एक्स्प्लोर

Disha Salian : आदित्य ठाकरेंवर आरोपांच्या फैरी झाडायला सर्वात पुढे, पण एसआयटीने चौकशीला बोलावल्यावर गेलेच नाहीत, दिशा सालियन मृत्यू प्रकरणी नितेश राणेंच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

Disha Salian : दिशा सालियनप्रकरणी आता राजकीय आरोप-प्रत्यारोप होत आहेत. दरम्यान या प्रकरणी आता नेते आदित्य ठाकरेंवर आक्रमकपणे आरोप करणारे भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.

मुंबई : बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची माजी मॅनेजर दिशा सालियनची हत्या झाली होती. ते प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. त्याचं कारण म्हणजे दिशाच्या वडिलांनी या प्रकरणी मोठे आरोप केले आहेत. आपल्या मुलीवर सामूहित बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप दिशा सालियनच्या वडिलांनी, सतीश सालियन यांनी केला आणि या प्रकरणाने पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं. दिशा सालियन मृत्यूचा तपास पुन्हा एकदा करावा अशी नवीन याचिका सतीश सालियन यांनी दाखल केली आहे. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी आणि किशोरी पेडणेकरांनी आपल्यावर दबाव आणला होता. अर्णब गोस्वामी आणि नितेश राणेंनी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य आहे असं या याचिकेतून म्हटलं आहे. दिशा सालियनप्रकरणी आता राजकीय आरोप-प्रत्यारोप होत आहेत. दरम्यान या प्रकरणी आता नेते आदित्य ठाकरेंवर आक्रमकपणे आरोप करणारे भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. 

आता दिशा सालियन मृत्यू प्रकरणी नितेश राणे यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. एसआयटी(SIT) ने चौकशीचं समन्स बजावूनही भाजप आमदार नितेश राणे यांनी एसआयटी(SIT) समोर जाण टाळलं आहे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणी आदित्य ठाकरेंवर सातत्याने आरोप करणाऱ्या नितेश राणे यांना एसआयटी(SIT)ने चौकशीसाठी समन्स बजावलं होतं. दिशा सालियन मृत्यू प्रकरणी पुरावे आसल्यास सादर करण्यासाठी पोलिसांनी नितेश राणे यांना चौकशीसाठी समन्स बजावलं होतं. मात्र, समन्स बजावलं तरीही नितेश राणे यांनी एसआयटी(SIT)समोर उपस्थित न राहिल्याची सूत्रांची माहिती आहे. 

काय म्हणाले होते नितेश राणे?

"गँगरेप करून दिशा सालियानचा मर्डर करण्यात आला. माझ्याकडे या संदर्भात सर्व पुरावे आहेत. आजही दिशा सालियनचे आरोपी विधान भवनात फिरत आहेत. महाविकास आघाडी सरकार काळात मुंबई पोलीस आयुक्तांवरती प्रेशर होतं. डीसीपींवर प्रेशर होतं. आदित्य ठाकरे 8 जून आणि 13 जूनला पार्टीत उपस्थित होते. आदित्य ठाकरे यांचे वडील मुख्यमंत्री होते म्हणून सर्व काही लपवण्यात आलं आहे. दिशा सालियन आणि सुशांत सिंह राजपूत प्रकरणात आम्हाला यापूर्वी बोलावलं होतं. मी मुबंई पोलिसांना सर्व योग्य ते पुरावे देणार आहे. काही महत्त्वपूर्ण पुरावे आदित्य ठाकरे संदर्भातही मुंबई पोलिसांना मिळाले आहेत", असा मोठा दावा नितेश राणे यांनी केला होता. 

दिशा सालियान प्रकरण पुन्हा चर्चेत

आपल्या मुलीवर सामूहित बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप दिशा सालियनच्या वडिलांनी, सतीश सालियन यांनी केला आणि या प्रकरणाने पुन्हा एकदा तोंड वर काढलं. दिशा सालियन मृत्यूचा तपास पुन्हा एकदा करावा अशी नवीन याचिका सतीश सालियन यांनी दाखल केली आहे. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी आणि किशोरी पेडणेकरांनी आपल्यावर दबाव आणला होता. अर्णब गोस्वामी आणि नितेश राणेंनी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य आहे असं या याचिकेतून म्हटलं आहे.

