एक्स्प्लोर

Ravindra Waikar: मोठी बातमी! रवींद्र वायकरांना मुंबई पोलिसांकडून क्लीन चीट; सर्व गुन्हे मागे

Ravindra Waikar: जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी रवींद्र वायकरांना मुंबई पोलिसांकडून क्लीन चीट देण्यात आली आहे.

Ravindra Waikar : मुंबई : रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांना मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police) क्लीन चीट मिळाल्याची माहिती मिळत आहे. जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी (Jogeshwari Plot Scam Case) EOW कडून कोर्टात सी समरी रिपोर्ट सादर करण्यात आला आहे. गैरसमजातून मुंबई महानगरपालिकेनं (Mumbai Municipal Corporation) गुन्हा दाखल केल्याचं मुंबई पोलिसांनी म्हटलं आहे. त्यामुळे रविंद्र वायकरांवरील सर्व गुन्हे मागे घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे. 

मुंबई महानगरपालिकेकडून दाखल झालेली तक्रार गैरसमजातून केल्याचा दावा करण्यात आला आहे. दरम्यान, रवींद्र वायकर त्यांच्या पत्नी मनिषा आणि त्यांचे भागीदार आसू नेहलानी, राज लालचंदानी, प्रिथपाल बिंद्रा आणि आर्किटेक्ट अरूण दुबे यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला होता.  

काय आहे रवींद्र वायकरांचं जोगेश्वरी भूखंड प्रकरण ? 

  • जोगेश्वरीतल्या 13,674 चौरस फुटांच्या भूखंडाचा घोटाळा
  • 2004 ला वायकर-मनपा-महल पिक्चर्समध्ये भूखंडासाठी करार
  • भूखंड मैदानासाठी आणि रूग्णालयासाठी होता आरक्षित
  • भूखंडाची किंमत अंदाजे 500 कोटी रुपये 
  • राखीव भूखंडावर वायकरांकडून पंचतारांकित हॉटेलची उभारणी
  • हॉटेलच्या बांधकामासाठी मुंबई मनपाची परवानगीच नाही 

दरम्यान, महाविकास आघाडी सरकारच्या काळात सार्वजनिक वापरासाठीचा राखीव भूखंड लाटून त्यावर पंचतारांकीत हॉटेल बांधण्याचा घाट घालून 500 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला होता. या गैरव्यवहारातून पालिकेचा महसूल बुडवल्याचा आरोप करत पालिका अभियंता संतोष मांडवकर यांच्या तक्रारीवरून आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. 

रवींद्र वायकरांची राजकीय कारकिर्द? 

  • रवींद्र वायकर सध्या मुंबई उत्तर-पश्चिमचे खासदार 
  • मुंबई महापालिकेत 20 वर्षे नगरसेवक
  • 2006-2010 दरम्यान मुंबई मनपात स्थायी समिती अध्यक्ष
  • 2009, 2014, 2019 ला जोगेश्वरी पूर्वमधून आमदार 
  • 2014-2019 दरम्यान गृहनिर्माण व उच्च तंत्रशिक्षण राज्य मंत्री 
  • 2019-2022 दरम्यान गृहनिर्माण राज्य मंत्री 

जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरण आहे तरी काय?

मुंबईतील जोगेश्वरीच्या मजासवाडी भागात 13 हजार 674 चौरस फुटांचा भूखंड मुंबई महापालिकेच्या मालकीचा आहे. हा भूखंड मैदानासाठी आणि रूग्णालयासाठी आरक्षित ठेवण्यात आला होता. या भूखंडाची किंमत 500 कोटींच्या घरात आहे. या राखीव भूखंडावर रविंद्र वायकर यांनी 5 स्टार हॉटेल बांधलं असल्याचा आरोप आहे.

विशेष म्हणजे या बांधकामासाठी वायकर यांनी मुंबई महाापालिकेकडून परवानगी घेतली नव्हती, असा त्यांच्यावर आरोप आहेत. या प्रकरणी रविंद्र वायकर यांची चौकशी सुरु आहे. चौकशीसाठी हजर राहण्यासंदर्भात नोटीस देण्यात आली होती. मात्र वायकर या चौकशीला हजर राहिले नाहीत. त्यानंतर आता ईडीकडून वायकर यांच्या घरावर धाड टाकण्यात आली आहे.

