एक्स्प्लोर
Advertisement
रिझर्व्ह बँक मुद्रा संग्रहालयात सातवाहन कालीन नाण्यांचं प्रदर्शन
मुंबईतील रिझर्व्ह बँक मुद्रा संग्रहालयात सातवाहन काळातील नाण्यांचं प्रदर्शन भरवण्यात आलं आहे.
मुंबई : मुंबईतील रिझर्व्ह बँक मुद्रा संग्रहालयात अनोख्या नाण्यांचं प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. हे प्रदर्शन आहे सातवाहन काळातील नाण्यांचं. भारतात उत्खननावेळी मिळालेली सातवाहन काळातील एकूण 102 नाणी आणि त्यांचा इतिहास आपल्याला या प्रदर्शनात पाहता येईल.
इसवीसन पूर्व काळापासून इसवी सन तिसऱ्या शतकापर्यंत सातवाहन साम्राज्य भारताच्या वेगवेगळ्या भागात पसरलं होतं. यावेळीच प्रथम नाण्यांचा वापर चलनासाठी केला जाऊ लागला. त्यामुळे या काळातील चलनात वापरले गेलेली शिसे, तांबे, चांदी आणि इतर धातूंची नाणी पाहायला मिळतात.
पाहा आणखी फोटो
सातवाहन साम्राज्य हे भारतातील मध्यप्रदेश, गुजरात, तेलगंणा, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र या भागात पसरलेले होते. उत्खननावेळी महाराष्ट्रातील नाशिक, जुन्नर, पैठण या भागात ही नाणी सापडली.
या नाण्यांवर त्या काळातील राजांचे चित्र, प्राचीन प्रादेशिक भाषा पाहायला मिळतात. त्यामुळे या नाण्यांचा इतिहास समजून घेण्यासाठी हे प्रदर्शन पुढील दोन महिने आपल्याला या मुद्रा संग्रलयात पाहायला मिळणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement