एक्स्प्लोर

मुंबईतील 122 स्थानकांचं ऑडिट, एलफिन्स्टन घटनेनंतर प्रशासनाला जाग

यामध्ये मध्य रेल्वेच्या 75 तर पश्चिम रेल्वेच्या 47 स्थानकांचा समावेश आहे. त्यासाठी 13 विशेष पथकं नेमण्यात आली आहेत.

मुंबई : एलफिन्स्टनच्या दुर्घटनेनंतर अखेर रेल्वे प्रशासनाला जाग आली आहे. मंबईतील 122 रेल्वे स्थानकांचं ऑडिट केलं जाणार आहे. यामध्ये मध्य रेल्वेच्या 75 तर पश्चिम रेल्वेच्या 47 स्थानकांचा समावेश आहे. त्यासाठी 13 विशेष पथकं नेमण्यात आली आहेत. गर्दीच्या वेळी ही पथकं स्थानकांच्या परिस्थितीचा आढावा घेतील. एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनी 29 आणि 30 सप्टेंबरला मॅरेथॉन बैठका घेतल्या आणि उपनगरीय स्थानकांचं सुरक्षा ऑडिट करण्याचे आदेश दिले. त्यानुसार मंगळवारपासून 10 दिवस उपनगरीय स्थानकांचं सुरक्षा ऑडिट होणार आहे. चेंगराचेंगरीत मुंबईकरांचा बळी एलफिन्स्टन आणि परेल रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या पुलावर शुक्रवारी सकाळी मोठी चेंगराचेंगरी झाली. या घटनेत 23 जणांचा मृत्यू झाला, तर 39 प्रवासी जखमी झाले. सकाळी 9.30 च्या सुमारास फूट ओव्हर ब्रीजवरील पत्रा कोसळल्याची ओरड झाली. यामुळे ब्रीजवरील प्रवाशांमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालं. त्यातच ब्रीज पडत असल्याच्या आणि शॉर्ट सर्किट झाल्याच्या अफवा पसरल्या. त्यामुळे ब्रीजवरील प्रवाशांमध्ये एकच हलकल्लोळ माजला. एलफिन्स्टन-परेलला गर्दी का होते? परेल आणि एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकांवर सकाळच्या वेळी कायमच प्रवाशांची गर्दी असते. अनेक ऑफिस या भागात असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नोकरदार या भागात लोकलने येतात. गेल्या काही वर्षांत प्रवाशांची संख्या वाढलेली आहे, मात्र ब्रिजची क्षमता वाढवण्याच्या दृष्टीने काहीच प्रयत्न झालेले नाहीत. उद्या दसरा असल्यामुळे अनेक जण खरेदीसाठी दादर आणि परिसरात जातात. सकाळच्या वेळेत असलेली गर्दी आणि त्यातच दोन्ही मार्गांवर लोकल आल्यास अचानक उडणारी झुंबड नेहमीची आहे. त्यामुळेच ही चेंगराचेंगरी झाल्याचं म्हटलं जात आहे. प्रवाशांच्या तुलनेत ब्रिजची क्षमता कमी असल्यामुळे गर्दीच्या वेळी पुलावर ताण वाढतो, अशी ओरड नेहमीच प्रवाशांकडून होते. त्याकडे प्रशासनाकडून लक्ष न दिलं गेल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. या घटनेनंतर स्थानिक रहिवासी आणि रेल्वे प्रवाशांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. मृतांविषयी हळहळ व्यक्त केली जात असतानाच या अपघातासाठी प्रशासनाला जबाबदार ठरवलं जात आहे.

