एक्स्प्लोर

स्फोटक प्रकरणात अटक केलेले आमचे साधक नाहीत, 'सनातन'ने हात झटकले

ज्या ज्या प्रकरणात सनातनचं नाव गोवलं गेलं, त्या प्रकरणात आजपर्यंत कोणत्याही आरोपपत्रात सनातनचं नाव नाही, मग सनातन वर बंदीची मागणी का केली जातेय?, असा सवाल चेतन राजहंस यांनी उपस्थित केला.

मुंबई : नालासोपारा स्फोटक प्रकरणात वैभव राऊतसह नऊ जण पकडले गेले, ते सनातन संस्थेचे साधक नाहीत, असे सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस यांनी म्हटले. गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेभोवती संशयाचं वातावरण निर्माण होत असल्याने, सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस आणि हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र संघटक सुनिल घनवट यांनी पत्रकार परिषद घेऊन सनातनची बाजू मांडली. "वैभव राऊतसह नऊ जण जे पकडले गेले, ते सनातनचे साधक नाहीत. एटीएसचं म्हणणं आहे की, तपास पूर्ण नाही, कोणत्याही संघटनेचं नाव घेऊ शकत नाही. गृहखातंदेखील कोणत्याही संघटनेचं नाव घेत नाही, तरी सनातनचं नाव घेऊन आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जातंय", असे चेतन राजहंस यांनी म्हटले. ज्या ज्या प्रकरणात सनातनचं नाव गोवलं गेलं, त्या प्रकरणात आजपर्यंत कोणत्याही आरोपपत्रात सनातनचं नाव नाही, मग सनातन वर बंदीची मागणी का केली जातेय?, असा सवाल चेतन राजहंस यांनी उपस्थित केला. "महाराष्ट्रातील एक समाजवादी पक्षाचे आमदार आहेत, त्यांच्या म्हणण्यानुसार बकरी ईदला स्फोट करण्याचा हेतू होता, तर कुणी म्हणतं की, सनातनकडे स्वत:ची सेना आहे, हे सर्व कशाच्या आधारावर बोललं जातंय? ज्यांनी ज्यांनी जातीय विधानं केली आहेत, खासकरुन ज्यांनी मराठा आंदोलनाबाबत सनातनचं नाव घेऊन जातीय विधानं केलीत, त्यांची चौकशी व्हावी." असा आरोप चेनत राजहंस यांनी केला. सोशल मीडियावरुन जे सनातन संस्थेचं नाव घेऊन अपप्रचार करत आहेत, जातीय वक्तव्य करत आहेत, त्यांची चौकशी व्हावी, हे महाराष्ट्र सरकारला आमचं आवाहन आहे, असे चेतन राजहंस म्हणाले. तसेच, मीडियातले काही लोक अपप्रचाराला बळी पडतात आणि खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत, असा आरोपही त्यांनी केला. पत्रकार परिषदेचा व्हिडीओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget