Sachin Vaze | अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटक प्रकरणात सचिन वाझेंना 25 मार्चपर्यंत NIA कोठडी
काही दिवसांपूर्वी मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर एका स्कॉर्पिओ गाडीत स्फोटकं आढळली होती. याप्रकरणी सचिन वाझे यांना अटक करण्यात आली आहे. काल रात्री (13 मार्च) रात्री 11 वाजून 50 मिनिटांनी सचिन वाझे यांना अटक केल्याची माहिती एनआयएकडून देण्यात आली. अशातच आज त्यांना एनआयएकडून 25 तारखेपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.
मुंबई : काल रात्री (13 मार्च) पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आज त्यांना एनआयए कोर्टात हजर करण्यात आलं होतं. अशातच सचिन वाझेना 25 तारखेपर्यंत एनआयए कोठडी सुनावण्यात आली आहे. एकूण 14 दिवसांच्या कोठडीची एनआयएने कोठडी मागितली होती. मात्र एनआयए कोर्टानं केवळ दहा दिवस म्हणजेच, 25 तारखेपर्यंत सचिन वाझे यांनी एनआयए कोठडी सुनावली आहे.
काही दिवसांपूर्वी मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर एका स्कॉर्पिओ गाडीत स्फोटकं आढळली होती. याप्रकरणी सचिन वाझे यांना अटक करण्यात आली आहे. काल रात्री (13 मार्च) रात्री 11 वाजून 50 मिनिटांनी सचिन वाझे यांना अटक केल्याची माहिती एनआयएकडून देण्यात आली. अटकेपूर्वी तब्बल 13 तास सचिन वाझे यांची एनआयएकडून चौकशी करण्यात आली. अशातच आज त्यांना एनआयए कोर्टात हजर करण्यात आलं असून एनआयएकडून त्यांना 25 तारखेपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.
अटकेपूर्वी तब्बल 11 तास सचिन वाझेंची चौकशी
सचिन वाझे काल (13 मार्च) सकाळी 11 वाजताच एनआयएच्या कार्यालयात हजर झाले होते, तेव्हापासून त्यांची चौकशी सुरु होती. जवळपास 13 तासांच्या चौकशीअंती एनआयएने त्यांना अटक केली. आज (14 मार्च) सकाळी त्यांना एनआयए कोर्टात हजर करण्यात आलं. अखेर कोर्टानं त्यांना 25 मार्चपर्यंत एनआयए कोठडी सुनावली आहे.
'ती' इनोव्हा गाडी क्राईम इंटेलिजेन्स यूनिटची, सचिन वाझे आणि टीमकडून गाडीचा वापर
मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कार आढळल्याच्या प्रकरणाच्या तपासाला आता वेग आला आहे. एनआयएने पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक केली आणि अनेक गोष्टी हळूहळू उलगडू लागल्या आहेत. एनआयएने जी इनोव्हा गाडी काल रात्री ताब्यात घेतली तीच गाडी अँटिलियाजवळ दिसली होती. हीच गाडी पोलिस हेड ऑफिसमध्ये देखील दिसून आली होती. ही इनोव्हा गाडी CIU म्हणजे क्राईम इंटेलिजेन्स यूनिटची असल्याचं समोर आलं आहे. याच गाडीचा वापर सचिन वाझे आणि त्यांची टीम करत होती.
विशेष बाब म्हणजे घटनेनंतर या इनोव्हाला पोलिसांच्या मोटार ट्रान्सपोर्ट विभागात रिपेअरिंगसाठी पाठवलं होतं. म्हणजे एका उद्देशाने ही कार पोलिसांच्या मोटार ट्रान्सपोर्ट विभागात रिपेरिंगसाठी पाठवण्यात आली होती, जेणेकरुन ही गाडी कुणाच्या नजरेत येऊ नये. या सर्व गोष्टींचा खुलासा झाल्यानंतर अनेकांवर कारवाईचा फास आवळण्याची शक्यता आहे.
सचिन वाझेंवर कोणती कलमान्वये कारवाई?
मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर एका स्कॉर्पिओ गाडीत स्फोटकं आढळली होती. याप्रकरणी सचिन वाझे यांना अटक करण्यात आली आहे. NIA ने सचिन वाझे यांच्यावर आयपीसी कलम 286, 465, 473, 506(2), 120 B आणि स्फोटक पदार्थ कायदा 1908 कलम 4 अ, ब अंतर्गत कारवाई केली आहे. यामध्ये कलम 286- जाणीवपूर्वक किंवा अजाणतेपणाने स्फोटकं बाळगणे, इतरांच्या जीवाला धोका होईल असं वर्तन करणे, कलम 465 – खोट्या किंवा बनावट गोष्टी करणे, कलम 473 – दिशाभूल करण्यासाठी केल्या जाणाऱ्या बनावट कृती, कलम 506(2) – दहशत निर्माण करणं किंवा धमकी देणे, कलम 120 B – गुन्हेगारी स्वरुपाच्या षडयंत्रात सहभाग घेणे, स्फोटक पदार्थ कायदा 1908 कलम 4 अ, ब – स्फोटकं बाळगणे याचा समावेश आहे.
मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ सापडली
भारतातील श्रीमंत उद्योजक आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली जीप आढळल्याने खळबळ उडाली होती. मुंबईतील अँटिलिया या निवासस्थानाजवळ जिलेटिनचा साठा सापडला. मुंबई पोलीस, फॉरेन्सिक टीम, आणि श्वानपथकं घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरु आहे. या स्फोटकांसह एक चिठ्ठीही सापडली असून त्यामधून घातपाताची धमकी दिल्याचं समजतं. पोलीस आणि तपास यंत्रणांकडून सीसीटीव्ही फूटेज तपासण्याचं काम सुरु आहे. मुकेश अंबानी यांचं अँटिलिया हे निवासस्थान हे पेडर रोडवर आहे. हा उच्चभ्रू परिसर आहे. दरम्यान काल मध्यरात्री एक वाजता अँटिलियाजवळ ही स्कॉर्पिओ कार पार्क केल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फूटेजमधून समोर आलं होतं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Sachin Vaze | अटकपूर्व जामीन अर्जात एपीआय सचिन वाझे म्हणतात...
- एपीआय सचिन वाझेंकडून सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल
- Mansukh Hiren Death | मनसुख हिरेन यांची आत्महत्या नसून हत्याच; हिरेन कुटुंबियांचा आरोप
- ख्वाजा युनूसच्या मृत्यूनंतर एन्काऊंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे यांचं आयुष्यचं बदलून गेलं..