दिशा सालियन केसचा घटनाक्रम

- अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची माजी व्यवस्थापक म्हणून दिशा सालियन मुंबईत काम करत होती.
- 8 जून 2020 रोजी मुंबईत दिशा सालियनचा बालकनीमधून खाली पडून मृत्यू झाला. पोलिसांनी ही आत्महत्या असल्याची नोंद केली.
- मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 8 जून 2020 रोजी दिशाला लंडनमध्ये राहणाऱ्या तिच्या मैत्रिणीचा फोन आला. फोनवर बोलत ती आतमध्ये गेली.
- दिशाच्या लंडनमधील मैत्रिणीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, दिशाने लॉकडाऊन अजूनही सुरू असून काम बाकी असल्याचं सांगितलं. ती थोडी चिंतेत वाटत होती. 
त्यानंतर तिचे मित्र आणि होणारा नवरा रोहन यांनी खोलीचा बंद असलेला दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला.
- दिशा खोलीत नव्हती. खिडकीतून खाली पाहिलं तर दिशा पडलेली दिसून आली.
- दिशा सालियनने आत्महत्या केली नसून तिची हत्या करण्यात आली आहे असा आरोप राणे कुटुंबाकडून सातत्यानं केला गेला.
- बलात्कार करुन मग तिची हत्या केल्याचा आरोप नारायण राणे यांनी केला. मुंबईत एका पार्टीमध्ये दिशा सालियनवर बलात्कार झाला असून ती गरोदर होती असा गंभीर आरोप राणेंनी केला होता.
- दिशा सालियनवर बलात्कार होत असताना फ्लॅटबाहेर कोणत्या मंत्र्याचे सुरक्षारक्षक पहारा देत होते? असा प्रश्न नारायण राणेंनी उपस्थित केला.
- सुशांत सिंह राजपूतला ही गोष्ट कळाली तेव्हा त्याने आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याची हत्या करुन त्यालाही शांत करण्यात आलं असा खळबळजनक आरोप राणेंनी केला.
- पुढे 2022 मध्ये पुराव्यांच्याअभावी मुंबई पोलिसांनी या केसचा तपास बंद केला.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pooja Khedkar : पूजा खेडकरच्या अडचणीत वाढ? नाशिक विभागीय आयुक्तांनी बजावली कारणे दाखवा नोटीस, नेमकं कारण काय?
पूजा खेडकरच्या अडचणीत वाढ? नाशिक विभागीय आयुक्तांनी बजावली कारणे दाखवा नोटीस, नेमकं कारण काय?
Allahabad High Court : स्तन पकडणे किंवा पायजाम्याची नाडी तोडणे बलात्कार नाही : अलाहाबाद हायकोर्ट
स्तन पकडणे किंवा पायजाम्याची नाडी तोडणे बलात्कार नाही : अलाहाबाद हायकोर्ट
Disha Salian case Aaditya Thackeray: एकनाथ शिंदेंचा आमदार आदित्य ठाकरेंच्या बाजूने, म्हणाले, गेली तीन वर्षे आमचंच सरकार, तपासात काहीच आढळलं नाही!
एकनाथ शिंदेंचा आमदार आदित्य ठाकरेंच्या बाजूने, म्हणाले, गेली तीन वर्षे आमचंच सरकार, तपासात काहीच आढळलं नाही!
Nashik Crime : रंगपंचमीच्या दिवशी दुहेरी हत्याकांडानं नाशिक हादरलं! सख्ख्या भावांना धारदार शस्त्रानं वार करून संपवलं; एक अजितदादांच्या राष्ट्रवादीचा पदाधिकारी
रंगपंचमीच्या दिवशी दुहेरी हत्याकांडानं नाशिक हादरलं! सख्ख्या भावांना धारदार शस्त्रानं वार करून संपवलं; एक अजितदादांच्या राष्ट्रवादीचा पदाधिकारी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर वेगवान ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 10 AM 20 March 2025ABP Majha Marathi News Headlines 09 AM TOP Headlines 09 AM 20 March 2025TOP : टॉप 80 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर वेगवान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pooja Khedkar : पूजा खेडकरच्या अडचणीत वाढ? नाशिक विभागीय आयुक्तांनी बजावली कारणे दाखवा नोटीस, नेमकं कारण काय?
पूजा खेडकरच्या अडचणीत वाढ? नाशिक विभागीय आयुक्तांनी बजावली कारणे दाखवा नोटीस, नेमकं कारण काय?
Allahabad High Court : स्तन पकडणे किंवा पायजाम्याची नाडी तोडणे बलात्कार नाही : अलाहाबाद हायकोर्ट
स्तन पकडणे किंवा पायजाम्याची नाडी तोडणे बलात्कार नाही : अलाहाबाद हायकोर्ट
Disha Salian case Aaditya Thackeray: एकनाथ शिंदेंचा आमदार आदित्य ठाकरेंच्या बाजूने, म्हणाले, गेली तीन वर्षे आमचंच सरकार, तपासात काहीच आढळलं नाही!
एकनाथ शिंदेंचा आमदार आदित्य ठाकरेंच्या बाजूने, म्हणाले, गेली तीन वर्षे आमचंच सरकार, तपासात काहीच आढळलं नाही!
Nashik Crime : रंगपंचमीच्या दिवशी दुहेरी हत्याकांडानं नाशिक हादरलं! सख्ख्या भावांना धारदार शस्त्रानं वार करून संपवलं; एक अजितदादांच्या राष्ट्रवादीचा पदाधिकारी
रंगपंचमीच्या दिवशी दुहेरी हत्याकांडानं नाशिक हादरलं! सख्ख्या भावांना धारदार शस्त्रानं वार करून संपवलं; एक अजितदादांच्या राष्ट्रवादीचा पदाधिकारी
Nagpur violence: दंगल दुसरीकडे घडवायची होती, पण ठिणगी देवेंद्र फडणवीसांच्या मतदारसंघातच पडली; संजय राऊतांना वेगळाच संशय
दंगल दुसरीकडे घडवायची होती, पण ठिणगी देवेंद्र फडणवीसांच्या मतदारसंघातच पडली; संजय राऊतांना वेगळाच संशय
Dhananjay Munde : मंत्रिपदाची झूल जाताच मानपानही गेला, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बॅनरवरुन धनंजय मुंडे गायब!
मंत्रिपदाची झूल जाताच मानपानही गेला, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बॅनरवरुन धनंजय मुंडे गायब!
Disha Salian Case: दिशा सालियनच्या वडिलांनी याचिकेत कोणत्या महत्त्वाच्या मागण्या केल्या? 'या' स्फोटक मागणीमुळे खळबळ
दिशा सालियनच्या वडिलांनी याचिकेत कोणत्या महत्त्वाच्या मागण्या केल्या? 'या' स्फोटक मागणीमुळे खळबळ
Mumbai News : 30 वर्षीय दर्शित सेठ कोस्टल रोड-सिलिंक कनेक्टवर आला, गाडीतून उतरला अन् थेट समुद्रात घेतली उडी
30 वर्षीय दर्शित सेठ कोस्टल रोड-सिलिंक कनेक्टवर आला, गाडीतून उतरला अन् थेट समुद्रात घेतली उडी
Embed widget