एक्स्प्लोर

Pankaja Munde PA Anant Garje Wife: गौरी गर्जेचा संशयास्पद मृत्यू, पंकजा मुंडेंच्या पीएवर गुन्हा दाखल, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Pankaja Munde PA Anant Garje Wife: सीबीआयची मागणी राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्याकडे केली आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भाष्य केलं आहे.

Anant Garje & Gauri Garje Suicide news: भाजप नेत्या आणि राज्याच्या पर्यावरण तथा पशुसंवर्धन मंंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही माहिती समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. अनंत गर्जे आणि गौरी पालवे यांचे 10 महिन्यांपूर्वी लग्न झाले. मात्र, अनंत गर्जे (Anant Garje) यांच्या विवाहबाह्य संबंधांमुळे पती-पत्नीमध्ये सातत्याने भांडणे व्हायची. याच मानसिक तणावातून केईएम रुग्णालयात डॉक्टर असलेल्या गौरी पालवे गर्जे (Gauri Palve Garje) यांनी आत्महत्या केल्याचे समजते. गौरी पालवे गर्जे यांनी शनिवारी संध्याकाळी आत्महत्या (Suicide news) केल्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठवला होता. मात्र, पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्यामुळे गौरी पालवे गर्जे यांचे कुटुंबीय आक्रमक झाले होते. अखेर रविवारी वरळी पोलिसांनी याप्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. (Mumbai news) तर गौरी पालवे यांच्या मामांनी गर्जेंवर आरोप करत या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, सीबीआयची मागणी राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्याकडे केली आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भाष्य केलं आहे.

Pankaja Munde PA Case: देवेंद्र फडणवीस नेमके काय म्हणालेत?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पंकजा मुंडेंच्या पीएच्या पत्नीने आत्महत्या केली आहे, त्यांच्या कुटुंबीयांनी तुमच्याकडे सीबीआयची मागणी केली या प्रश्नावर बोलताना फडणवीस म्हणाले, अजून माझ्याकडे यासंदर्भातील पूर्ण ब्रिफिंग आलेलं नाही. मला प्राथमिक माहिती मिळाली आहे. एकदा पोलिसांनी पूर्ण ब्रिफिंग केल्यावरच याबाबत बोलता येई, असं फडणवीसांनी म्हटलं आहे.

Pankaja Munde PA Case: या प्रकरणाची सखोल चौकशी सीबीआय मार्फत व्हावी

गौरी पालवेंचे मामा हृषिकेश गर्जे यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटलं आहे की, ही आत्महत्या नसून हत्या आहे. एका कुटुंबाने मिळवून आमच्या गौरीची केलेली हत्या आहे. या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी व्हावी आणि आम्हाला न्याय द्यावा. गौरी ही आत्महत्या करणारी नव्हती, ती संघर्ष करणारी कन्या होती. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मी विनंती करतो की, या प्रकरणाची सखोल चौकशी सीबीआय मार्फत व्हावी आणि इन कॅमेरा पोस्टमार्टम करावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे.

Pankaja Munde PA Case: अनंत गर्जेने मुलीच्या वडिलांना फोन केला अन्...

गौरी पालवे यांचे मामा शिवदास गर्जे म्हणाले की, पंकजाताई यांना हा माणूस माहीत नव्हता की, हा किती नालायकपणा करत आहे. ताईंचा यात काहीही विषय नाही. पण, अनंत गर्जेने मुलीच्या वडिलांना फोन केला अन् लगेच कट केला. त्यानंतर तिच्या आईला फोन करून सांगितले की, तुमच्या मुलीने आत्महत्या केली आहे. तिची डेड बॉडी माझ्यासमोर आहे. दोन-तीन महिन्यांपासून गौरीचे आणि त्याचे वाद सुरू होते. गौरीला त्याचे अफेअरचे काही प्रकरणादेखील माहिती झाले होते. तरीही तिने त्याला माफ केले होते. पण, तिने त्याला पुन्हा चॅटिंग करताना पाहिले. त्यामुळे त्यांचे वाद होत होते. तो तिला खूप टॉर्चर करत होता, असा आरोप त्यांनी केलाय. 

Pankaja Munde PA Case: त्या असल्या नालायक लोकांना...

शिवदास गर्जे पुढे म्हणाले की, त्याने स्वतःच्या हातावर वार करून घेतले होते. तो तिला म्हणायचा की, मी स्वतः मरेल आणि तुला यात गुंतवेन. ती डॉक्टर मुलगी होती. ती लढाऊ मुलगी होती. ती कधीच आत्महत्या करू शकत नाही. पंकजा ताईंना याबाबत काही माहीत नाहीत. त्यांचा काहीही दोष नाही. ताई याला हाकलून देणार, असले नालायक लोक ताई सांभाळत नाही, असे देखील त्यांनी म्हटले. 

'एबीपी माझा'मध्ये कार्यरत. मी मराठी आणि नेटवर्क १८ लोकमत मध्ये कामाचा अनुभव 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Bhuleshwarcha Raja : मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत दुर्घटना, अपघातात दोघांचा मृत्यू, 5 जण जखमी
मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत दुर्घटना, अपघातात दोघांचा मृत्यू, 5 जण जखमी
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
भाड्याने वाहन लावून देण्याचं आश्वासन, महिलेकडून तब्बल 33 लाखांची फसवणूक, दिंडोशी पोलिसांची मोठी कारवाई, आरोपीला मध्य प्रदेशातून अटक 
भाड्याने वाहन लावून देण्याचं आश्वासन, महिलेकडून तब्बल 33 लाखांची फसवणूक, दिंडोशी पोलिसांची मोठी कारवाई, आरोपीला मध्य प्रदेशातून अटक 

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhuleshwarcha Raja : मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात,आगमन मिरवणुकीत घडला प्रकार, तीन जण जखमी
मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत दुर्घटना, अपघातात तीन जण जखमी
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
Embed widget