एक्स्प्लोर

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (रविवार) एक दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. मोदींच्या हस्ते नवी मुंबई इथल्या आंतरराष्टीय विमानतळाचं भूमीपूजन होणार आहे.

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (रविवार) एक दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. मोदींच्या हस्ते नवी मुंबई इथल्या आंतरराष्टीय विमानतळाचं भूमीपूजन होणार आहे. त्यानंतर दुपारी २ च्या सुमारास वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स इथं मॅग्नेटिक महाराष्ट्राचं मोदींच्या हस्ते उद्घाटन होईल. यानंतर मोदी उपस्थितांनाही संबोधित करणार आहेत. दुसरीकडे या संपूर्ण कार्यक्रमात शिवसेनेला मात्र डावलण्यात आलं आहे. त्यामुळे नवी मुंबई विमानतळाच्या भूमीपूजनाच्या कार्यक्रमावर शिवसेना बहिष्कार टाकणार आहे. या कार्यक्रमात शिवसेनेचे नेते उपस्थित राहणार नाहीत. शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींना डावलले जात असल्याचा आरोप करत विमानतळ भूमीपूजनाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच स्थानिक शिवसैनिक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काळे झेंडे दाखवून निषेधही व्यक्त करणार आहेत. सेना-भाजपमधील धुसफूस शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या कार्यकारिणीत जाहीर केले की, आगामी निवडणुका शिवसेना स्वबळावर लढेल. त्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. मात्र मध्यंतरी भाजपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विधानसभेसाठी शिवसेनाला 140 जागा देण्याचा भाजपचा प्रस्ताव आहे. त्यामुळे भाजपने सेनेला गोंजारण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटले जात होते. मात्र जागांच्या प्रस्तावाच्या वृत्त सेनेने फेटाळले. शिवेसेना आणि भाजप हे दोन्ही पक्षा राज्य आणि केंद्रातील सत्तेत एकत्र नांदत असले, तरी त्यांच्या नांदण्यात आनंददायी नातं आहे, अशातला भाग नाही. कारण दोन्ही पक्षांमधील नेत्यांनी कायमच एकमेकांवर टीका केली आहे. आज (रविवार) नवी मुंबई विमानतळाच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमाला येणार आहेत. याच कार्यक्रमाचे आमंत्रण नसल्याचे कारण देत शिवसेनेने त्यावर बहिष्कार टाकला आहे. संबंधित बातम्या :
नवी मुंबई विमानतळाच्या भूमीपूजनावर शिवसेनेचा बहिष्कार
17

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Accident CCTV Footage: कोस्टल रोडच्या पुलावरुन बीएमडब्ल्यू खाली पडतानाचं CCTV दृश्यं, कार 50 फुटावरुन खाली आपटली, गाडीचा चेंदामेंदा
कोस्टल रोडच्या पुलावरुन बीएमडब्ल्यू खाली पडतानाचं CCTV दृश्यं, कार 50 फुटावरुन खाली आपटली, गाडीचा चेंदामेंदा
Mumbai News: कृत्रिम तलावात उतरला विद्युत प्रवाह! कृत्रिम तलावात गौरी-गणपती विसर्जनावेळी शॉक लागून मृत्यू, बायकोनंतर मुलगाही गमावला; वृद्ध वडिलांचा आक्रोश, नागरिकांचा संताप
कृत्रिम तलावात उतरला विद्युत प्रवाह! कृत्रिम तलावात गौरी-गणपती विसर्जनावेळी शॉक लागून मृत्यू, बायकोनंतर मुलगाही गमावला; वृद्ध वडिलांचा आक्रोश, नागरिकांचा संताप
Mumbai Crime News: 37 लाखांचं पॅकेज, मुंबईत फ्लॅट अन् विचित्र अट; वसईतील डॉक्टर तरुणीला मॅट्रिमोनियल साईटवर भलताच अनुभव, भामट्याचा भयानक प्लॅन उघड!
37 लाखांचं पॅकेज, मुंबईत फ्लॅट अन् विचित्र अट; वसईतील डॉक्टर तरुणीला मॅट्रिमोनियल साईटवर भलताच अनुभव, भामट्याचा भयानक प्लॅन उघड!
Mumbai Accident Costal Road : मुंबईच्या कोस्टल रोडवरुन गुजरातची भरधाव BMW कार 50 फूट खाली कोसळली, गाडीचा चेंदामेंदा, भीषण अपघातात तिघांचा मृत्यू
मुंबईच्या कोस्टल रोडवरुन भरधाव BMW कार 50 फूट खाली कोसळली, गाडीचा चेंदामेंदा, भीषण अपघातात तिघांचा मृत्यू

