एक्स्प्लोर
गणपती विसर्जनाला शिवाजी पार्कवर पार्किंग द्या, प्रशासन कोर्टात

मुंबई : गणपती विसर्जनाच्या दिवशी दादरसह मुंबईतील अनेक परिसरात पार्किंगचा मोठा प्रश्न वाहनचालकांना सतावतो. शिवाजी पार्कवर विसर्जनाच्या दिवशी पार्किंगची परवानगी मिळण्यासाठी मुंबई महापालिका आणि राज्य सरकार हायकोर्टात गेलं आहे.
येत्या दोन महिन्यात पर्यायी जागेचा निर्णय घेणार असल्याचं हमीपत्र द्या, तरच परवानगी द्यायची की नाही त्याबाबत विचार करु, अशा शब्दांत कोर्टानं ठणकावलं आहे. गुरुवारी याबाबत न्यायालयात सुनावणी होणार आहे.
लेखी पत्र दिल्यानंतर सरकार शिवाजी पार्कवर पार्किंगसाठी संमती देण्याबाबत विचार करेल. मात्र पुढच्या वर्षी होणाऱ्या विसर्जनासाठी दादर चौपाटीजवळ पार्किंग शोधण्याचं आव्हान प्रशासनापुढे असणार आहे.
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्राईम
नवी मुंबई
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
























