एक्स्प्लोर
मुंबईत मद्यपी पोलिसांचा धिंगाणा, तृतीयपंथियांशी अश्लील वर्तन

मुंबई : मुंबईच्या मालवणीमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याने दारु पिऊन अक्षरश: धिंगाणा घातला. पोलिसाचा हा तमाशा एका नागरिकाने कॅमेरात कैद केला आहे. तृतीयपंथीयांशी या पोलिसाने अश्लील वर्तन केल्याचाही आरोप होत आहे. रविवारी रात्री 8 वाजताची ही घटना घडल्याची माहिती आहे. एका नागरिकानं हा व्हिडिओ रेकॉर्ड केला. यावेळी नशेत असलेल्या पोलिसाने उपस्थित नागरिकांना मारण्याची धमकीही दिली. हातात ऊस आणि दारुची बाटली घेऊन परिसरातल्या अवैध व्यवसायावर कारवाई करायची असल्याचं हा मद्यपी पोलिस बोलत होता. हा धिंगाणा घालणाऱ्या पोलिसाचं नाव आर ए पवार असल्याची माहिती मिळते. पोलिसाच्या या धांगड-धिगाण्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पाहा व्हिडिओ :
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
विश्व
विश्व























