एक्स्प्लोर
Advertisement
पेंग्विनचा वाद उच्च न्यायालयात रंगणार!
मुंबई: भायखळ्यातील राणीच्या बागेतील पेंग्विन्सचा वाद आता हायकोर्टात पोहचला आहे. अॅडव्होकेट अद्वैत सेठना आणि राजू ठक्कर यानी याविषयी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेला हायकोर्टात जोरदार विरोध करण्याची तयारी महापालिकेने केल्याची चर्चा आहे.
जुलै 2016 रोजी दक्षिण कोरीयाहून आणलेल्या 8 पैकी एका पेंग्विनचा नोव्हेंबर महिन्यात मृत्यू झाला. यावर या पक्षांना मुंबईतील वातावरणात आणून ठेवणं चुकीचं आहे. महानगरपालिकेच हे कृत्य म्हणजे पेंग्विनच्या जगण्याच्या मुलभूत अधिकारावर गदा आणणारे आहे, असं म्हणलं आहे.
सोमवारी या याचिकेवर सुनावणी होणं अपेक्षित होतं, मात्र हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती चिल्लूर उपस्थित नसल्याने ही सुनावणी होऊ शकली नाही. येत्या आठवड्यात यावर सुनावणी होणे अपेक्षित आहे. तर तिकडे महानगरपालिकेन या याचिकेला हायकोर्टात जोरदार विरोध करण्याची तयारी केल्याची चर्चा आहे.
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या कल्पनेतून तब्बल 433 कोटी रुपये खर्चून राणीच्या बागेचा मेकओव्हर करण्याचा घाट महानगरपालिकेने घातला आहे. त्यासाठी राणीच्या बागेचं तिकीट 10 रुपयाहुन 100 रुपये करण्याचा पालिकेचा विचार आहे. मात्र, या मुद्यावरून आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी हवा तापवायला सुरूवात केली आहे.
दरम्यान, या वादावर स्वाभिमानी नेते आणि आमदार नितेश राणे यांनी आपला विरोध अधिकच तीव्र केला आहे. नितेश राणे यांनी पेंग्विनं दर्शन हा आदित्य ठाकरेंचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. मात्र, जोपर्यंत पेंग्विन प्रकल्प प्रकरणाची लोकायुक्तांकडून चौकशी पूर्ण होत नाही, तोपर्यंत उद्घाटन होऊ देणार नाही अशी भूमिका घेतली आहे.
संबंधित बातम्या
पेंग्विन प्रकल्पाचं उद्घाटन उधळून लावू, नितेश राणेंची शिवसेनेला धमकी
प्रौढांना पुढील दोन महिने पेंग्विनदर्शन नाही, बालकांना मोफत
पेंग्विनची देखभाल करणाऱ्या कंपनीवर मुंबई पालिकेची कारवाई
पेंग्विनला काँग्रेसची श्रद्धांजली, मनसेची लिंबू-मिरची फंडाची मागणी
पेंग्विन मृत्यूप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसची होर्डिंगबाजी
एक पेंग्विन गेला, आता राणीच्या बागेत दुसरा पेंग्विन
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement