एक्स्प्लोर
रोहित शर्माचा नवा अवतार

मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा ओपनिंग बॅट्समन रोहित शर्मा ' हायपर टायगर्स ' या डिजिटल कॉमिक बुकमध्ये एका नव्या अवतारात दिसणार आहे. क्रिकेट जगतापासून काहीकाळ वेळ काढून, आपला छंद जोपासला असल्याचे रोहितने या मालिकेतील कॉमिक बुकच्या प्रकाशनावेळी बोलताना सांगितले.
या कॉमिक बुकच्या माध्यमातून चित्रपट क्षेत्रात पदार्पणाची कोणती इच्छा नसल्याचेही, त्याने यावेळी बोलताना स्पष्ट केले. ग्राफिक इंडिया, ब्रिटेनची आयएसएम कॉमिक्स आणि कोर्नोस्टोन स्पोर्टस यांच्या सहयोगाने या कॉमिक बुकची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच या पुस्तकाच्या माध्यमातून चाहत्यांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल, असेही तो यावेळी म्हणाला.
हायपर टायगर्समध्ये जे संघ आपले गाव आणि पर्यावरण रक्षणासाठी खेळतात अशा क्रिकेट जगतातील सर्वोत्कृष्ट संघांचा समावेश करण्यात आला आहे. "जर तुम्हाला तुमच्या मुलांच्या भविष्याची काळजी असेल, तर पर्यावरण रक्षणासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा," असे आवाहन त्याने यावेळी केले.
हायपर टायगर्स इ-कॉमिक बुक गुरूवारपासून डेलीहंटवर उपलब्ध असून, पहिल्या दोन आठवड्यांसाठी ते वाचकांना मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहे. यानंतर वाचकांना या पुस्तकाच्या प्रत्येक पेजसाठी 10 रू खर्च करावे लागणार आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
करमणूक
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
