एक्स्प्लोर
अवैध बाटलीबंद पाणी विकणाऱ्या 22 जणांना मुंबईत अटक
पिण्याच्या पाण्याचा गैरव्यवहार करणाऱ्या व्यक्तींवर अंकुश ठेवण्यासाठी आरपीएफने देशभरातील सर्व रेल्वे स्थानकांवर एक मोहीम राबवली आहे. या मोहिमेला ऑपरेशन थर्स्ट (operation thirst) हे नाव देण्यात आलं आहे.
मुंबई : बाटलीबंद पाणी विकण्याचा परवाना नसलेल्या विक्रेत्यांवर रेल्वे पोलिसांनी कारवाई सुरु केली आहे. देशभरातील रेल्वे स्थानकांवर उघडपणे अवैध बाटलीबंद पाण्याचा व्यापार होत आहे. मुंबईत 22 जणांना आरपीएफने अटक केली.
खिसे भरण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा गैरव्यवहार करणाऱ्या व्यक्तींवर अंकुश ठेवण्यासाठी आरपीएफने देशभरातील सर्व रेल्वे स्थानकांवर एक मोहीम राबवली आहे. या मोहिमेला ऑपरेशन थर्स्ट (operation thirst) हे नाव देण्यात आलं आहे. या मोहिमेअंतर्गत बाटलीबंद पाणी विकण्याचा परवाना नसलेल्या विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून पाण्याच्या बाटल्याही जप्त करण्यात आल्या आहेत.
काही ठिकाणी जुन्या बाटल्यांमध्ये पाणी भरुन, ते सील करुन विकल्या जात असल्याच्या तक्रारी आरपीएफला मिळाल्या होत्या. आरपीएफने वेगवेगळ्या टीम बनवून रेल्वे स्टेशनवर चालत असलेल्या अवैध पाणी विक्रेत्यांवर धाडी घातल्या. पाण्याची गुणवत्ता तपासण्यासाठी जप्त केलेल्या पाण्याचे नमुने पाठवण्यात आले आहेत. हे पाणी पिण्यायोग्य आहे की नाही, याची तपासणी केली जाणार आहे.
देशभरात 800 जणांना अवैधरित्या पाणी विकण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली असून रेल्वे अॅक्ट 144 आणि 153 च्या अंतर्गत 732 केसची नोंद केली आहे. अटक केलेल्या आरोपींकडून 48 हजार 860 अवैध पाण्याच्या बाटल्या मिळाल्या आहेत.
रेल्वेमध्ये रेल्वे अधिकृत पाण्याची बाटली विकण्याचीच परवानगी आहे. जर ते पाणी कमी पडलं, तर चांगल्या ब्रँडच्या कंपन्यांना रेल्वे पाणी विकण्याची परवानगी देते. पण काही विक्रेते स्थानिक ब्रँडच्या नावे पाणी विकून प्रवाशांच्या आरोग्याशी खेळत होते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
राजकारण
राजकारण
क्राईम
Advertisement