एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

पाडणं सोडून द्या, आधी सरकार चालवून तर दाखवा : देवेंद्र फडणवीस

सामनातील मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला सरकार पाडण्याचं आव्हान दिलं होतं. याला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहेत. सरकार पाडण्यात आम्हाला इंटरेस्ट नाही, तुम्ही सरकार चालवून तर दाखवा, असं फडणवीस म्हणाले.

मुंबई : "माझी मुलाखत सुरु असताना सरकार पाडा," असं आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'सामना'तील मुलाखतीमध्ये भाजपला दिलं होतं. त्यावर आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. "वारंवार म्हटलं जातं की आमचं सरकार पाडून दाखवा. आधी सरकार चालवून दाखवा. पाडणं सोडून द्या, आम्हाला इंटरेस्ट नाही. माझं तुम्हाला आव्हान आहे की सरकार चालवून तर दाखवा, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

भाजप प्रदेश राज्यकार्यकारिणीची आज बैठक झाली. या बैठकीत देवेंद्र फडणवीस बोलत होते. या बैठकी फडणवीस यांच्यासह प्रवीण दरेकर, आमदार आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा, रवींद्र चव्हाण, चित्रा वाघ मुंबईच्या वसंत स्मृती कार्यालयातून बैठकीला उपस्थित होते. तसेच कार्यकारिणीत विशेष निमंत्रित सदस्य विनोद तावडेही मंचावर उपस्थित होते. याशिवाय राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा दिल्लीतून आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील कोल्हापुरातून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभागी झाले होते.

उद्धव ठाकरे यांचं आव्हान "ही जण ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये सरकार पडणार असं म्हणत आहेत. माझी मुलाखत सुरु असताना सरकार पाडा. काही जणांना घडवण्यात आनंद असतो, काही जणांना बिघडवण्यात. बिघडवायचं असेल तर बिघडवा. या सरकारचं भवितव्य विरोधी पक्षनेत्यावर अवलंबून नाही," असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'सामना'ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं.

देवेंद्र फडणवीस यांचं उत्तर उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं. ते म्हणाले की, "वारंवार म्हटलं जातं की आमचं सरकार पाडून दाखवा. आधी सरकार चालवून दाखवा. पाडणं सोडून द्या, आम्हाला इंटरेस्ट नाही. माझं तुम्हाला आव्हान आहे की सरकार चालवून तर दाखवा. तुमचं सरकार एवढ्या अंतर्विरोधाने भरलेलं आहे की आम्हाला पाडायची आवश्यकता नाही. एकमेकांच्या तंगड्या तोडायला तुम्हीच सज्ज व्हाल आणि तेच तुम्ही रोज करता. अंतर्विरोधानेच एक दिवस तुमचं सरकार कोसळणार आहे. आम्ही तोपर्यंत वाट पाहायला तयार आहोत. त्यानंतर महाराष्ट्राचं भवितव्य काय आहे हे आम्ही निश्चितपणे ठरवू."

कुठे जायचं हे चालक ठरवत नाही, प्रवासी ठरवतात! महाविकास आघाडीचं सरकार हे तीनचाकी सरकार असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातो. राज्यात तीन चाकी सरकार असलं तरी या सरकारचं स्टिअरिंग माझ्याच हातात आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. यावर देवेंद्र फडणवीस यांनी शेरेबाजी केली आहे. ते म्हणाले की, "ऑटो रिक्षाचे स्टेअरिंग उद्धवजी यांच्या हातात आहे हे खरं आहे. पण ते एक गोष्ट विसरले की रिक्षा कुठे जाईल हे चालक ठरवत नाही तर त्यामध्ये बसलेले प्रवासी ठरवतात. प्रवाशांनी ठरवलेल्या ठिकाणी रिक्षा गेली नाही तर चालकाला रोजगारही मिळत नाही. या रिक्षात बसलेल्या प्रवाशांचंही समजत नाही, एक जण उत्तरेकडे जा म्हणतो, दुसरा दक्षिणेकडे चला म्हणतो. मध्येच कोणीतरी ब्रेक मारतं, कोणीतरी हॉर्न वाजवतं. त्या रिक्षाची परिस्थिती अशी झालीय की नेमकं कुठल्या दिशेला आणि कोण घेऊन चाललंय हे ठरवता येत नाही. यामुळे नुकसान जनतेचं होतं."

राज्यात कोरोनाची टेस्टिंग कमी राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीवरुनही देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर टीका केली आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. राज्यात टेस्टिंग होत नाही. यामुळे मृत्यूदर आटोक्यात येत नाही. मुंबईत 15 ते 30 हजार टेस्टिंग केलं तर महिन्याभरात परिस्थिती नियंत्रणात येईल याचा मला विश्वास आहे, असं फडणवीस म्हणाले. तसंच पुण्यात टेस्टिंग वाढल्यामुळे रुग्ण वाढले तरी याचा फायदा पुण्याला होणार आहे. पण पुण्यावर अन्याय होत आहे. आरोग्य व्यवस्था उभारण्यासाठी एक पैसा अनुदान पुणे, पिंपरी-चिंचवडला दिलेला नाही, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, "एमएमआर परिसरात संकट मोठं आहे. आम्ही 25 कोविड सेंटरला भेटी दिल्या. आज अवस्था अतिशय वाईट आहे. क्वॉरन्टाईनमध्ये महिला सुरक्षित नाहीत. महिलांसादर्भात राज्य सरकारने SOP तयार करावी ही आमची मागणी आहे. सरकारने लपवालपवी थांबवावी. संकट गंभीर आहे. आम्ही सरकारसोबत आहोत."

संबंधित बातम्या

'माझी मुलाखत चालू असताना सरकार पाडा', मुख्यमंत्री ठाकरेंचं आव्हान

सरकार तीन चाकी असलं तरी स्टिअरिंग माझ्याच हाती : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Meeting Ajit Pawar : देवेंद्र फडणीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार, अमित शाहांच्या बैठकीत काय ठरलं?Zero Hour : राज्यावर 7.11 लाख कोटींचं कर्ज, सरकार आव्हानं कसं पेलणार?Zero Hour : आई राज्यसभेत, भाऊ-बहीण लोकसभेत, संपूर्ण गांधी कुटुंब संसदेतZero Hour : आरक्षण, बेरोजगारी,कर्ज, नव्या सरकारसमोर आव्हानांचा डोंगर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
Embed widget