत. याबाबत विरोक्षी पक्षाचे सातत्याने राज्यपालांची भेट घेत आहेत. याबाबत संजय राऊत म्हणाले की, "विरोधी पक्ष एका बेटावर आहे, त्यांना काही दिसत नाही. सरकार काय करतंय याची इत्यंभूत माहिती सरकार राज्यपालांना देत असतं आणि त्यांना माहित आहे."

विद्यापीठाचे कुलपती नात्याने राज्यपालांनी भूमिका व्यक्त केली विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षेविषयी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी युजीसीला पाठवलेल्या पत्राबाबत राज्यपालांनी आक्षेप घेतला. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली. याबाबत विचारलं असता संजय राऊत म्हणाले की, "उदय सामंत यांनी मत व्यक्त केलं, निर्णय घेतलेला नाही.राज्यपाल विद्यापीठाचे कुलपती आहेत, त्यांनी आपली भूमिका व्यक्त केली. त्याबाबत सरकार आणि संबंधित मंत्री निर्णय घेतील."

Sanjay Raut | राज्यपाल मुख्यमंत्री हे पिता-पुत्रासारखे; संजय राऊत यांची प्रतिक्रिया

महत्त्वाच्या बातम्या

पाऊस पडणार की नाही? 'या' 27 जिल्ह्यांसाठी पुढचे पाच दिवस अत्यंत महत्वाचे, मुंबईसह कोकण विदर्भ ते मराठवाडा कसं असणार हवामान? 
पाऊस पडणार की नाही? 'या' 27 जिल्ह्यांसाठी पुढचे पाच दिवस अत्यंत महत्वाचे, मुंबईसह कोकण विदर्भ ते मराठवाडा कसं असणार हवामान? 
मुंबई पालिकेतील मोकळ्या जागेत मद्याच्या बाटल्या, गटारी अमावास्येनंतर मुख्यालयातील धक्कादायक प्रकार समोर
मुंबई पालिकेतील मोकळ्या जागेत मद्याच्या बाटल्या, गटारी अमावास्येनंतर मुख्यालयातील धक्कादायक प्रकार समोर
Panjabrao Dakh On Maharashtra Weather Rain Updates: परतीचा पाऊस बॅकलॉग भरणार, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचीही चिंता मिटणार; ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाब डख यांचा अंदाज
परतीचा पाऊस बॅकलॉग भरणार, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचीही चिंता मिटणार; ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
Tardeo Non-Veg Bhavesh Kaware News: मांस-मच्छी खाणाऱ्याला घर नाकारणारा फ्लॅटमालक मराठी माणूसच, ताडदेव प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट
मांस-मच्छी खाणाऱ्याला घर नाकारणारा फ्लॅटमालक मराठी माणूसच, ताडदेव प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Embed widget