संबंधित बातमी : एलफिन्स्टन चेंगराचेंगरी : मृतांचा आकडा 23 वर

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुणे अन् पिंपरी चिंचवडकरांना मिळाले नवे सनदी अधिकारी
राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुणे अन् पिंपरी चिंचवडकरांना मिळाले नवे सनदी अधिकारी
CM फडणवीसांनी स्टे देऊनही महापौरांकडून बदली, खरं काय? रितू तावडेंचं स्पष्टीकरण, क्रोनॉलॉजी सांगितली
CM फडणवीसांनी स्टे देऊनही महापौरांकडून बदली, खरं काय? रितू तावडेंचं स्पष्टीकरण, क्रोनॉलॉजी सांगितली
माढ्यातील युवकाने विधानभवनबाहेर अंगावर ओतलं केरोसीन; पोलिसांनी घेतलं ताब्यात, धाराशिवमध्येही तीच घटना
माढ्यातील युवकाने विधानभवनबाहेर अंगावर ओतलं केरोसीन; पोलिसांनी घेतलं ताब्यात, धाराशिवमध्येही तीच घटना
अक्षय शिंदेला उडवलं तसं दोन-चार लोकांना उडवा, अनिल परबांचा संताप; मंत्री योगेश कदमाचं उत्तर
अक्षय शिंदेला उडवलं तसं दोन-चार लोकांना उडवा, अनिल परबांचा संताप; मंत्री योगेश कदमाचं उत्तर

व्हिडीओ

Zero Hour : इराण युद्धामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीला सरकार हाताळतंय असं वाटतं का? ABP Majha
Navi Mumbai Hospital : नवी मुंबईत हॉस्पिटलमध्ये LPG चा तुटवडा, रुग्णांना जेवण पुरवणे अवघड
PM Kisan 22th Installment: 'पीएम किसान योजने'चा २२ वा हप्ता कधी मिळणार? तारीख आली समोर, सर्वाधिक लाभार्थी अहिल्यानगरचे
Devendra Fadnavis Vidhan Sabha : देशातील पहिली ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्था महाराष्ट्रच होणार
Navi Mumbai Gas Issue : व्यावसायिक सिलिंडरचा तुटवडा, जगदंब हॉटेलकडून चुलीवरच जेवण सुरू

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Indians : मुंबईची पलटण विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज, पहिल्या टप्प्यात किती सामने खेळणार? मुंबई इंडियन्सचा पहिला सामना 'या' संघाविरुद्ध
मुंबई इंडियन्सची पलटण विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज, पहिल्या टप्प्यात किती सामने खेळणार?
Hormuz Strait Attack : हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत युद्धाचा भडका, ब्रिटिश कंटेनर जळून खाक, इराणकडे बोट?
हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत युद्धाचा भडका, ब्रिटिश कंटेनर जळून खाक, इराणकडे बोट?
राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुणे अन् पिंपरी चिंचवडकरांना मिळाले नवे सनदी अधिकारी
राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुणे अन् पिंपरी चिंचवडकरांना मिळाले नवे सनदी अधिकारी
CM फडणवीसांनी स्टे देऊनही महापौरांकडून बदली, खरं काय? रितू तावडेंचं स्पष्टीकरण, क्रोनॉलॉजी सांगितली
CM फडणवीसांनी स्टे देऊनही महापौरांकडून बदली, खरं काय? रितू तावडेंचं स्पष्टीकरण, क्रोनॉलॉजी सांगितली
LPG Supply : घरगुती सिलेंडरच्या किमती वाढल्या, पुरवठ्यावर गोंधळाची स्थिती; सरकार म्हणतंय, जनतेने घाबरण्याची गरज नाही
घरगुती सिलेंडरच्या किमती वाढल्या, पुरवठ्यावर गोंधळाची स्थिती; सरकार म्हणतंय, जनतेने घाबरण्याची गरज नाही
अमित देशमुख विधानसभेत कडाडले; उपमुख्यमंत्री सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांचं काय? व्हिडिओ शेअर
अमित देशमुख विधानसभेत कडाडले; उपमुख्यमंत्री सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांचं काय? व्हिडिओ शेअर
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 मार्च 2026 | बुधवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 मार्च 2026 | बुधवार 
IPL 2026 Schedule : मोठी बातमी, आयपीएलचं पहिल्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर, पहिल्या सामन्यात आरसीबी विरुद्ध कोण लढणार? मुंबईचा पहिला सामना कधी?
IPL चं पहिल्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर, पहिल्या सामन्यात आरसीबी विरुद्ध कोण लढणार? मुंबईचा पहिला सामना कधी?
Embed widget