एक्स्प्लोर
Advertisement
अरुंधती दुधवडकर यांचं नगरसेवकपद अडचणीत
अरुंधती दुधवडकर या शिवसेनेचे माजी नगरसेवक अरुण दुधवडकर यांच्या पत्नी आहेत. महापालिकेतील सत्तेचा गैरवापर करुन दुधवडकर दाम्पत्याकडून अनधिकृत बांधकाम केल्याचा दुबे यांचा दावा आहे.
मुंबई : मुंबईतील अनधिकृत बांधकामांप्रकरणी शिवसेनेच्या नगरसेविका अरुंधती दुधवडकर यांच्या अडचणीत वाढ होताना दिसून येत आहे. ताडदेवमधील अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ते संजय दुबे यांनी अरुंधती दुधवडकर यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. तसेच नगरसेवक पद रद्द करण्याची मागणी केली आहे.
अरुंधती दुधवडकर या शिवसेनेचे माजी नगरसेवक अरुण दुधवडकर यांच्या पत्नी आहेत. महापालिकेतील सत्तेचा गैरवापर करुन दुधवडकर दाम्पत्याकडून अनधिकृत बांधकाम केल्याचा दुबे यांचा दावा आहे.
यापूर्वी संजय दुबे यांनी ताडदेवमधील दुधवडकर दाम्पत्याच्या अनधिकृत बांधकामाविरोधात महापालिकेकडे दाखल केली होती. परंतू दुबे यांच्या तक्रारीकडे दुर्लक्षित केल्याने अखेर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तसेच या अनधिकृत बांधकामावर त्वरीत कारवाई करुन अरंधती दुधवडकर यांचे नगरसेवक पद रद्द करण्याची मागणी दुबे यांनी केली आहे.
काय आहे हे प्रकरण?
माजी नगरसेवक अरविंद दुधवडकर आणि आजी नगरसेविका अरूंधती दुधवडकर यांचे ताडदेव येथील दिपक अपार्टमेंट, सुपारीवाला इमारतीत घर आहे. ताडदेव टॉवरजवळील वॅलेंटाईन स्पोर्टस् क्लबला लागून एक वाढीव बांधकाम करण्यात आले आहे. हे वाढीव अनधिकृत बांधकाम कोणतीही परवानगी न घेता करण्यात आले आहे. दुधवडकर यांनीच क्लबच्या मोकळ्या मैदानावरील संरक्षक भिंतीवर अतिक्रमण करत बांधकाम केले असल्याचा दावा दुबे यांनी केला आहे.
संबंधित बातमी
मुंबईत अनधिकृत बांधकाम, महापालिका म्हणते, आम्हाला माहित नाही!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement