एक्स्प्लोर
यंदाचा समष्टी पुरस्कार दिग्दर्शक मारी सेल्वराज यांना, दोन दिवस रंगणार समष्टी सोहळा
‘सारं काही समष्टीसाठी 2019’ सोहळ्यात समष्टीच्या अभिव्यक्तीशी निगडीत कलाप्रकार सादर केले जाणार आहेत. त्यात सात नाटके, आठ शॉर्ट फिल्म, गीते कविता, चित्रकारिता तसेच शोषित वंचित प्रश्नांचे चर्चा सत्र ही सादर होणार आहे.

मुंबई : महाकवी नामदेव ढसाळ यांचे स्मरण करून ‘समष्टी फाऊंडेशन’ तर्फे ‘सारं काही समष्टीसाठी 2019’ चा सोहळा मुंबई विद्यापीठामध्ये आयोजित करण्यात आला आहे. ‘सारं काही समष्टीसाठी 2019’ चा सोहळा शनिवार, 23 फेब्रुवारी व रविवार, 24 फेब्रुवारी रोजी मुंबई विद्यापीठ, कलीना कँपस येथील मराठी भाषा भवन येथे आयोजित केला आहे. पुरस्कार सोहळा सायंकाळी 6 ते 9 वाजता आयोजित केला आहे. यंदा हा सोहळा ‘डॉ. आंबेडकर सेंटर फॉर सोशल जस्टीस’ आणि ‘अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्स’ आणि ‘समष्टी फाऊंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे. या वर्षी ‘सारं काही समष्टीसाठी 2019’ सोहळ्यात प्रसिद्ध निर्मात्या-दिग्दर्शिका किरण राव, अभिनेता मिलिंद शिंदे, अभिनेत्री अंजली पाटील, अभिनेता जितेंद्र जोशी, अभिनेता सुयश टिळक, अभिनेता ऋत्विक केंद्रे, अभिनेता विनोद गायकर, निर्माते नितीन वैद्य, विख्यात चित्रकार शशिकांत धोत्रे यांसह अनेक मान्यवर आणि समष्टीचे वाहक उपस्थित राहून समष्टीचा गजर करणार आहेत. यंदा दिले जाणारे पुरस्कार यंदा ‘सारं काही समष्टीसाठी 2019’ सोहळ्यामध्ये समष्टी पुरस्कार 2019, गोलपीठा पुरस्कार 2019 हे दोन पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. या वर्षीचा ‘समष्टी पुरस्कार’ शोषित वंचित आणि जात वास्तवावर आधारीत प्रश्न कादंबरी आणि सिनेमातून मांडणारे तामीळ सिनेमा लेखक, दिग्दर्शक मारी सेल्वराज यांना जाहीर झाला असून मानपत्र आणि रोख रक्कम 25,000 रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. याआधी हा पुरस्कार लोककवी लोकनाथ यशवंत, जगप्रसिध्द छायाचित्रकार पद्मश्री सुधारक ओलवे आणि लोकदिग्दर्शक नागराज मंजुळे यांना प्रदान केला आहे. पत्रकारितेच्या क्षेत्रात सातत्याने शोषित पिडीतांचा आवाज बनून कार्यरत असलेल्या ‘द वायर’च्या सुकन्या शांता यांना या वर्षीचा गोलपीठा पुरस्कार जाहीर झाला असून मानपत्र आणि रोख रक्कम पाच हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. गेल्या वर्षीपासून सुरू केलेला हा पुरस्कार समष्टीसाठी लढणाऱ्या नवयुवकांना देण्यात येतो. प्रथम पुरस्कार विद्रोही कवी सुदाम राठोड यांना दिला गेला होता. सोहळ्यामध्ये काय आहे? ‘सारं काही समष्टीसाठी 2019’ सोहळ्यात समष्टीच्या अभिव्यक्तीशी निगडीत कलाप्रकार सादर केले जाणार आहेत. त्यात सात नाटके, आठ शॉर्ट फिल्म, गीते कविता, चित्रकारिता तसेच शोषित वंचित प्रश्नांचे चर्चा सत्र ही सादर होणार आहे. सारं काही समष्टीसाठी सोहळा हा नामदेव ढसाळ स्मृती समिती द्वारा पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी साजरा केला जातो. यंदा ‘सारं काही समष्टीसाठी 2019’ सोहळा शनिवार 23 फेब्रुवारी, रविवार 24 फेब्रुवारी या दोन्ही दिवशी सकाळी 10.30 ते सायंकाळी 9.30 वेळेत मुंबई विद्यापीठातील मराठी भाषा भवन येथे होणार आहे. या
आणखी वाचा