व्हिडीओ

Sangli krishna river : दूषित पाणी थेट नदीत, कृष्णेचा रंग बदलला Special Report
Mumbai IIT Students Protest : विद्यार्थ्याचा मृत्यू, कॅम्पस हादरला; IIT बॉम्बेच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन
Nithari Kand Surendra Koli : 'निठारी'तून मुक्तता सुटकेनंतर शेवट! | Special Report ABP Majha
Mamata Banerjee TMC News : ठाकरे आणि पवार आता ममताही बेजार? | Special Report ABP Majha
Manoj Jarange Attack : मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं, आरोपांनी घेरलं Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitesh Rane : काल दिशा सालियनच्या वडिलांनी मातोश्रीवर जाऊन ठाकरेंना नोटीस दिली अन् आज नितेश राणेंंचं मोठं वक्तव्य, म्हणाले...
काल दिशा सालियनच्या वडिलांनी मातोश्रीवर जाऊन ठाकरेंना नोटीस दिली अन् आज नितेश राणेंंचं मोठं वक्तव्य, म्हणाले...
Mumbai News: कृत्रिम तलावात उतरला विद्युत प्रवाह! कृत्रिम तलावात गौरी-गणपती विसर्जनावेळी शॉक लागून मृत्यू, बायकोनंतर मुलगाही गमावला; वृद्ध वडिलांचा आक्रोश, नागरिकांचा संताप
कृत्रिम तलावात उतरला विद्युत प्रवाह! कृत्रिम तलावात गौरी-गणपती विसर्जनावेळी शॉक लागून मृत्यू, बायकोनंतर मुलगाही गमावला; वृद्ध वडिलांचा आक्रोश, नागरिकांचा संताप
Mumbai Crime News: 37 लाखांचं पॅकेज, मुंबईत फ्लॅट अन् विचित्र अट; वसईतील डॉक्टर तरुणीला मॅट्रिमोनियल साईटवर भलताच अनुभव, भामट्याचा भयानक प्लॅन उघड!
37 लाखांचं पॅकेज, मुंबईत फ्लॅट अन् विचित्र अट; वसईतील डॉक्टर तरुणीला मॅट्रिमोनियल साईटवर भलताच अनुभव, भामट्याचा भयानक प्लॅन उघड!
Ketan Agrawal Case : चॅट जीपीटी, क्राईम पॉडकास्ट, मेघालयची ‘सोनम केस’, खुनाचे सिनेमे, ‘माही’चं फेक अकाऊंट अन् सरप्राईज पार्टीचा ट्रॅप, केतनला लोहगडावरून ढकलण्याआधी तिघांनी केलेला हादरवणारा प्लँन
चॅट जीपीटी, क्राईम पॉडकास्ट, मेघालयची ‘सोनम केस’, खुनाचे सिनेमे, ‘माही’चं फेक अकाऊंट अन् सरप्राईज पार्टीचा ट्रॅप, केतनला लोहगडावरून ढकलण्याआधी तिघांनी केलेला हादरवणारा प्लँन
Mumbai Accident CCTV Footage: कोस्टल रोडच्या पुलावरुन बीएमडब्ल्यू खाली पडतानाचं CCTV दृश्यं, कार 50 फुटावरुन खाली आपटली, गाडीचा चेंदामेंदा
कोस्टल रोडच्या पुलावरुन बीएमडब्ल्यू खाली पडतानाचं CCTV दृश्यं, कार 50 फुटावरुन खाली आपटली, गाडीचा चेंदामेंदा
Pune News: मलेशियाला 'बिझनेस ट्रिप'ला जातो सांगून पुण्याचा उद्योगपती गर्लफ्रेंडसोबत फिरायला निघाला; मुंबई विमानतळावर पासपोर्टमुळे 'ड्रामा' अन् बायकोने दाखल केली अपहरणाची केस, नेमकं काय घडलं?
मलेशियाला 'बिझनेस ट्रिप'ला जातो सांगून पुण्याचा उद्योगपती गर्लफ्रेंडसोबत फिरायला निघाला; मुंबई विमानतळावर पासपोर्टमुळे 'ड्रामा' अन् बायकोने दाखल केली अपहरणाची केस, नेमकं काय घडलं?
Maharashtra Weather Updates: 23 सप्टेंबरपर्यंत 'अलर्ट मोड'! मान्सून मागे फिरला तरी महाराष्ट्रात धो-धो पाऊस बसरणार, विदर्भ, मराठवाड्यात चार दिवस मोठ्या पावसाची शक्यता, वाचा हवामान विभागाचा अंदाज
23 सप्टेंबरपर्यंत 'अलर्ट मोड'! मान्सून मागे फिरला तरी महाराष्ट्रात धो-धो पाऊस बसरणार, विदर्भ, मराठवाड्यात चार दिवस मोठ्या पावसाची शक्यता, वाचा हवामान विभागाचा अंदाज
Chinchpokli Cha Chintamani 2026 : चिंचपोकळीत बाप्पाच्या दर्शनासाठी भक्तांची झुंबड; चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी भाविक आतुर, पाहा PHOTOS
चिंचपोकळीत बाप्पाच्या दर्शनासाठी भक्तांची झुंबड; चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी भाविक आतुर, पाहा PHOTOS
Embed widget