एक्स्प्लोर

परीक्षा घेण्यावरुन राष्ट्रीय पातळीवरही विरोध, राहुल गांधीपाठोपाठ अरविंद केजरीवालही आक्रमक, मोदींना पत्र

महाराष्ट्र, पंजाब, हरियाणा, राजस्थान, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, ओडिशा या राज्यांनी आपल्या आपल्या राज्यात परीक्षा रद्द केलेल्या होत्या. त्यात आज दिल्लीचीही भर पडली. दिल्ली सरकारने आपल्या अखत्यारित येणाऱ्या महाविद्यालयांमध्ये अंतिम वर्गाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला.

नवी दिल्ली : अंतिम वर्षाच्या परीक्षांवरुन महाराष्ट्रात सुरु असलेलं राजकारण आता राष्ट्रीय पातळीवर पोहचल्याचं दिसत आहे. काल काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी परीक्षा रद्द केल्याची मागणी केली होती. त्यानंतर आज दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनीही याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलेलं आहे.

यूजीसीच्या सुधारित गाईडलाईन्स आल्या त्याआधीच देशातल्या सात राज्यांनी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. महाराष्ट्र, पंजाब, हरियाणा, राजस्थान, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, ओडिशा या राज्यांनी आपल्या आपल्या राज्यात परीक्षा रद्द केलेल्या होत्या. त्यात आज दिल्लीचीही भर पडली. दिल्ली सरकारने आपल्या अखत्यारित येणाऱ्या महाविद्यालयांमध्ये अंतिम वर्गाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. पाठोपाठ हा निर्णय देशातल्या सर्वच ठिकाणी, सर्वच केंद्रीय विद्यापीठांसाठीही लागू व्हावा, अशी मागणी करत अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं आहे.

दिल्ली मधील विद्यापीठांच्या परीक्षा रद्द; लवकरचं पदवी प्रमाणपत्र मिळणार : मनीष सिसोदिया

आयआयटी सारख्या देशातल्या नामांकित संस्थांनीही आधीच्या सेमिस्टरच्या आधारे पदवी दिलेली आहे. संकट अभूतपूर्व असल्याने अभूतपूर्वच निर्णय घ्यावे लागतील, असं अरविंद केजरीवाल यांनी या पत्रात म्हटलं आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय, यूजीसी हे काही ऐकायच्या मनस्थितीत नाहीत, त्यामुळे पंतप्रधानांनी स्वत: या प्रकरणात लक्ष घालून निर्णय करावा असं केजरीवाल यांनी म्हटलं आहे.

त्यामुळे आता देशातले अनेक पक्ष या मुद्द्यावरुन सरकारवर दबाव आणताना दिसत आहेत. यूजीसीच्या सुधारित गाईडलाईन्सनंतरही परीक्षा घेण्याबाबत कुणाचीही अनुकूलता दिसत नाही. कालच काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी देशभरात स्पीक अप फॉर स्टुडंट्स असं अभियान करुन परीक्षा रद्द करण्याची मागणी केली होती. कोविडच्या या संकटात परीक्षांचा हट्ट धरणं हे विद्यार्थ्यांवर अन्यायकारक असल्याचं राहुल गांधींनी म्हटलं होतं.

Rahul Gandhi On UGC | कोरोना संकटात परीक्षा घेणं अन्यायकारक : राहुल गांधी

महत्त्वाच्या बातम्या

Sushma Andhare : नागपूरच्या एकाच सेंटरवरून 24 विद्यार्थी कसे टॉपर? माथाडी निरीक्षक भरतीत घोटाळा झाल्याचा सुषमा अंधारेंचा आरोप, MPSC चे स्पष्टीकरण
नागपूरच्या एकाच सेंटरवरून 24 विद्यार्थी कसे टॉपर? माथाडी निरीक्षक भरतीत घोटाळा झाल्याचा सुषमा अंधारेंचा आरोप, MPSC चे स्पष्टीकरण
Nana Patekar Condolence Meet Varsha Usgaonkar: 'स्वतःला मोठ्ठी हिरोईन समजतेस का?', नाना पाटेकरांनी वर्षा उसगावकरांना सुनावलेलं, नेमकं काय घडलेलं?
'स्वतःला मोठ्ठी हिरोईन समजतेस का?', नाना पाटेकरांनी वर्षा उसगावकरांना सुनावलेलं, नेमकं काय घडलेलं?
Nana Patekar Condolence Meet Jaywant Wadkar: नाना पाटेकरांच्या शोकसभेत जयवंत वाडकरांकडे सगळे पाहतच राहिले, खुर्चीवर न बसता जमिनीवर बसले, नेमकं काय घडलं? VIDEO
नाना पाटेकरांच्या शोकसभेत जयवंत वाडकरांकडे सगळे पाहतच राहिले, खुर्चीवर न बसता जमिनीवर बसले, नेमकं काय घडलं? VIDEO
Tukaram Mundhe on Nana Patekar: नाना पाटेकरांनी फोनवर बोललेलं 'ते' शेवटचं वाक्य आज मनाला बोचतंय, तुकाराम मुंढे शोकसभेत सर्वांदेखत भावूक झाले
नाना पाटेकरांनी फोनवर बोललेलं 'ते' शेवटचं वाक्य आज मनाला बोचतंय, तुकाराम मुंढे शोकसभेत सर्वांदेखत भावूक झाले

