एक्स्प्लोर

जिथे आहात तिथूनच शुभेच्छा द्या, काका-पुतण्याचं वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांना आवाहन

आदित्य ठाकरे यांचा उद्या म्हणजे 13 जून रोजी तर राज ठाकरे 14 जून रोजी वाढदिवस आहे. परंतु कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे कुटुंबासोबत साधेपणाने वाढदिवस साजरा करणार आहेत. तर आदित्य ठाकरे यांनी यंदा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई : राज्यावरील कोरोना संकटामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आपला वाढदिवस साधेपणाने कुटुंबीसोबतच साजरा करणार आहेत. तर त्यांचे पुतणे आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. "मला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला येऊ नका. तुम्ही जिथे आहात तिथे जनतेला मदत करा, दिलासा द्या, याच माझ्यासाठी शुभेच्छा आहेत," असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं आहे. तर "तुम्ही जिथे असाल तिथूनच आशीर्वाद आणि शुभेच्छा द्याव्यात," असं आवाहन आदित्य ठाकरे यांनी केलं आहे.

आदित्य ठाकरे यांचा उद्या म्हणजे 13 जून रोजी वाढदिवस आहे. तर राज ठाकरे 14 जून रोजी 52 वा वाढदिवस आहे. त्यापार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी आपापल्या सोशल अकाऊंटवरुन पत्रक जाहीर करुन कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे.

राज ठाकरे यांचं आवाहन

माझ्या तमाम महाराष्ट्र सैनिकांना, सस्नेह जय महाराष्ट्र.

आज खूप दिवसांनी माझ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांशी मी पुन्हा थेट संवाद साधतोय ह्याचा मला मनापासून आनंद होत आहे. मार्च महिन्यात कोरोनाचं संकट राज्यावर आणि देशावर येऊन कोसळलं आणि उत्तरोत्तर ते अधिक गडद होत गेलं. आजही त्याची तीव्रता कमी झाली आहे असं नाही. पण मागे मी एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत म्हटलं होतं त्याप्रमाणे जोपर्यंत ह्या आजारावर योग्य औषध सापडत नाही तोपर्यंत आपली कोरोना साथीसोबत जगण्याची तयारी मनाने करावी लागेल आणि सध्या एकूणच महाराष्ट्राने तशी तयारी केलेली दिसते.

गेल्या २, ३ महिन्यांच्या काळात येणाऱ्या बातम्या मन विषण्ण करणाऱ्या होत्या. फक्त त्यात एकच दिलासा देणारी बाब माझ्यासाठी असायची ती म्हणजे ह्या कठीण प्रसंगात माझा महाराष्ट्र सैनिक जीवावर उदार होऊन, मोठ्या प्रमाणावर पदरमोड करून, लोकांच्या मदतीला धावून जातोय ही. अन्नधान्य वाटपापासून ते रुग्णांना इस्पितळात बेड मिळवून देणाऱ्या ते रुग्णाच्या कुटुंबियांना धीर देऊन प्रत्येकाच्या गरजेला उभा राहणाऱ्या माझ्या महाराष्ट्र सैनिकांच्या बातम्या माझ्यापर्यंत पोहचायच्या आणि त्या ऐकताना मला एकाच वेळेस आनंद आणि अभिमान दोन्हीही वाटत रहायचा.

महाराष्ट्र सैनिकांनी ह्या काळात केलेल्या कामाचं कौतुक मला अनेक लोकांनी व्यक्तिशः कळवलं, मी मनापासून सांगतो की मी खरंच भाग्यवान आहे की मला तुमच्यासारखे सहकारी मिळाले. बरं, हे करत असताना रोज माझा महाराष्ट्र सैनिक स्वतःचा आणि त्याच्या कुटुंबीयांचा जीव धोक्यात घालत होता, कित्येक महाराष्ट्र सैनिकांना कोरोनाची लागण देखील झाली तरीही ना माझा महाराष्ट्र सैनिक मागे हटला ना त्याचे कुटुंबीय. ही ताकद येते ती महाराष्ट्रावरच्या निस्सीम आणि निर्व्याज प्रेमातून. तुमच्या ह्या ताकदीला आणि तुमच्या कुटुंबियांच्या धैर्याला आणि त्यागाला माझा सलाम.

