एक्स्प्लोर
अशीही युती, प्रताप सरनाईक-रणजीत पाटील व्याही होणार!
पूर्वेश सरनाईक हे ठाण्याचे नगरसेवक तसंच युवासेनेचे सचिव आहेत.
मुंबई : आगामी निवडणुकीत शिवसेना आणि भाजपची युती होणार की नाही, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. परंतु शिवसेना आमदार आणि भाजपचे मंत्र्यांमध्ये अनोखी युती झाली आहे.
शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक आणि भाजपचे मंत्री डॉ.रणजीत पाटील व्याही होणार आहेत. युवासेनेचे सचिव पूर्वेश सरनाईक विवाहबंधनात अडकणार आहेत. पूर्वेश सरनाईक हे रणजीत पाटील यांच्या मुलीसोबत लग्न करणार आहेत.
सरनाईक-पाटील कुटुंबात पारंपरिक पद्धतीने सुपारीचा कार्यक्रम पार पडला आहे. फेब्रुवारी महिन्यात त्यांचा साखरपुडा होणार असून मे महिन्यात हा विवाहसोहळा रंगणार आहे.
दरम्यान, पूर्वेश सरनाईक हे ठाण्याचे नगरसेवक तसंच युवासेनेचे सचिव आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement