छापून आलेली बातमी पूर्णपणे खोटी, रो-रो बोटी वर ना सिगारेट ओढली ना दंड भरला : राज ठाकरे
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सार्वजनिक ठिकाणी मास्क न घातल्यामुळे त्यांना एक हजार रुपयांचा दंड भरला असल्याची बातमी काही वृत्तपत्र आणि चॅनलने चालवली होती. मात्र, असा कुठलाही प्रकार घडला नसल्याची माहिती राज ठाकरे यांनी एबीपी माझाला दिली आहे.बातमी छापणाऱ्या वृत्तपत्रे आणि चॅनलला राज ठाकरे यांचा खुलासा छापण्याबाबत पत्र
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सार्वजनिक ठिकाणी मास्क न घातल्यामुळे त्यांना एक हजार रुपयांचा दंड भरला असल्याची बातमी काही वृत्तपत्र आणि चॅनेलने चालवली होती. मात्र, प्रसारित आणि छापून आलेल्या बातम्या खोट्या असल्याची माहिती राज ठाकरे यांनी एबीपी माझाला दिली आहे. राज ठाकरे म्हणाले ‘बातमी पूर्णपणे खोटी असून असा कोणताही प्रकार घडला नाही’
एका इंग्रजी दैनिकात आलेल्या बातमीनुसार राज ठाकरे आपले कुटुंब आणि मित्रांसोबत गेल्या शुक्रवारी मुंबई-मांडवा रो-रो फेरीने अलिबागला जात असताना हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी रो-रो बोटीत प्रवाशांनी धुमप्रान करु नये आणि मास्क परिधान करावा, अशी सूचना होती. मात्र, राज ठाकरे बोटीवरच्या मोकळ्या जागेत मास्क न घालता उभे होते आणि काही वेळाने त्यांनी सिगारेटही पेटवली. राज ठाकरे हे सिगारेट पित असल्याचे आणि मास्क घातल्याचे बोटीवरील कर्मचाऱ्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. त्यानंतर ते राज ठाकरे यांच्याकडे गेले आणि रो रो बोटच्या नियमांविषयी त्यांना सांगितले. राज ठाकरे यांना आपली चूक लक्षात येताच त्यांनी दिलगिरी व्यक्त करत एक हजार रुपयांचा दंड भरला.
छापून आलेली बातमी पूर्णपणे खोटी : राज ठाकरे प्रसारित आणि छापून आलेल्या बातम्या खोट्या असल्याची माहिती मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एबीपी माझाला दिली आहे. राज ठाकरे म्हणाले ‘बातमी पूर्णपणे खोटी आहे, असा कोणताही प्रकार प्रवासादरम्यान घडला नाही’ राज ठाकरे यांनी त्यांच्या पक्षाचे नेते नितीन सरदेसाई यांच्या मार्फत वृत्तपत्र आणि काही चॅनल्सला खुलासा करण्याबाबत पत्रंही लिहीलं आहे.
काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानाबाहेरही कार्यकर्त्यांची गर्दी जमल्यामुळे वाद निर्माण झाला होता. हे सर्वजण वरळीतील स्थानिक नागरिक असून ते मनसेत प्रवेश करण्यासाठी कृष्णकुंजवर गेले होते. यावेळी अनेकजण सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन न करता दाटीवाटीने उभे होते. तसेच सध्या मुंबईत जमावबंदीचे म्हणजे कलम 144 लागू करण्याचे आदेश असताना एकाच ठिकाणी एवढे लोक कसे जमले, याविषयी प्रश्नचिन्हही उपस्थित करण्यात आले होते.