व्हिडीओ

Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मग शक्तिपीठ महामार्गासाठी हजारो कोटी रुपये कुठे येत आहेत? जयंत पाटलांचा हल्लाबोल, सतेज पाटील म्हणाले, प्रकल्प माथ्यावर मारून शेतकरी उद्ध्वस्त का करताय?
मग शक्तिपीठ महामार्गासाठी हजारो कोटी रुपये कुठे येत आहेत? जयंत पाटलांचा हल्लाबोल, सतेज पाटील म्हणाले, प्रकल्प माथ्यावर मारून शेतकरी उद्ध्वस्त का करताय?
Pune Crime News: गैरहजेरीचा जाब विचारल्याने वरिष्ठांशी वाद; 'मी आयुष्य संपवतोय..'! मेसेज पाठवून अंमलदार बेपत्ता; पोलिसांची काही तास धावपळ, नंतर एका बारमध्ये...,पुण्यातील घटना
गैरहजेरीचा जाब विचारल्याने वरिष्ठांशी वाद; 'मी आयुष्य संपवतोय..'! मेसेज पाठवून अंमलदार बेपत्ता; पोलिसांची काही तास धावपळ, नंतर एका बारमध्ये...,पुण्यातील घटना
Abhijeet Dipke on Imran Khan: 'अमेरिकन मेरी मिल्बेन भाजपच्या बाजूनं बोलू शकते, पण इम्रान खान OCI कार्डधारक असूनही भाजपच्या विरोधात..' अभिजित दिपकेंचा हल्लाबोल
'अमेरिकन मेरी मिल्बेन भाजपच्या बाजूनं बोलू शकते, पण इम्रान खान OCI कार्डधारक असूनही भाजपच्या विरोधात..' अभिजित दिपकेंचा हल्लाबोल
SBI: स्टेट बँक ऑफ इंडियाचा ग्राहकांना धक्का, रेपो रेट वाढताच व्याज दर वाढवले, EMI महागणार, काय बदल झाले? जाणून घ्या
स्टेट बँक ऑफ इंडियाचा ग्राहकांना धक्का, व्याज दर वाढवले, EMI महागणार
Global Diesel Crisis : डिझेलचा भयंकर तुटवडा! दिवाळीनंतर इंधनाचे दर भडकणार? IEA च्या अहवालाने वाढवली धास्ती
डिझेलचा भयंकर तुटवडा! दिवाळीनंतर इंधनाचे दर भडकणार? IEA च्या अहवालाने वाढवली धास्ती
Gold Rate Today: सोन्याचे भाव पुन्हा कोसळले; दर घसरण्यामागची काय आहेत कारण? जाणून घ्या किंमत
सोन्याचे भाव पुन्हा कोसळले; दर घसरण्यामागची काय आहेत कारण? जाणून घ्या किंमत
Thane Crime News: ठाण्यात गुन्हेगारीचा उद्रेक; प्रदीप पूर्णेकरांनंतर आता प्रसिद्ध युट्यूबरला गोळ्या घालून संपवलं, जुन्या पोस्टमध्ये लिहलेलं, माझ्या मृत्यूला..., नेमकं काय घडलं?
ठाण्यात गुन्हेगारीचा उद्रेक; प्रदीप पूर्णेकरांनंतर आता प्रसिद्ध युट्यूबरला गोळ्या घालून संपवलं, जुन्या पोस्टमध्ये लिहलेलं, माझ्या मृत्यूला..., नेमकं काय घडलं?
'आम्हाला कोणीही धमकावू शकत नाही..' सरन्यायाधीश सूर्यकांत यांची टिप्पणी; ज्ञानेश कुमारांसह इतर दोन आयुक्तांना नोटीस, दिल्ली पोलिसांना सुद्धा जंतर मंतरवरून नोटीस धाडली
'आम्हाला कोणीही धमकावू शकत नाही..' सरन्यायाधीश सूर्यकांत यांची टिप्पणी; ज्ञानेश कुमारांसह इतर दोन आयुक्तांना नोटीस, दिल्ली पोलिसांना सुद्धा जंतर मंतरवरून नोटीस धाडली
Embed widget