एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुंबईत रेल्वे वाहतूक ठप्प, रस्त्यांवरही ट्रॅफिक
सणसवाडी परिसरातील दगडफेकीचा निषेध करण्यासाठी मुंबईत निदर्शनं करण्यात आली.
मुंबई : विविध ठिकाणी रेल रोको आणि रस्त्यांवर आंदोलनामुळे मुंबईतील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. मुंबईत येणाऱ्या सायन-पनवेल आणि ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाहतूक कोंडी झाली असून रेल्वे वाहतूकही विस्कळीत आहे.
सणसवाडी परिसरातील दगडफेकीचा निषेध करण्यासाठी मुंबईत निदर्शनं करण्यात आली.
हार्बर रेल्वे सेवा विस्कळीत
दुपारपासून हार्बर मार्गावरची कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन सेवा पूर्णपणे बंद आहे. सेवा पूर्ववत करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे. मात्र हार्बर मार्गावरील स्टेशनांवर प्रचंड गर्दी आहे. संध्याकाळी लोकलला प्रचंड गर्दी असते. त्यात वाहतूक सुरळीत नसल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
पनवेल ते वाशी आणि कुर्ला ते सीएसएमटी वाहतूक सुरळीत सुरु आहे. मात्र कुर्ला ते वाशी दरम्यान वाहतूक बंद आहे. गोवंडी आणि चेंबूरमध्ये आंदोलन करण्यात आल्याने ही वाहतूक बंद आहे. वाशीहून निघणाऱ्या काही ट्रेन मानखुर्दमधूनच वळवण्यात आल्या. पुढील सूचना मिळेपर्यंत वाहतूक बंद करण्यात आल्याची घोषणा स्टेशनवर करण्यात येत आहे.
रस्त्यावर वाहतूक कोंडी
रेल्वे सेवा विस्कळीत झालेल्या त्याचा सर्व ताण रस्त्यावर आला आहे. मानखुर्द, वाशी या स्टेशनांबाहेर प्रवाशांनी गर्दी केली आहे. मानखुर्द ते एससीएलआर रोडवर वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. रेल्वे सेवा नसल्याने प्रवासी मिळेल त्या वाहनाने घर गाठत आहेत. संधीचा फायदा घेत रिक्षा आणि टॅक्सीवाल्यांकडूनही जास्तीचे दर आकारले जात असल्याचं काही ठिकाणी आढळून आलं आहे.
या रस्त्यांवर वाहतूक कोंडी
- मानखुर्द ते एससीएलआर
- मानखुर्द ते सायन (ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे)
- एससीएलआर ते घाटकोपर (एलबीएस)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement