Sanjay Raut Bail : आम्ही लढणारे आहोत... लढत राहू; तुरुंगातून बाहेर आल्यानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
संजय राऊत (Sanjay Raut) यांना जामीन मंजूर झाल्यानंतर शिवसैनिकांमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे. संजय राऊत यांना जमीन मिळाल्यानंतर ठाकरे गटामध्ये नेत्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

Background
Sanjay Raut Bail : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयानं (Mumbai Session Court) मंजूर केला आहे. तब्बल 100 दिवसांनी संजय राऊतांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र ईडीनं (ED) कोर्टात जामीनाला स्थगिती देण्याची मागणी केली आहे. तसेच, या निकालाला हायकोर्टात आव्हान देण्याकरता आम्हाला संधी मिळायलाच हवी, असा युक्तिवाद ईडीच्या वतीनं करण्यात आला आहे.
सुषमा अंधारें यांची प्रतिक्रिया
पत्राचाळ गैरव्यवहाराप्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना अखेर 100 दिवसानंतर जामीन मंजूर झाला आहे. त्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरूवात झाली आहे. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी ट्विट करत न्यायलयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. 'टायगर इज बॅक' अशी प्रतिक्रिया दिली आहे.
कोर्टात काय-काय झालं?
मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएलए कोर्टात पत्रा चाळ घोटाळा प्रकरणी अटकेत असलेल्या प्रविण राऊत आणि संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयानं दोघांनाही जामीन मंजूर केला आहे. याप्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती देशपांडे यांच्यासमोर पार पडली. मात्र कोर्टाच्या निर्णयावर ईडीच्या वकिलांनी आक्षेप नोंदवला आहे. तसेच, या जामीनाला स्थगिती देण्याची मागणी केली आहे. हे छोटंमोठं प्रकरण नाही, मोठी नावं यात सहभागी आहेत. त्यामुळे या निकालाला हायकोर्टात आव्हान देण्याकरता आम्हाला संधी मिळायलाच हवी अशी मागणी ईडीच्या वकिलांनी केली आहे. या आठवड्याचे केवळ दोन कामकाजाचे दिवस बाकी आहे. त्यामुळे किमान या आठवड्याभराची स्थगिती द्यावी. जेणेकरून आम्ही या निकालाचा अभ्यासकरून येत्या आठवड्यात हायकोर्टात दाद मागू शकू, असा युक्तिवाद ईडीच्यावतीनं करण्यात आला आहे. दरम्यान, जामीनाबाबत आज दुपारी 3 वाजता न्यायालय निकाल देणार आहे.
Sanjay Raut Bail : संजय राऊत निष्ठावंत शिवसैनिक, त्यांच्यावरही दबावतंत्र वापरलं पण गद्दारी केली नाही : आदित्य ठाकरे
"संजय राऊत निष्ठावंत शिवसैनिक तर आहेतच पण बाळासाहेबांचे खरे शिवसैनिक आहेत. त्यांच्यावरही दबावतंत्र वापरलं पण गद्दारी केली नाही. ते डरपोक नाहीत हे लोकांसमोर आलं," अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी दिली. शिवसेनेचे बुलंद तोफ अशी ओळख असलेले खासदार संजय राऊत यांना अखेर जामीन मंजूर झाला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने मंजूर केला आहे.
अमरावतीत दहीहंडी सोहळा, महाप्रसाद घेण्यासाठी हजारोंची गर्दी उसळली
अमरावती जिल्ह्यातील कौंडण्यपूर येथे हजारो भाविकांनी दहीहंडी सोहळ्याला हजेरी लावली होती. यावेळी माजी मंत्री तथा आमदार यशोमती ठाकूर यांनी दहीहंडी सोहळ्यात उपस्थित लावली. यावेळी दहीहंडीतला महाप्रसाद घेण्यासाठी हजारोंची गर्दी उसळली होती. विदर्भाचे पंढरपूर म्हणून नावारूपास असलेले आई रुख्मिणीचे माहेर कौडण्यापूर हे पुरातन काळापासून पासून प्रचलित आहे. तसेच श्रीमत भागवत कथानात पण या कोंडण्यापूरचा उल्लेख आहे, वर्ष भर येथे रुख्मिणी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी राहते. पंढरपूरनंतर त्याचे प्रतिरूप असणारे कौडण्यापूरला म्हटले जाते.
Sanjay Raut : संजय राऊत तुरुंगाबाहेर, कार्यकर्त्यांना अभिवादन
शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे आर्थर रोड तुरुंगाबाहेर आले आहेत. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी हजारो कार्यकर्त्यांनी गर्दी केली असून संजय राऊत यांनी त्यांना अभिवादन केलं.























