पंढरपूर मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज, निकाल ऐकायला कोणालाही घराबाहेर पडत येणार नाही : पोलीस अधीक्षक
मतमोजणी केंद्रावर गर्दी झाल्यास आधीच कोरोना स्थिती गंभीर झालेल्या पंढरपूरमध्ये स्थिती अजून खराब होऊ शकते. यासाठी प्रशासन कडक अंमलबजावणी करणार असून मतमोजणी केंद्राकडे येणारे सर्व रस्ते बेरिगेटिंग करून बंद केली जाणार आहेत.
पंढरपूर : पंढरपूर पोटनिवडणुकीच्या प्रचारामुळे पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यात कोरोनाची स्थिती गंभीर बनली असताना आता 2 मे रोजी होणाऱ्या मतमोजणीसाठी प्रशासन सतर्क झाले आहे. कोणालाही मतमोजणी केंद्राजवळ जाऊ दिले नाही, अशी माहिती पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिली आहे.
मतमोजणी केंद्रावर गर्दी झाल्यास आधीच कोरोना स्थिती गंभीर झालेल्या पंढरपूरमध्ये स्थिती अजून खराब होऊ शकते. यासाठी प्रशासन कडक अंमलबजावणी करणार असून मतमोजणी केंद्राकडे येणारे सर्व रस्ते बेरिगेटिंग करून बंद केली जाणार आहेत. याशिवाय जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून कोणालाही मतमोजणी केंद्राकडे येऊ दिले जाणार नसल्याचे तेजस्वी सातपुते यांनी सांगितले. मतमोजणी वेळी उमेदवारांच्या कमीतकमी प्रतिनिधींना कोरोनाचे नियम पाळून मतमोजणी केंद्रात सोडले जाणार आहे. मतमोजणीच्या वेळी अनावश्यक गर्दी होऊन पुन्हा कोरोनाचा फैलाव होऊ दिला जाणार नसल्याचे तेजस्वी सातपुते यांनी सांगितले.
पंढरपूर येथील पोटनिवडणुकीसाठी 15 एप्रिल रोजी मतदान पार पडलं. भाजप उमेदवार समाधान अवताडे आणि राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्यातच ही प्रमुख होत आहे. या निवडणुकीसाठी एकूण 19 उमेदवार निवडणूक रिंगणात असून यात भाजप व राष्ट्रवादी शिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन पाटील , शिवसेना बंडखोर अपक्ष उमेदवार शैला गोडसे , वंचित बहुजन आघाडीचे बिराप्पा मधुकर मोटे आणि सिद्धेश्वर अवताडे हे प्रमुख काही उमेदवार आहेत. यातील सिद्धेश्वर अवताडे हे भाजपच्या समाधान अवताडे यांचे चुलत बंधू असून या निवडणुकीत भाऊ बंधकी भाजपाला अडचणीची ठरायची शक्यता आहे. स्वाभिमानी, वंचित आणि अपक्ष शैला गोडसे यामुळे राष्ट्रवादीच्या अडचणी वाढलेल्या आहेत. भाजप व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी मोठ्या विजयाच्या वल्गना केल्या असल्या तरी हि निवडणूक अतिशय घासून व चुरशीची होणा आहे.
मिस्टर अजित पवार जास्त गमजा मारू नका, कालचक्र फिरत असतं : चंद्रकांत पाटील