आणि हो, १४ तारखेला माझ्या वाढदिवशी तुम्ही सगळे दरवर्षी मला शुभेच्छा द्यायला येता, पण ह्या वर्षीची परिस्थिती वेगळी आहे. कोरोनामुळे अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत, कोरोनाबाधितांची संख्या कमी झालेली नाही, थोडक्यात सर्वत्र चिंतेचं वातावरण आहे आणि अशा वातावरणात वाढदिवस साजरा करणं अजिबात उचित नाही आणि म्हणूनच पक्षातील सर्व पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिकांना माझा सूचनावजा आदेश आहेत की कोणीही मला शुभेच्छा द्यायला येऊ नका. तुम्ही जिथे आहात तिथे जनतेला मदत करा, दिलासा द्या ह्याच माझ्यासाठी शुभेच्छा आहेत.

बाकी महाराष्ट्रातील जनतेसाठी तुमचं सुरु असलेलं मदतकार्य नक्की चालू ठेवा पण हे करताना तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या जीवाची काळजी घ्या, तुमच्या जीवापेक्षा मला अधिक मोलाचं काहीच नाही.

सगळं सुरळीत झाल्यावर मी तुम्हाला भेटायला येणार आहेच, तेंव्हा तुमच्याशी भेट होईलच.

आपला नम्र,

राज ठाकरे.

आदित्य ठाकरे काय म्हणाले? आज आपल्या महाराष्ट्र राज्यावरच नव्हे तर संपूर्ण जगावर कोरोनाचे संकट आहे. गेले दोन-तीन महिने आपण सगळे एकत्रितपणे या संकटाविरुद्ध लढा देत आहोत आणि हा लढा देत असताना आपले सर्वांचे एकच ध्येय आहे, ते म्हणजे कोरोनावर मात करणे.

13 जून रोजी माझा वाढदिवस आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मी माझा वाढदिवस साजरा न करण्याचे ठरवले आहे. माझ्या वाढदिवसानिमित्त तुम्ही जिथे असाल तिथूनच मला आशीर्वाद व शुभेच्छा द्याव्यात. माझी तमाम शिवसैनिक मित्रमंडळी आणि सर्वांना विनंती आहे की होर्डिंग्ज, हार तुरे, केक हा खर्च टाळून तो खर्च तुम्ही कोरोनाच्या संकटात अडकलेल्या लोकांवर खर्च करा अथवा मुख्यमंत्री सहाय्यता निधीला द्या. माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने हे एक सत्कार्य होईळ आणि याचा मला निश्चितच आनंद होईल.

प्रशासनाने सांगितलेल्या नियमांचे पालन करुन आपण प्रशासनाला सहकार्य करुया. तुम्ही सर्वजण कोरोनापासून स्वत:ची काळजी घ्या, हीच माझ्यासाठी वाढदिवसाची खरी भेट असेल. जसे तुम्ही आजपर्यंत प्रेम आणि आशीर्वाद दिले आहेत तसेच प्रेम आणि आशीर्वाद यापुढे सुद्धा माझ्यासोबत राहील हीच अपेक्षा....

धन्यवाद

आपला, आदित्य ठाकरे

Aaditya Thackeray| 'वाढदिवसाला होर्डिंग्स, हार-तुरे नको, लोकांना मदत करा'; आदित्य ठाकरे यांचं आवाहन Raj Thackeray | 'माझा वाढदिवस साजरा करु नका', राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना आवाहन
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणChhagan Bhujbal  : मोदींच्या सभेला राष्ट्रवादीच्या नेत्यांची दांडी? भुजबळांनी सांगितलं कारणZero Hour : निवडणुकीचा प्रचार शिगेला, प्रचाराचा सखोल आढावा झीरो अवरमध्ये

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
Embed widget