एक्स्प्लोर
परळ उड्डाणपूल बंद असल्याने वाहतूक कोंडी
परळचा उड्डाणपूल बंद असल्यानं दक्षिण मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.
मुंबई: परळचा उड्डाणपूल बंद असल्यानं दक्षिण मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. अनेक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. लालबाग-परळ-काळाचौकीला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनी दुरुस्तीच्या कामासाठी, कालपासून उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. सध्या वाहतूक उड्डाणपूलाखालून वाहतूक चालू असल्यानं, वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय.
जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामासाठी अजून 6 ते 7 तास लागण्याची शक्यता आहे. वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून सध्या नायगाव आणि माटुंगामार्फत वाहतूक वळवण्यात आली आहे.
काल सकाळी सहाच्या सुमारास ही पाईपलाईन फुटल्याने, ती दुरुस्त करण्याचं काम अजून सुरुच आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
चंद्रपूर
राजकारण
राजकारण
क्राईम
Advertisement