एक्स्प्लोर

तर, मराठा समाज पुन्हा एकदा रस्त्यावर उतरेल : प्रवीण दरेकर

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज(20 फेब्रुवारी)आझाद मैदान येथे मराठा समाजातील आंदोलकांची भेट घेतली. यावेळी सरकारने वेळीच या तरुणांची दखल घेतली नाही, तर मराठा समाज पुन्हा एकदा रस्त्यावर उतरेल, असा इशारा प्रविण दरेकर यांनी सरकारला दिला.

मुंबई : मराठा आरक्षणाबाबत महाविकास आघाडी सरकार उदासीन असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केलाय. मुंबईतील आझाद मैदान इथं मराठा तरुणांचं गेल्या 24 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. या आंदोलकांची दरेकर यांनी भेट घेतली. 24 दिवसांनंतरही या तरुणांना न्याय मिळत नसल्याने दरेकरांनी सरकारवर तोंडसुख घेतलंय. फडणवीस सरकारनं कुठल्याही आंदोलनाची तातडीने दखल घेत मार्ग काढल्याचं दरेकरांनी सांगितलंय. मात्र, आताचं सरकार संवेदनहीन असल्याची टीका दरेकरांनी केलीय. मराठा तरुणांच्या आंदोलनावर तोडगा निघाला नाही तर उपोषणाला बसण्याचा निर्धार दरेकरांनी व्यक्त केलय. मुंबईतील आझाद मैदान इथं गेल्या 24 दिवसांपासून मराठा तरुणांचं आंदोलन सुरू आहे. या विद्यार्थ्यांची आज विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आझाद मैदान येथं भेट घेतली. भेटीनंतर प्रवीण दरेकर यांनी महाविकासआघाडी सरकारवर सडकून टीका केलीय. मला खरेतर या सरकारची किव येते. हे सरकार संवेदनशून्य आहे. फडणवीस यांच्या सरकारमध्ये राज्यात कुठेही आंदोलन होत असेल तर दोन ते दिवसांमध्ये आंदोलकांची भेट घेऊन त्यांचे प्रश्न मार्गी लावले जात होते. देवेंद्र फडणवीस हे मराठा समाजाचे नसून त्यांनी राज्यकर्ते म्हणून मराठा समाजाला न्याय दिला. कोर्टात टिकेल असं आरक्षण फडणवीस सरकारनेच दिलं. मंत्र्यांसोबत बैठकीला भलत्याच मुलांना नेतात, घुसखोरांवर कारवाई करा, मराठा आंदोलक तरुणांची मागणी महाविकासआघाडी सरकारला मराठा समाजाची काळजी नाही : दरेकर सुप्रीम कोर्टात मराठा समाजाच्या आरक्षणा संबंधी सुनावणीवेळी सरकारकडून कोणीही उपस्थित नव्हतं. यावरुन सरकारला मराठा समाजाची किती काळजी आहे, हे दिसतं असल्याची टीका दरेकर यांनी केली. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती या सरकारने साजरी केली, त्या छत्रपतींच्या रयतेची काळजी या सरकारला दिसत नाही. 24 दिवसांपासून मराठा समाजातील तरुण-तरुणी आझाद मैदानावर आंदोलन करत आहेत. मात्र, या विद्यार्थ्यांची दखल या सरकारने अद्याप घेतली नाही. यांच्याकडे पाहायलाही या सरकारला वेळ नाही. मराठा समाजाने आपली शक्ती शांततेच्या मार्गाने दाखवली. त्याची दखल तत्कालीने सरकारने घेत कायद्याच्या चौकटीत बसेल असं आरक्षण दिलं. मात्र, या सरकारने या समाजाची दखल घेतली नाही. तर, पुन्हा एकदा मराठा समाज रस्त्यावर उतरेल, असा निर्वाणीचा इशारा विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी यावेळी दिला. अन्यथा अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू देणार नाही : विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर गेल्या 24 दिवसांपासून आझाद मैदानात आंदोलनाला बसलेल्या मराठा समाजाच्या उमेदवारांच्या प्रश्नाकडे लक्ष दयायला महाविकास आघाडी सरकारकडे वेळ नाही हे दुदैर्व आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी जर मराठा समाजाच्या उमेदावारांच्या प्रश्नाला न्याय नाही मिळाला तर येत्या 24 फेब्रुवारी पासून सुरु होणारे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू देणार असा जोरदार इशारा विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज दिला. Maratha Andolan | 24 दिवसांपासून आझाद मैदानात मराठा तरुणांचं आंदोलन, विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर आंदोलकांच्या भेटीला

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
Pratap Sarnaik: मराठी न येणाऱ्या रिक्षा- टॅक्सीचालकांची उद्यापासून खैर नाही, आरटीओचं वायूवेग पथक जागेवर बॅच-लायसन्स सस्पेंड करणार, प्रताप सरनाईकांची ठाम भूमिका
मराठी न येणाऱ्या रिक्षा- टॅक्सीचालकांची उद्यापासून खैर नाही, आरटीओचं वायूवेग पथक जागेवर बॅच-लायसन्स सस्पेंड करणार, प्रताप सरनाईकांची ठाम भूमिका
Narendra Modi: मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
Ladaki Bahin Yojana :लाडकी बहीण योजनेतून 92 लाख अपात्र महिलांची नावं कापली, सरकारचा आर्थिक भार कमी झाला, साडेचार लाख सरकारी कर्मचाऱ्यांकडून गैरफायदा
लाडकी बहीण योजनेतून 92 लाख अपात्र महिलांची नावं कापली, सरकारचा आर्थिक भार कमी झाला, साडेचार लाख सरकारी कर्मचाऱ्यांकडून गैरफायदा

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Junnar Crime News : पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
Govinda: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
Video: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
Rain Update: अल-निनोचं संकट कायम, सप्टेंबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
अल-निनोचं संकट कायम, सप्टेंबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
Pune Junnar Crime News: 'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
Rahul Gandhi Chhatron ki Goonj: राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब, प्रशांत जगतापांनी दंड थोपटताच पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब, प्रशांत जगतापांनी दंड थोपटताच पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला
Asim Sarode on Rahul Narvekar: 'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
Embed widget