एक्स्प्लोर
Advertisement
मुलायम सिंहांनी शुभेच्छा दिलेले नेते पुन्हा पंतप्रधान झाले नाहीत : संजय राऊत
आगामी निवडणुकीतही भाजपचाच विजय होऊ दे आणि नरेंद्र मोदीच पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान बनावेत अशा शुभेच्छा समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते मुलायम सिंह यादव यांनी बुधवारी नरेंद्र मोदींना संसदेत दिल्या आहेत.
मुंबई : आगामी निवडणुकीतही भाजपचाच विजय होऊ दे आणि नरेंद्र मोदीच पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान बनावेत अशा शुभेच्छा समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते मुलायम सिंह यादव यांनी बुधवारी नरेंद्र मोदींना संसदेत दिल्या. याबाबत 'एबीपी माझा'शी बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, "मुलायम सिंग यांनी आतापर्यंत ज्या नेत्यांना शुभेच्छा दिल्या, ते नेते पुन्हा पंतप्रधान झाले नाहीत."
राऊत म्हणाले की, "भारतीय जनता पक्षाला मदत लागली तर ती आम्ही करु, परंतु त्यांना गरज लागणार आहे का? कारण त्यांना आता मुलायम सिंह यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. मुलायम सिंगांनी शुभेच्छा दिलेले नेते पुन्हा पंतप्रधान झालेले नाहीत, त्यामुळे आता भाजपला एनडीए मजबूत करावी लागणार आहे."
बुधवारी 16 व्या लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी अखेरचे भाषण केले. या भाषणानंतर समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते मुलायम सिंह यादव यांनी आज नरेंद्र मोदींनी संसदेत शुभेच्छा दिल्या. तसेच आगामी निवडणुकीत आमचे फार उमेदवार निवडून येणार नाहीत, असेही विधान मुलायम सिंह यांनी केल्याने खळबळ उडाली.
भाजपकडून आज व्हॅलेंटाईन्स डेच्या शुभेच्छा आल्या का? या प्रश्नावर उत्तर देताना राऊत म्हणाले की, "आम्ही संक्रांत साजरी करतो, त्यामुळे तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. आम्ही डे पाळत नाही, डे साजरे करून प्रेम करता येत नाही. प्रेमात भावना असते, आदर असेल तर प्रेमही होतं, त्यानंतर लग्न होतं, संसार होतो, परंतु जुळलं नाही, तर काडीमोड होतो.
वाचा : भाजपचा विजय व्हावा, नरेंद्र मोदीच पंतप्रधान व्हावेत, मुलायम सिंहांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement