एक्स्प्लोर
Advertisement
राज ठाकरे उत्तर भारतीय मंचावर उपस्थित राहणार
येत्या 2 डिसेंबर रोजी मुंबईतील कांदिवली इथे उत्तर भारतीय मंचाचा कार्यक्रम होणार आहे. त्यासाठी मंचाने राज ठाकरे यांना आमंत्रण दिलं होते, जे त्यांनी स्वीकारलं आहे
मुंबई : मराठी नागरिकांचा कैवार घेणारे आणि परप्रांतीयांविरोधात कायमच विरोधी भूमिका घेणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आता चक्क उत्तर भारतीयांच्या मंचावर दिसणार आहेत. राज ठाकरे उत्तर भारतीय महापंचाय संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विटरवर याबाबत माहिती दिली आहे.
मा.राजसाहेबांनी उत्तर भारतीय मंच ने दिलेले आमंत्रण स्वीकारले असून दिनांक 2 डिसेंबर 2018 रोजी हा कार्यक्रम कांदिवली येथे होणार आहे, असं संदीप देशपांडे यांनी ट्वीटमध्ये लिहिलं आहे.
येत्या 2 डिसेंबर रोजी मुंबईतील कांदिवली इथे बुराभाई हॉलमध्ये सकाळी अकराच्या सुमारास हा कार्यक्रम होणार आहे. त्यासाठी उत्तर भारतीय महापंचायत संघाने राज ठाकरे यांना 12 ऑक्टोबर रोजी आमंत्रण दिलं होते, जे आता त्यांनी स्वीकारलं आहे. या कार्यक्रमात राज ठाकरे उत्तर भारतीयांशी संवाद साधणार आहेत. तसंच उत्तर भारतीयांसदर्भातील मत व्यक्त करणार आहेत. दरम्यान, राज ठाकरे यांनी याआधी जैन, गुजराती समाजाशी संवाद साधला होता. आता ते उत्तर भारतीयांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून आपली भूमिका मांडणारआहे. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगळी इमेज तयार करण्याचा राज ठाकरेंचा प्रयत्न आहे.मा.राजसाहेबांनी उत्तर भारतीय मंच ने दिलेले आमंत्रण स्वीकारले असून दिनांक 2 डिसेंबर 2018 रोजी हा कार्यक्रम कांदिवली येथे होणार आहे
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) November 12, 2018
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
शेत-शिवार
रत्नागिरी
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion