एक्स्प्लोर

मी आणि माझे कुटुंब सुरक्षित म्हणजे जनता सुरक्षित, राज्य सरकारचा गोड गैरसमज : प्रकाश आंबेडकर

ठाकरे सरकारच्या मी आणि माझे कुटुंब योजनेची खिल्ली उडवताना महागाई झपाट्याने वाढत असताना सरकारला केवळ मी आणि माझे कुटुंब इतकीच चिंता आहे. जनता महागाईने होरपळली तरी मी आणि माझे कुटुंब सुरक्षित म्हणजे जनता सुरक्षित असल्याचा गोड गैरसमज करत सरकार राज्य करत असल्याचा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकरांनी केलाय.

कल्याण : महागाईने जनता हवालदिल झालेली असताना राज्य सरकारला काही देणेघेणे नाही. मी आणि माझे कुटुंब सुरक्षित राहिले म्हणजे सर्व जनता सुरक्षित असल्याचं विद्यमान सरकारला वाटतं, हीच आजची परिस्थिती असल्याचे सांगत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सरकारवर घणाघाती टीका केली आहे. कल्याणच्या एनआरसी कंपनीच्या कामगाराकडून आपल्या हक्काच्या देण्यासाठी सुरु असलेल्या आंदोलनाला आंबेडकर यांनी भेट देत वंचित बहुजन आघाडीचा या लढ्याला पाठिंबा असल्याचे सांगितले.

एनआरसी कंपनीतील कामगारांकडून आपल्या हक्काच्या देण्यांसाठी आणि राहत्या घरांवर कारवाई होऊ नये यासाठी कल्याण मोहने येथे बेमुदत धरणे आंदोल सुरु केलंय. तब्बल 20 दिवसंपासून सुरू असलेल्या या आंदोलनाला आज प्रकाश आंबेडकर यांनी भेट दिली. यानंतर त्यांनी कामगारांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी युनियन लढा देत असून न्यायालयातून कामगाराच्या घरावरील कारवाईला स्थगिती मिळविली आहे. त्यांचा लढा योग्य मार्गाने सुरु असून या लढ्याला आपला पाठिबा असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी बोलताना आंबेडकर यांनी सध्या राज्यात वाढलेल्या महागाईवरुन सरकारवर टीका केली आहे. कोरोना संकटात राज्य सरकारने आवश्यक अन्नधान्याचा पुरेसा साठा करुन ठेवणे गरजेचे होते. म्हणजे आता हा साठा रिलीज करत महागाई आटोक्यात ठेवणे शक्य झाले असते, मात्र सभागृहात एकमेकांचे उणी दुणी काढण्याचे गौडबंगाल असल्यामुळेच महागाई वाढत असल्याचा गंभीर आरोप आंबेडकरांनी केलाय.

तर ठाकरे सरकारच्या मी आणि माझे कुटुंब योजनेची खिल्ली उडवताना महागाई झपाट्याने वाढत असताना सरकारला केवळ मी आणि माझे कुटुंब इतकीच चिंता आहे. जनता महागाईने होरपळली तरी मी आणि माझे कुटुंब सुरक्षित म्हणजे जनता सुरक्षित असल्याचा गोड गैरसमज करत सरकार राज्य करत असल्याचा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकरांनी केलाय. तर विधानसभेत झालेल्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी शिवसेना कधीही हिंदुत्वाचा मुद्दा सोडणार नसल्याचे सांगीतले. तसेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी देखील भाजप सरकारला बाबरीमशीद आपल्यामुळेच पाडल्याचा दावा केल्याची आठवण करून दिली. बाबरी मशिदीच्या मुद्द्यावर समाजवादी आणि सेना हे कायमच वेगवेगळे दिसतील अस वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime News: विक्रोळीतील ज्या घरात वडील-मुलाचा दुर्दैवी अंत झाला, आता 'सील' केलेल्या त्याच घराला लागली भीषण आग; सिलिंडरचाही स्फोट, नेमकं काय घडलं?
विक्रोळीतील ज्या घरात वडील-मुलाचा दुर्दैवी अंत झाला, आता 'सील' केलेल्या त्याच घराला लागली भीषण आग; सिलिंडरचाही स्फोट, नेमकं काय घडलं?
Maratha Reservation Hearing: मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
BMC iPads News: मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांना मिळणार आयपॅड; कारभार कागदविरहित करण्यासाठी प्रशासनाची तयारी 
मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांना मिळणार आयपॅड; कारभार कागदविरहित करण्यासाठी प्रशासनाची तयारी 

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
झारखंडमध्येही विद्यार्थ्यांवर लाठीमार, काटेरी तारांचं कुंपण भेदून विद्यार्थी विधानसभेसमोर पोहोचले, नऊ दिवसांपासून उपोषणावर असलेले देवेंद्रनाथ सुद्धा आंदोलनात
झारखंडमध्येही विद्यार्थ्यांवर लाठीमार, काटेरी तारांचं कुंपण भेदून विद्यार्थी विधानसभेसमोर पोहोचले, नऊ दिवसांपासून उपोषणावर असलेले देवेंद्रनाथ सुद्धा आंदोलनात
अवघ्या दोन आठवड्यापूर्वीं शरद पवार भेटल्यानंतर आता सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदारांसह पीएम मोदींच्या भेटीला; अर्ध्या तासाच्या बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी समोर
अवघ्या दोन आठवड्यापूर्वीं शरद पवार भेटल्यानंतर आता सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदारांसह पीएम मोदींच्या भेटीला; अर्ध्या तासाच्या बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी समोर
Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'
Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'
Raigad Accident News: चालकांचे नियंत्रण सुटले अन् रायगडमध्ये दोन एसटीचा भीषण अपघात, एक झाडावर आदळली, दुसरी रस्त्याच्या कडेला घसरली, PHOTO
चालकांचे नियंत्रण सुटले अन् रायगडमध्ये दोन एसटीचा भीषण अपघात, एक झाडावर आदळली, दुसरी रस्त्याच्या कडेला घसरली, PHOTO
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'

Embed widget