एक्स्प्लोर
Advertisement
पोलिसांची ड्युटी 8 तास करण्याचे प्रयत्न, मुंबई पोलीस आयुक्तांची माहिती
hdjeमुंबई : पोलिसांची ड्युटी 8 तासांवर करण्याचे प्रयत्न असल्याची माहीती मुंबई पोलीस आयुक्त पडसलगीकरांची प्रसारमाध्यमांना दिली आहे. पोलिसांवरचा कामाचा ताण कमी करण्यासाठी हे पाऊल महत्वाचं ठरणार आहे.
प्रायोगिक तत्त्वावर देवनारमधील पोलिसांना आठ तासांची ड्युटी देण्यात आली आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास अन्य पोलिस ठाण्यांतही आठ तासांची ड्युटी देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी दिली.
पोलिसांचे कामकाज पेपरलेस होणार
पोलिसांचे कामकाज पारदर्शक होऊन भ्रष्टाचाराला आळा बसावा, यासाठी मुंबई पोलिस दलातील कामकाज लवकरच पेपरलेस करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी दिली.
एखाद्या गुन्ह्यासंबंधीची प्राथमिक माहिती नोंदवल्यानंतर त्याची प्रत संबंधिताला इंटरनेटवर देणेही शक्य होईल, असे पडसलगीकर म्हणाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
पुणे
निवडणूक
निवडणूक
Advertisement