'माझ्या बापाला कुणी मारलं, मला माहित आहे पण...', भाजपच्या जागर यात्रेत पूनम महाजनांचा आरोप
Poonam Mahajan : माझ्या बापाला कुणी मारले, मला माहित आहे पण त्या मागील मास्टरमाइंड कोण होते? तेव्हा तुम्ही सत्तेत होतात, असा आरोप खासदार पूनम महाजन यांनी केला आहे.
Poonam Mahajan : माझ्या बापाला कुणी मारले, मला माहित आहे पण त्या मागील मास्टरमाइंड कोण होते? तेव्हा तुम्ही सत्तेत होतात, असा आरोप खासदार पूनम महाजन यांनी केला आहे. त्या मुंबईत भाजपच्या जागर मुंबईचा या कार्यक्रमात बोलत होत्या. यावेळी पूनम महाजन यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. त्या म्हणाल्या की, तुम्ही जर 50-50 चा फॉर्मुला वापरत होतात तर मुंबईमध्ये भाजपला महापौरपद पहिल्यांदा का दिलं नाही?
खासदार पूनम महाजन यांनी आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. मुंबईकर आणि मराठी माणसाचे नाव घेऊन उद्धवजींच्या शिवसेनेने राजकारण केले. आज वांद्रे पूर्व येथून जागर मुंबईचा अभियानाची पहिली सभा होत आहे. हा जागर कशासाठी हे सांगताना पूनम महाजन म्हणाल्या की, मुंबईकरांना हक्काचे घर देण्यासाठी, सरंक्षण खात्याच्या, रेल्वेच्या, विमानतळाच्या, सरकारी वसाहतीमध्ये, फनल झोनमध्ये अडकलेल्या, रखडलेल्या एसआरए प्रकल्पामधील सर्व रहिवाशांना हक्काचे घर देण्यासाठी हा जागर होत आहे. हा जागर कशासाठी तर ट्राफिकची समस्या सोडविण्यासाठी. तसेच अद्ययावत हॉस्पिटल आणि आरोग्य केंद्र उभारण्यासाठी हा जागर होत असल्याची भूमिका त्यांनी मांडला. आश्वासन नाही तर आता निर्णय होणार, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
या सभेला खासदार पूनम महाजन यांनी ही सभेला संबोधित करताना शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला. मराठी- गुजराती असा वाद निर्माण करताय? पण तुम्हाला याचा विसर का पडलाय की गुजरातचा भाजपाचे अध्यक्ष मराठी आहेत. गुजरात मध्ये मराठी माणस हा झेंडा फडकवला त्याचा तुम्हाला अभिमान नाही का? मुंबईतील हा जागर अनेक प्रश्न विचारणार आहेच पण न सुटलेल्या मुंबईकरांच्या प्रश्नांचा जाब ही विचारणार आहे , असेही खासदार पुनम महाजन यांनी स्पष्ट केले. यावेळी आमदार अँड पराग अळवणी यांचेही भाषण झाले.
लांगुलचालन... तुष्टीकरण... भ्रष्टाचार... घराणेशाही...या विरोधात निर्णायक लढा
— BJP Mumbai (@BJP4Mumbai) November 6, 2022
'जागर मुंबईचा' याच्या १ ल्या जाहीर सभेचा शुभारंभ झाला. यावेळी भाजपा मुंबई अध्यक्ष आ.ॲड. @ShelarAshish ,उत्तर मध्य जिल्ह्याच्या खा. @poonam_mahajan , विलेपार्लेचे आ. @parag_alavani १/२
#जागर_मुंबईचा pic.twitter.com/McrX6ruxRD
आशिष शेलार यांच्या उपस्थित मुंबईमध्ये भाजपची जागर मेळाव्याला सुरुवात झाली. यामध्ये भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शवली होती. यावेळी बोलताना आशिष शेलार यांनी चौफेर टीका केली. ते म्हणाले की, 'आजपासून जागर मुंबईचा हा कार्यक्रम सुरुवात होत आहे. मात्र ही सभा वांद्रे येथे का होत आहे? हा चर्चेचं विषय आहे. जागर मुंबईत होणारी सभा ही मतदारासाठी नाही तर मुंबईकरांना जागृत करणारी सभा आहे.' पूनम ताईंनी माझं काम सोपं केलं. जागर मुंबई चर्चेचा विषय ठरला आहे. सर्वच प्रश्ननांची उत्तर टप्या टप्याने मिळतील. मतांसाठी ही सभा नाही, मुंबईकरांना जागृत करण्यासाठी ही सभा आहे. जागर, नवरात्रात आम्ही देवी जागृत करतो. रक्षाचा संहर करण्यासाठी ही प्रथा परंपरा आहे. गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारने पळवले कळलेलंच नाही. जो घरात बसून बोललो आणि लोकांत गेले नाही, असा टोला शेलार यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.
पूनम महाजन यांनी जागर याचा अर्थ सांगितला. मुख्यमंत्री बनवून काय केले? अडीच वर्ष सत्ता उपभोगले, नंतर डोळा मुंबई महापालिकेवर आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे दबा धरून बसले आहेत, असा टोला शेला यांनी लगावला. यांनी अडीच वर्षात जनतेची काय कामे केले सांगा. मुंबई महापलिका जाऊ पाहत आहे. शेवटचा रडीचा डाव, मराठी मुस्लिमचा नारा देत आहेत, असेही शेलार म्हणाले. कोकणातील आमचा मुस्लिम माणूस काहीच वेगळं मागत नाही. पाठिंबा घेण्यासाठी मराठी गुजराथीला विरोधी का? मराठी उत्तर भारतीयांना विरोध का? मराठी माणूस, सर्व जातीचा माणूस आम्हला मत देईल, असा विश्वास शेलार यांनी यावेळी व्यक्त केला. आम्ही सबका साथ सबका विकास याप्रमाणे काम करत आहोत. 25 वर्ष पालिकेवर यांची सत्ता होती. तुम्हाला जाती धर्मावर मत मागण्याची वेळ का आली?असा प्रश्न शेलार यांनी ठाकरेंना विचारला. दुसऱ्या ना तोतया बोलत आहेत, खरे पाहायला गेले तर हेच अडीच वर्षेतले तोतया आहेत, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.