एक्स्प्लोर

Sakinaka Rape-Murder Case : साकीनाका प्रकरणी आरोपीवर दोष निश्चित, सरकारकडून फाशीची मागणी, आज शिक्षेवर निर्णय

Sakinaka Rape-Murder Case : मुंबई साकीनाका बलात्कार प्रकरणी (Sakinaka Rape Case) दिंडोशी सत्र न्यायालयानं आरोपीला दोषी ठरवलं आहे.

Sakinaka Rape-Murder Case : मुंबईतल्या अंधेरी (Andheri) येथील साकीनाका बलात्कार आणि हत्या प्रकरण (Sakinaka Rape-Murder Case) दुर्मिळातील दुर्मिळ असल्याचा दावा करून राज्य सरकारनं आरोपी मोहन चौहानला फाशीच्या शिक्षा देण्याची मागणी न्यायालयात केली आहे. या प्रकरणात आरोपीनं बलात्कारानंतर पीडितेवर केलेल्या निर्घृण हल्ल्यात ती गंभीररित्या जखमी झाली होती. त्यानंतर उपचारादरम्यान पीडितेचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात दिंडोशी सत्र न्यायालयानं (Dindoshi Sessions Court) आरोपी मोहन चौहानला दोषी ठरवलं आहे. त्याच्या शिक्षेसंदर्भात दिंडोशी न्यायालय आज निर्णय सुनावणार आहे. पीडितेच्या दोषीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी सर्वच स्तरांतून होताना दिसत आहे. 

गणेश चतुर्थीच्याच दिवशी मुंबईत घडलेल्या साकीनाका बलात्कार प्रकरणानं संपूर्ण मुंबई हादरली होती. याप्रकरणातील नराधम मोहन चौहानला पोलिसांनी काही तासांतच अटक केली. पीडितेला आणि तिच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी हा खटला जलदगतीनं चालविण्यात येईल, असं आश्वासन खुद्द मुख्यमंत्र्यानी जनतेला दिलं होतं. त्यानुसार मुंबई पोलिसांनी अवघ्या 18 दिवसांत या प्रकरणाचा तपास पूर्ण करत आपलं आरोपपत्र दिंडोशी सत्र न्यायालयात दाखल केलं होतं. 346 पानांच्या या आरोपपत्रातील माहितीनुसार, पीडित महिला ही आरोपीला आधीपासूनच ओळखत होती. गुन्हा घडला त्याच्या 25 दिवस आधीही आरोपीनं महिलेला भेटण्याचा आणि संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. पण तो यशस्वी होऊ शकला नाही. त्यामुळेच बऱ्याच कालावधीनंतर ती त्याला भेटली तेव्हा रागाच्या भरात नराधमानं तिच्यासोबत हे अमानुष कृत्य केलं. यात लोखंडी सळीचाही त्यानं वापर केल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. हे कृत्य पूर्वनियोजित नव्हते असा निष्कर्ष काढत पोलिसांनी हा तपास तातडीनं पूर्ण केला. या आरोपपत्रात एकूण 37 जणांचे जबाब नोंदवले असून अॅट्रॉसिटी, बलात्कार आणि हत्या प्रकरणात वैद्यकीय, भौतिक आणि रासायनिक असे सर्व पुरावे जमा करुन तपास पूर्ण करण्यात आल्याचं पोलिसांच्या या आरोपपत्रात नमूद करण्यात आलं आहे. त्याच आधारावर आरोपी मोहन चौहानला दोषी ठरवत असल्याचं सोमवारी मुंबईतील दिंडोशी सत्र न्यायालयाने स्पष्ट केले असून काल (1 जून 2022) मोहनच्या शिक्षेवर युक्तिवाद झाला.

घटना नेमकी काय? 

गेल्या वर्षी ऐन गणेशोत्सवात मुंबईतील साकीनाका परिसरात घडलेल्या या घटनेने संपूर्ण मुंबई हादरली होती. 10 सप्टेंबर 2021 च्या मध्यरात्री एक 32 वर्षीय महिला रस्त्यावर रक्तबंबाळ अवस्थेत जखमी आढळून आली. तिला राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असता तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याचं स्पष्ट झालं. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनंतरही 11 सप्टेंबर रोजी तिने आपले प्राण सोडले. या घटनेनंतर काही तासांच्या आतच मुंबई पोलिसांकडून आरोपी मोहन चौहानला अटक केली होती. मोहनवर भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांतर्गत बलात्कार, हत्या, अॅट्रॉसिटी, जाणीवपूर्वक गंभीर मारहाण यासह हत्यार कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला. अवघ्या 18 दिवसांत मुंबई पोलिसांकडून याप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या

बांधकामाच्या इमारतीवरुन पडून एका कामगाराचा मृत्यू, मुंबईच्या जोगेश्वरीत धक्कादायक घटना, खासदार रवींद्र वायकर आक्रमक
बांधकामाच्या इमारतीवरुन पडून एका कामगाराचा मृत्यू, मुंबईच्या जोगेश्वरीत धक्कादायक घटना, खासदार रवींद्र वायकर आक्रमक
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जुलै 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जुलै 2026 | शुक्रवार 
राज ठाकरेंना काय ढेकळं कळतात का? आता हलगी वाजवणारे झालेत; गुणरत्न सदावर्तेंची अमित ठाकरेंवरही टीका
राज ठाकरेंना काय ढेकळं कळतात का? आता हलगी वाजवणारे झालेत; गुणरत्न सदावर्तेंची अमित ठाकरेंवरही टीका
Maharashtra Weather Rain Updates: अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, राज्यात पुन्हा धो धो पाऊस कोसळणार; कोकणात पावसाला सुरुवात, मान्सूनची A टू Z माहिती
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, राज्यात पुन्हा धो धो पाऊस कोसळणार; कोकणात पावसाला सुरुवात, मान्सूनची A टू Z माहिती

व्हिडीओ

Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashadhi Wari : वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
RBI : रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
Sir Garry Sobers : क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
Rahul Gandhi: 10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
RBI चा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
MSRTC Fare Hike : एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली? जाणून घ्या
एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली?
Embed widget