पाहा व्हिडीओ : Ravindra Waikar Clean Chit : रविंद्र वायकरांना मुंबई पोलिसांकडून क्लीनचीट; काय आहे प्रकरण?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अडीच वर्षात शिंदेंच्या नेतृत्वात महाराष्ट्राला गौरव परत मिळाला : पीएम मोदी
अडीच वर्षात शिंदेंच्या नेतृत्वात महाराष्ट्राला गौरव परत मिळाला : पीएम मोदी
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा व्होट जिहादच्या मुद्द्याला हात घातला; म्हणाले, धुळ्यात...
देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा व्होट जिहादच्या मुद्द्याला हात घातला; म्हणाले, धुळ्यात...
Sunil Shelke: सुनील शेळकेंच्या धनगरांवरील वक्तव्यावर बापू भेगडे आक्रमक; म्हणाले, 'धनगर समाजाची काठी पडल्यावर...'
सुनील शेळकेंच्या धनगरांवरील वक्तव्यावर बापू भेगडे आक्रमक; म्हणाले, 'धनगर समाजाची काठी पडल्यावर...'
Numerology : अतिशय संथ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; छोट्यातल्या छोट्या कामाचा करतात प्रचंड कंटाळा, हुशार असूनही पडतात मागे
अतिशय संथ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; छोट्यातल्या छोट्या कामाचा करतात प्रचंड कंटाळा, हुशार असूनही पडतात मागे
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  12 PM : 8 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सChhagan Bhujbal Full PC : ED च्या सुटकेपासून नव्हे, तर विकासासाठी भाजपसोबत - छगन भुजबळSupriya Sule Full PC : सुप्रिया सुळेंचं देवेंद्र फडणवीसांना खुलं आव्हान, नेमकं काय म्हणाल्या?Sanjay Raut Full PC : शरीर वाघाचं पण काळीज उंदराचं; शिंदे मोदी-शाहांच्या पायाशी गहाण पडलेत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अडीच वर्षात शिंदेंच्या नेतृत्वात महाराष्ट्राला गौरव परत मिळाला : पीएम मोदी
अडीच वर्षात शिंदेंच्या नेतृत्वात महाराष्ट्राला गौरव परत मिळाला : पीएम मोदी
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा व्होट जिहादच्या मुद्द्याला हात घातला; म्हणाले, धुळ्यात...
देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा व्होट जिहादच्या मुद्द्याला हात घातला; म्हणाले, धुळ्यात...
Sunil Shelke: सुनील शेळकेंच्या धनगरांवरील वक्तव्यावर बापू भेगडे आक्रमक; म्हणाले, 'धनगर समाजाची काठी पडल्यावर...'
सुनील शेळकेंच्या धनगरांवरील वक्तव्यावर बापू भेगडे आक्रमक; म्हणाले, 'धनगर समाजाची काठी पडल्यावर...'
Numerology : अतिशय संथ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; छोट्यातल्या छोट्या कामाचा करतात प्रचंड कंटाळा, हुशार असूनही पडतात मागे
अतिशय संथ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; छोट्यातल्या छोट्या कामाचा करतात प्रचंड कंटाळा, हुशार असूनही पडतात मागे
राष्ट्रपतींची बहिण ते 20 मंत्री, पोलिस प्रमुखांची पत्नी; एकाच सरकारी अधिकाऱ्याचे संबंध; तब्बल 400 व्हिडिओ एकाचवेळी व्हायरल झाल्याने देश हादरला
राष्ट्रपतींची बहिण ते 20 मंत्री, पोलिस प्रमुखांची पत्नी; एकाच सरकारी अधिकाऱ्याचे संबंध; तब्बल 400 व्हिडिओ एकाचवेळी व्हायरल झाल्याने देश हादरला
Sanjay Raut : राज ठाकरे म्हणतात, आमची सत्ता आली तर 48 तासांत मशिदीवरील भोंगे बंद करु; संजय राऊतांचं चोख प्रत्युत्तर, तुम्ही सत्तेसोबतच...
राज ठाकरे म्हणतात, आमची सत्ता आली तर 48 तासांत मशिदीवरील भोंगे बंद करु; संजय राऊतांचं चोख प्रत्युत्तर, तुम्ही सत्तेसोबतच...
Maharashtra Assembly Election 2024: हिंदू समाज उदासीन, 50 टक्के मतदान होणे हे एक प्रकारची राष्ट्रीय आपत्ती: गोविंद देवगिरी महाराज
हिंदू समाजात मतदानाबद्दल उदासीनता; बीडमध्ये गोविंद देवगिरी महाराजांचं वक्तव्य
Supriya Sule on Devendra Fadnavis : तुम्ही म्हणाल ती वेळ, म्हणतील ती जागा, पाहिजे तेवढ्या कॅमेऱ्यांनी या, आॅन कॅमेरा चर्चेला तयार; सुप्रिया सुळेंकडून देवेंद्र फडणवीस ओपन चॅलेंज
तुम्ही म्हणाल ती वेळ, म्हणतील ती जागा, पाहिजे तेवढ्या कॅमेऱ्यांनी या, आॅन कॅमेरा चर्चेला तयार; सुप्रिया सुळेंकडून देवेंद्र फडणवीस ओपन चॅलेंज
Embed widget