एक्स्प्लोर

Reliance on Coronavirus : रिलायन्स फाऊंडेशनचा पुढाकार, मुंबईत 775 बेडस् नवे उपलब्ध, सर्व सुविधाही पुरवणार

रिलायन्स फाऊंडेशनकडून मुंबईत 875 बेडस् नवे उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. एच एन रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलमध्ये 600, वरळतील एनएससीआय मध्ये 100, सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये 45 आयसीयुसह 125 बेडस् तर ट्रायडंट, बिकेसी येथे 100 बेडस् ची नव्यानं उपलब्धता करुन देण्यात आली आहे.

मुंबई : देशभरात कोरोनाचा प्रकोप वाढत चालला आहे. यात महाराष्ट्रात आणि खासकरुन मुंबईत कोरोनानं थैमान घातलं आहे. अशात कोविड पेशंटला बेडसह ऑक्सिजन, औषधांचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवू लागला आहे. अशात अनेक सामाजिक संस्था मदतीसाठी पुढं येऊ लागल्या आहेत. रिलायन्स फाऊंडेशनकडून मुंबईत 875 बेडस् नवे उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. एच एन रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलमध्ये 600, वरळतील एनएससीआय मध्ये 100,  सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये 45 आयसीयुसह 125 बेडस् तर ट्रायडंट, बिकेसी येथे 100 बेडस् ची नव्यानं उपलब्धता करुन देण्यात आली आहे. 
 
माहितीनुसार, वरळीच्या नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडियामध्ये कोविड रुग्णांसाठी असलेली 650 बेड्सची सुविधा रिलायन्स फाउंडेशनच्या वतीने चालवण्यात येणार आहे. सर एच. एन. रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालय कोरोना रुग्णांसाठींच्या एकूण 650 खाटांचे परिचलन व व्यवस्थापन करेल. याशिवाय  अधिकच्या 100 ICU बेड्सची सुविधा निर्माण करण्यात येणार आहे. 15 मेपासून हे बेड्सच उपलब्ध होतील, अशी माहिती आहे. रिलायंस फाऊंडेशनकडून 500 हून अधिक वैद्यकीय फ्रंटलायनर्स यामध्ये डॉक्टर, नर्स, नॉन मेडिकल स्टाफ यांना सुविधांच्या देखभालीसाठी नेमण्यात आलं आहे. ICU बेड, क्वारंटाइन वॉर्ड, व्हेंटिलेटर्स, सगळ्या आरोग्य सुविधांची जबाबदारी रिलायन्स फाउंडेशन करणार आहे.

गेल्या वर्षीसुद्धा फाउंडेशनच्या वतीने मुंबई महापालिकेला सहकार्य म्हणून सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये कोविड रुग्णांसाठी खास 225 बेड्सची व्यवस्था करण्यात आली होती. यामध्ये 100 बेड्स आणि 20 ICU बेड्सची जबाबदारी उचलली होती. यावर्षीही सेव्हन हिल्स हॉस्पिटल आणि NSCI इथल्या कोविड सेंटरमधल्या सर्व कोविड रुग्णांना रिलायन्सच्या वतीने मोफत उपचार देण्यात येणार आहेत, अशी माहिती फाऊंडेशनकडून देण्यात आली आहे. एनएससीआय आणि सेव्हन हिल्स रुग्णालयातील सर्व कोरोना रुग्णांवर पूर्णपणे मोफत उपचार केले जातील.

वांद्रे-कुर्ला कॅम्प्लेक्स (बीकेसी) येथील द ट्रायडंट हॅटेलमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार किरकोळ लक्षणे असलेल्या तसेच लक्षणे नसलेल्या रुग्णांसाठी 100 खाटांची सुविधा आहे. ही सुविधेचे व्यवस्थापन आता सर एच. एन. रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालय करेल. एनएससीआय, सेव्हन हिल्स रुग्णालय आणि बीकेसी येथील द ट्रायडंट येथील अतिदक्षता विभागातील 145 खाटांसह आता सर्व मिळून 875 खाटांचे व्यवस्थापन रिलायन्स फाऊंडेशनमार्फत होईल, अशी माहिती देण्यात आली आहे.

रिलायन्स फाउंडेशनच्या संस्थापक आणि अध्यक्ष नीता अंबानी म्हणाल्या की, कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी  रिलायन्स फाउंडेशन कटिबद्ध आहे. आमचे डॉक्टर आणि फ्रंटलाइन वर्कर्स अहोरात्र राबून सेवा पुरवत आहेत. आम्ही सर्वोत्तम वैद्यकीय सेवा पुरवून जीव वाचवण्याचं काम असंच करत राहू. मुंबईतल्या 875 कोविड बेड्सची व्यवस्था आम्ही पाहात आहोत. याशिवाय महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्ये प्रदेश आणि दमण दीव, नगर हवेली इथे दररोज 700 MT इतका ऑक्सिजनचा पुरवठा फाउंडेशनच्या वतीने मोफत देण्यात येत आहेत. या संकटकाळात देशवासीय म्हणून जेवढं शक्य आहे ते आम्ही करत आहोत, असं नीता अंबानी यांनी म्हटलं आहे.

मुंबईतील कोरोना रुग्णाच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर रिलायन्स फाऊंडेशनने (आरएफ) शहरातील कोविड व्यवस्थापनाची गरज लक्षात घेत तसेच वैश्विक साथीविरुद्ध लढणाऱया शासनाला साहाय्य करण्यासाठी तिचे या क्षेत्रातील कार्य अधिक वेगवान केले आहे. महाराष्ट्र शासन आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेबरोबरचे सहकार्य अधिक वृद्धिंगत करताना मुंबईतील कोविडविरोधातील लढाईसाठी रिलायन्सने आणखी चार उपक्रम राबविले आहेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 24 May 2024 : आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
Cold Water : बर्फाचं पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक, हे 5 दुष्परिणाम माहितीयत?
Cold Water : बर्फाचं पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक, हे 5 दुष्परिणाम माहितीयत?
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Agarwal Family Member Fight : अग्रवाल कुटुंबातील एकाची पत्रकारांना धक्काबूक्की, पाहा काय घडलं...ABP Majha Headlines : 11 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSina River Solapur : हे क्रिकेटचे मैदान नाही, महाराष्ट्रातील कोरडी नदी आहे Maharashtra ABP MajhaDombivli Blast 10 Videos : डोंबिवली बॉलयर ब्लास्टची भीषणता  दाखवणारी 10 भयानक दृश्य!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 24 May 2024 : आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
Cold Water : बर्फाचं पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक, हे 5 दुष्परिणाम माहितीयत?
Cold Water : बर्फाचं पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक, हे 5 दुष्परिणाम माहितीयत?
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
Astrological Tips : अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Embed widget