एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
BEST | बेस्ट बसमध्ये प्रवाशांच्या वस्तू चोरणाऱ्या टोळीच्या सुत्रधाराला अटक
मुंबईत बेस्ट बसने प्रवास करणाऱ्यांची संख्या भरपूर आहे. त्यामुळे या बस नेहमीच खचाखच भरलेल्या पाहायला मिळातात. याच गर्दीचा फायदा घेऊन एक टोळी बसमध्ये प्रवाशांच्या मौल्यवान वस्तुंची चोरी करायची. या टोळीच्या म्होरक्याला मुंबई पोलीसांनी अटक केली आहे.
मुंबई : तुम्ही जर बेस्ट बसने प्रवास करत असाल तर आता निश्चिनत व्हा, गेल्या काही दिवसांनमध्ये बेस्ट बसमध्ये तुमच्या वस्तू चोरी गेल्या असतील तर बहुदा याच टोळीने ते चोरल्या असण्याची शक्यता आहे. मुंबईच्या बीएसटी बसमध्ये चोऱ्या करणाऱ्या एका टोळीच्या मुख्य आरोपीला मुंबई गुन्हे शाखेने जेरबंद केल आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून ही टोळी कार्यरत असून मुंबईतील विविध पोलीस स्टेशनमध्ये यांच्या विरोधात गुन्हे दाखल आहेत. या टोळीचा मुख्य आरोपी अस्लम शेख याला गुन्हे विभागाने अटक केली आहे.
मुंबईतील सामन्यांची मुख्य वाहतूक म्हणून बेस्ट बसची ओळख आहे. लाखो लोक रोज बेस्टने ये-जा करत असतात. याचाच फायदा ही टोळी घ्यायची. अस्लम शेख सोबत त्याचे इतर सहा साथीदारांच्या शोधात पोलिस आहेत, ही लोकं बीएसटी बस मध्ये चढायचे आणि ज्याला लुटायचा आहे ,त्याच्यावर लक्ष ठेवून असायचे. अस्लम शेख बरोबर असलेली सहा लोकं त्या व्यक्तीच्या अवतीभवती जमायचे आणि अस्लम शेख हा पाकीट मारण्यात आणि बॅग हिसकावण्यात अतिशय चपळ आणि हुशार होता. त्यामुळे तो ते काम करायचा. अस्लम शेख हा विक्रोळी पार्कसाईट येथे राहणारा असून तो या टोळीचा मुखीया ज्याला पोलिसांच्या भाषेत मशीन म्हटलं जातं तो होता.
टोळी लवकरच गजाआड होणार -
ही टोळी कुर्ला ते अंधेरी या भागात चोऱ्या करत होती. आठवड्यातुन चार दिवस ही टोळी सक्रिय होऊन बेस्ट बसमध्ये चोऱ्या करायची आणि नंतर फरार होत असे. सध्या या टोळीचा मुखीया असलेला अस्लम शेख याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. आता त्याच्या 6 साथीदारांचा पोलिस शोध आहेत. ही टोळी मुख्यतो बेस्ट बसमधेच चोऱ्या करायची आणि बेस्ट मधील प्रवाशी यांना लक्ष्य करायची. त्यामुळे आता बेस्टमध्ये होणाऱ्या चोऱ्यांना आळा नक्कीच बसेल, अशी शक्यता गुन्हे विभागाने वर्तवली आहे.
संबंधित बातम्या :
नाशकात शटर वाकवत आयफोन शो रुममधून तब्बल 75 लाखांचा ऐवज लंपास
अमरावतीत धुमाकूळ घालणाऱ्या 'बंटी-बबली'ला बेड्या, चक्रावून टाकणारी चोरीची पद्धत
तुळजाभवानीचे दागिने पुन्हा गायब; मंदिर समितीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचं कृत्य
Galor Gang | Wooden Slingshot | काच फोडून कारची चोरी, औरंगाबादमध्ये टोळी गजाआड | ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement