एक्स्प्लोर
'समष्टी' पुरस्कार जाहीर, नारायण भोसले, डॉ. अजित नवले, शरद तांदळेंना पुरस्कार
आंबेडकरी चळवळीतील सर्व तरूण कवी, कलावंत, बुद्धिवादी कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन सुरू केलेल्या 'सारं काही समष्टीसाठी' या समष्टी फाऊंडेशनचे पुरस्कार जाहीर झाले असून एकुणच मानवी उत्थानाच्या व परिवर्तनाच्या चळवळीत भरीव योगदान देणाऱ्या कार्यकर्त्यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते.
मुंबई : आंबेडकरी चळवळीतील सर्व तरूण कवी, कलावंत, बुद्धिवादी कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन सुरू केलेल्या 'सारं काही समष्टीसाठी' या समष्टी फाऊंडेशनचे पुरस्कार जाहीर झाले असून एकुणच मानवी उत्थानाच्या व परिवर्तनाच्या चळवळीत भरीव योगदान देणाऱ्या कार्यकर्त्यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. या पुरस्काराचे हे सहावे वर्ष असून यावर्षी समष्टी फाऊंडेशन तर्फे एकुण तीन पुरस्कार दिले जाणार असून 'नामदेव ढसाळ समष्टी पुरस्कार 2020' डॉ. नारायण भोसले यांना, 'समष्टी उलगुलान पुरस्कार 2020' डॉ. अजित नवले यांना तर 'समष्टी गोलपीठा युवा पुरस्कार 2020' शरद तांदळे यांना जाहीर झाला आहे.
परंपरागत भीक मागण्याचा मार्ग नाकारून शिक्षणाच्या पायवाटेने कसरत करत नाथपंथी डवरी समाजातून पहिला पीएच. डी. धारक होण्याचा मान मिळवणारे, ख्यातनाम विचारवंत बुद्धीवादी प्रा. डॉ. नारायण भोसले यांचे काम निश्चितच मोठे आहे. तसेच भूमिहीन शेतकरी, आदिवासी कामगार वर्गाला संघटीत करून त्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी 21 व्या शतकातील सर्वात लक्षणीय असा लाँग मार्च काढून या सर्व वंचित घटकांना न्याय मिळवून देणारे डॉ. अजित नवले यांचे कार्य स्पृहणीय आहे. त्याचबरोबर लेखन आणि उद्योग क्षेत्रात भरीव कामगिरी करणारे, रावण या लोकप्रिय संशोधन कादंबरीचे लेखक शरद तांदळे हे प्रसिद्ध उद्योजकही आहेत.
प्रथम दोन पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम पंचवीस हजार व मानपत्र असे असून गोलपीठा युवा पुरस्काराची रक्कम पाच हजार रुपये व मानपत्र असे असेल. या पुरस्काराचे वितरण ' सारं काही समष्टीसाठी' या कार्यक्रमात होईल. सदर कार्यक्रम दि.14 आणि 15 मार्च रोजी विद्यानगरी, मराठी भाषा भवन, मुंबई विद्यापीठात आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमादरम्यान एकुण चार नाटके, 14 लघूपट, 3 चर्चासत्रे, कविता वाचन असा परिपूर्ण कार्यक्रम होणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नाशिक
महाराष्ट्र
पर्सनल फायनान्स
Advertisement