एक्स्प्लोर

MPSC पास होऊनही नियुक्ती रद्द प्रकरण, धनंजय मुंडेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

सरकार सर्वोच्च न्यायालयात अपील करणार असून या विद्यार्थ्यांना न्याय नक्की मिळेल, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं धनंजय मुंडे यांनी सांगितलं.

मुंबई : सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकपदाची परीक्षा उत्तीर्ण होऊनही नियुक्ती रद्द झालेल्या विद्यार्थ्यांसाठी विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात अपील करण्याची मागणी धनंजय मुंडे यांनी केली.

नागपूर खंडपीठाने ही निवड प्रक्रिया रद्द ठरवल्याने 833 विद्यार्थ्यांचं स्वप्नभंग झालं. त्यामुळे या विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये आणि त्यासाठी सरकारने सर्वोच्च न्यायालयात अपील करावे अशी मागणी धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.

याबाबत सरकार सर्वोच्च न्यायालयात अपील करणार असून या विद्यार्थ्यांना न्याय नक्की मिळेल, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं धनंजय मुंडे यांनी सांगितलं.

काय आहे प्रकरण?

राज्यातील परिवहन विभागात उच्चशिक्षित तरुणांनी यावे, यासाठी राज्य सरकारने 2016 मध्ये जीआर काढून परीक्षा पात्रतेच्या अटी शिथिल केल्या होत्या. त्याबाबतची माहिती राज्यातील सर्व अभियांत्रिकी महाविद्यालयांना देण्यात आली होती. त्यानुसार 29 जानेवारी 2017 रोजी या परीक्षेची जाहिरात देखील आली. तब्बल चार वर्षांनी आरटीओ परीक्षेची जाहिरात आल्याने राज्यातील 70 हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले. एप्रिलमध्ये घेण्यात आलेल्या पूर्व परीक्षेत यातील 10 हजार विद्यार्थ्यांची निवड झाली. यानंतर हे तरुण नोकऱ्या सोडून या अंतिम परीक्षेच्या अभ्यासाला लागली.

मुख्य परीक्षा 6 ऑगस्ट 2017 रोजी घेण्यात आली आणि याचा निकाल 31 मार्च 2018 रोजी झाला. परीक्षा दिलेल्या 10 हजार विद्यार्थ्यातून 833 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. या यशस्वी विद्यार्थ्यांना निवडीचं पत्रही देण्यात आलं. निवडीची पत्रं मिळाल्याने गावोगावी यशस्वी विद्यार्थ्यांचे सत्कार सोहळे रंगले. तब्बल 70 हजार विद्यार्थ्यांतून निवड होत, आरटीओची सरकारी नोकरी पक्की झाल्याने यशस्वी विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. कुटुंबीयही अभिमानाने मुलांच्या यशाचं कौतुक करत होते.

याच काळात 14 जून 2018 रोजी या मुलांना कागदपत्रे तपासणीसाठी येण्याबाबत कळविण्यात आले. हे सर्व यशस्वी विद्यार्थी कागदपत्रे घेऊन जाणार, तेवढ्यात त्यांना या निवडीवर न्यायालयाकडून स्थगिती आल्याने, निवड प्रक्रिया थांबवण्यात आल्याचं पत्र आलं.

यानंतर आता थेट नागपूर खंडपीठाने ही निवड प्रक्रियाच रद्द ठरवल्याने, या तरुणांच्या आनंदावर विरजण पडलं आहे.  दोन वर्षे नोकऱ्या सोडून आणि रात्रंदिवस अभ्यास करून घडविलेले भविष्य उद्ध्वस्त झाल्याची भावना तरुणांची आहे. यामागे राज्य सरकारचा गलथानपणा असल्यानेच न्यायालयाने विरोधात निकाल दिल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

FDA Action In Mumbai : अस्वच्छ स्वयंपाकगृहे, झुरळ-माशांचा प्रादुर्भाव; FDA ची मुंबईतील प्रतिष्ठित क्लबसह पाच ठिकाणी कारवाई, क्रिकेट क्लब ऑफ इंडियाचा परवाना निलंबित
अस्वच्छ स्वयंपाकगृहे, झुरळ-माशांचा प्रादुर्भाव; FDA ची मुंबईतील प्रतिष्ठित क्लबसह पाच ठिकाणी कारवाई, क्रिकेट क्लब ऑफ इंडियाचा परवाना निलंबित
मराठा आरक्षण कक्ष पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करा, सात दिवसांमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे भरा, विखे पाटलांचे निर्देश 
मराठा आरक्षण कक्ष पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करा, सात दिवसांमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे भरा, विखे पाटलांचे निर्देश 
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
सात बांगलादेशी तृतीयपंथींना मुंबईतून अटक, अवैधरीत्या भारतात प्रवेश करुन चालवत होते सेक्स रॅकेट, MIDC पोलिसांची मोठी कारवाई 
सात बांगलादेशी तृतीयपंथींना मुंबईतून अटक, अवैधरीत्या भारतात प्रवेश करुन चालवत होते सेक्स रॅकेट, MIDC पोलिसांची मोठी कारवाई 

व्हिडीओ

Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report
Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
Chief Minister Wealth : देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे?
देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे? 
Karja Mafi Scheme : पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
Arvind Sawant : जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
L&T Q1 Results: एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
Embed widget