एक्स्प्लोर
समुद्रालगतची CRZ मर्यादा 500 मीटरवरुन 200 मी. करण्याचा प्रस्ताव
मुंबईतील समुद्रालगतची सीआरझेडची मर्यादा 500 मीटरवरुन 200 मीटरवर करण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचारधीन आहे. येत्या सात दिवसांत राज्य सरकार त्याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवणार आहे.
नागपूर : समुद्रालगतची सीआरझेडची मर्यादा 500 मीटरवरुन 200 मीटरवर करण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचारधीन आहे. येत्या सात दिवसांत राज्य सरकार त्याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवणार आहे.
पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी विधानसभेत ही माहिती दिली आहे. सध्या समुद्रलगतच्या 500 मीटर अंतरापर्यंत कोणतीही बांधकामं करता येत नाही. त्यामुळं राज्यातील बंदरांचा विकास रखडले आहेत. असं रामदास कदम यांनी म्हटलं आहे.
सरकारचा सीआरझेडची मर्यादा कमी करण्याचा प्रयत्न आहे. दरम्यान, सीआरझेडची मर्यादा 500 वरुन 200 आल्यावर समुद्र किनारी बांधकामांचा सुळसुळाट होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.
दरम्यान, हा प्रस्ताव मान्य झाल्यास मुंबईतील समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणात बांधकामं होऊ शकतात. त्यामुळे या निर्णयाला केंद्र सरकार या निर्णयाला मान्यता देणार की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement