एक्स्प्लोर
मनसेच्या मोर्चाला परवानगी दिली नसली तरी नाकारलीही नाही
मनसेच्या संताप मोर्चाला पोलिसांची परवानगी मिळालेली नाही. परवानगी नसतानाही मोर्चा काढण्यावर मनसे ठाम आहे. पोलिसांनी कागदोपत्री परवानगी दिली नसली तरी परवानगी नाकारलेलीही नाही.
मुंबई : एलफिन्स्टन घटनेच्या निषेधार्थ आणि रेल्वेच्या विविध प्रश्नावर आज चर्चगेट येथे मनसेतर्फे मोर्चा काढण्यात येणार आहे. मात्र, अद्याप मनसेच्या या मोर्चाला पोलिसांची परवानगी मिळालेली नाही. परवानगी नसतानाही मोर्चा काढण्यावर मनसे ठाम आहे. पोलिसांनी कागदोपत्री परवानगी दिली नसली तरी परवानगी नाकारलेलीही नाही.
मनसेच्या मोर्चाला परवानगी न मिळण्यामागे हायकोर्टाच्या आदेशाची पार्श्वभूमी आहे. कारण मुंबईत मोर्चासाठी आझाद मैदान ही जागा ठरवण्यात आलेली आहे. वाहतूक कोंडी आणि इतर समस्यांमुळे मुंबईत मोर्चासाठी परवानगी दिली जात नाही.
मनसे ज्या भागात मोर्चा काढणार आहे, तो परिसर अत्यंत वर्दळीचा आहे. चर्चगेट परिसरात मंत्रालय आणि इतर मोठी कार्यालये आहेत. त्यामुळे सकाळच्या वेळेला मोर्चा काढल्यानंतर वाहतूक कोंडी होऊ शकते.
मनसे मोर्चावर ठाम
पोलिसांनी मोर्चाला अद्याप परवानगी दिली नसली तरी मनसे मोर्चावर ठाम आहे. या मोर्चाला अनेक मराठी सेलिब्रिटींनीही पाठिंबा दिला आहे. पोलिसांनी परवानगी नाकारलेली नसली तरी कागदोपत्री परवानगी दिलेली नाही. त्यामुळे मनसेच्या मोर्चाकडे लक्ष लागलं आहे.
मोर्चा कसा असेल?
- सकाळी 11.30 वाजता मेट्रो सिनेमागृह चौकात राज ठाकरेंचं आगमन होईल
- राज ठाकरे आल्यानंतर मोर्चा सुरु होईल
- महर्षी कर्वे रोड मार्गे मोर्चा रवाना होईल
- चर्चगेटच्या पश्चिम रेल्वे मुख्यालयजवळ मोर्चा येईल
- राज ठाकरे आणि विविध रेल्वे प्रवासी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचं शिष्टमंडळ पश्चिम रेल्वेच्या मुख्यालयात जातील
- मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची भेट घेतील
- चर्चेनंतर राज ठाकरे मोर्चेकरांना संबोधित करतील
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement