एक्स्प्लोर

''मुंबई महापालिकेच्या 61 हजार कोटींच्या ठेवींची माहिती सादर करा''

मुंबई : मुंबई महापालिकेच्या 61 हजार कोटींच्या ठेवींची संपूर्ण माहिती सादर करा, असे आदेश महापालिका सभागृहाने प्रशासनाला दिले आहेत. प्रशासनाकडून उद्या (शनिवारी) सभागृहात माहिती सादर केली जाणार आहे. मुंबई महापालिकेच्या पहिल्या सभागृह बैठकीत महापालिकेच्या बँकेतील 61 हजार कोटींच्या ठेवींवरुन प्रशासनाला सर्वपक्षीयांनी धारेवर धरलं. एकीकडे 84 कोटींसाठी बेस्ट कर्मचाऱ्यांचे पगार अडले असतांना, ठेवींचे पालिका नेमके काय करते, असा सवाल सर्वपक्षीय नगरसेवकांनी केला. मुंबईतील रस्ते, पाणी, शाळा आणि इतर पायाभूत सोयीसुविधांसाठी हा पैसा वापरला जावा. बँकेत ठेवून त्यावर केवळ व्याज कमावण्याचे कारण काय, असा सवालही उपस्थित केला. काय आहे 61 हजार कोटींचं प्रकरण? देशातली सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबई महापालिकेचे तब्बल 61 हजार 510 कोटी रुपये शहरातील 31 बँकांमध्ये जमा असल्याचं समोर आलं आहे. यामध्ये चार खासगी बँकांचाही समावेश आहे. मुंबई महापालिकेच्या अर्थ विभागाने दिलेल्या माहितीतून ही बाब समोर आली. दुसरी धक्कादायक गोष्ट म्हणजे या रक्कमेच्या केवळ व्याजापोटी मुंबई महापालिकेला तब्बल 4500 कोटी रुपये मिळतात. महापालिकेने ही रक्कम 1 कोटी 20 लाख मुंबईकरांना वाटली तर प्रत्येक करदाताच्या वाट्याला 51, 250 रुपये येतील. महापालिकेच्या 61, 510 कोटी जमा रक्कमेमध्ये भविष्य निर्वाह निधी आणि निवृत्ती निधी 10,455 कोटी, अतिरिक्त निधी 10,927 कोटी आणि नागरी विशेष निधी 34,258 कोटी रुपयांचा समावेश आहे. जकात करातून मुंबई महापालिकेला सर्वाधिक उत्पन्न मिळतं. जकात करातून दिवसाला 12 कोटींची कमाई होते.  त्यामुळे एकीकडे मुंबईत रस्ते, पाणी, कचरा अशा मूलभूत सोयींचा अभाव असताना मुंबई महापालिकेचा अर्थात सर्वसामान्य मुंबईकरांचा पैसा बँकेत कशासाठी? असा प्रश्न विचारला जात आहे.

संबंधित बातमी : मुंबई महापालिकेचे 61 हजार 510 कोटी रुपये बँकेत जमा!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Palghar News: वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ashok Dhodi Palghar : कारमध्ये सापडलेला मृतदेह अशोक धोडी यांचाच, पोलिसांची माहितीJob Majha : जॉब माझा :भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र येथे विविध पदांसाठी भरती :ABP MajhaBuldhana : बुलढाणा केसगळती प्रकरण, गावातील नागरिकांच्या रक्तात, केसात हेवी मेटल असलेलं 'सेलेनियम'Chhatrapati Shivaji Maharaj Statue :जपानच्या टोकियोत बसवणार शिवरायांचा पुतळा, देशभरात रथयात्रा सुरू

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Palghar News: वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
Embed widget