(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sachin Vaze : सचिन वाझेंना 7 एप्रिलपर्यंत NIA कोठडी
मनसुख हिरण (Mansukh Hiran ) मृत्यू प्रकरणी अटकेत असलेल्या एपीआय सचिन वाझेंना (Sachin vaze)7 एप्रिलपर्यंत एनआयए कोठडी सुनावण्यात आली आहे. आज पोलिस कोठडी संपल्यानंतर आज सचिन वाझे एनआयए कोर्टापुढे हजर झाले
मुंबई : मनसुख हिरण (Mansukh Hiran ) मृत्यू प्रकरणी अटकेत असलेल्या एपीआय सचिन वाझेंना 7 एप्रिलपर्यंत एनआयए कोठडी सुनावण्यात आली आहे. आज पोलिस कोठडी संपल्यानंतर आज सचिन वाझे एनआयए कोर्टापुढे हजर झाले. सचिन वाझेंना हदय रोगाचा आजार असल्याचं त्यांच्या वतीनं सांगण्यात आलं. रविवारी स्ट्रोक आल्याची कोर्टाला त्यांनी स्वत:हून माहिती दिली. यावर वाझेंना योग्य ते उपचार मिळत आहेत, असा दावा एनआयएनं केला. ताब्यात घेतल्यापासून दोनदा 2D eco, ब्लड टेस्ट करण्यात आल्याची माहिती कोर्टाला NIAनं दिली. त्यावर केवळ 2D eco पुरेसं नाही, अँजिओग्राफीची गरज असल्याचा दावा वाझेंच्या वकिलांनी केला.
NIA नं वाझेंची 6 दिवस कोठडी वाढवून मागितली. NIA च्या वतीनं एएसजी अनिल सिंह यांनी युक्तीवाद केला. मिठी नदीतून कंप्युटर, लॅपटॉप, हार्डडिस्क इ. साहित्य हाती लागलं. DCB बँक वर्सोवा शाखेत एका व्यक्तीसोबत वाझेंचं जॉईंट अकाऊंट आहे. सोबत एक लॉकरही आहे. वाझेंची अटक होताच त्या अकाऊंटमधले 26 लाख रूपये काढण्यात आले. आत त्यात केवळ 5 हजार शिल्लक आहे. लॉकरही ऑपरेट झाला, त्यात आता केवळ काही बिनकामाची कागदपत्र ठेवलेली आहेत. एका अनोखळा व्यक्तीचा पासपोर्टही वाझेंच्या घरी सापडला आहे.कुणी आपला ओरिजनल पोसपोर्ट दुसऱ्याकडे देतो का?, त्यामुळे त्यादृष्टीनंही तपास होणं आवश्यक आहे, असा एनआयएच्या वतीनं विशेष कोर्टात युक्तिवाद करण्यात आला.
सचिन वाझेंच्यावतीनं वकील आभात पोंडा यांनी युक्तिवाद केला. मिठीत सापडलेलं सारं साहित्य म्हणजे एनआयएचा निव्वळ बनाव आहे. DCB बँकेतील जॉईंट अकाऊंटचा आरोपही वाझेंच्यावतीनं नाकारण्यात आला. यावर सचिन वाझेंवर लावलेल्या आरोपांशी संबंधित 120 TB चं सीसीटिव्ही फुटेज हस्तगत करण्यात आलं आहे, अशी माहिती एनआयएनं दिली. गेल्या काही दिवसांत तो कुठे गेला?, कुणाला भेटला?, का भेटला?, स्फोटकांचं सामन कसं गोळा केलं?, मिठी नदीतून सापडेलेल्या गोष्टींतून डेटा रिकव्हर करायचा आहे, असं एनआयएनं कोर्टात सांगितलं