एक्स्प्लोर
Advertisement
'मुंबई हाय'मध्ये सापडला खनिज तेल आणि नैसर्गिक वायूचा मोठा साठा
‘बॉम्बे हाय’ या तेल क्षेत्राजवळच खनिज तेल आणि नैसर्गिक वायूचा मोठा साठा सापडला आहे. ऑईल अॅण्ड नॅचलर गॅस कॉर्पोरेशन या अग्रगण्य सरकारी तेल कंपनीला हा साठा मिळाला.
मुंबई : ‘बॉम्बे हाय’ या तेल क्षेत्राजवळच खनिज तेल आणि नैसर्गिक वायूचा मोठा साठा सापडला आहे. ऑईल अॅण्ड नॅचलर गॅस कॉर्पोरेशन या अग्रगण्य सरकारी तेल कंपनीला हा साठा मिळाला. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी लोकसभेत विचारलेल्या प्रश्नाला लेखी उत्तर देताना ही माहिती दिली.
या साठ्यातून तब्बल 30 दशलक्ष टन तेल आणि तितकाच नैसर्गिक वायू मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येत्या दोन वर्षात हे नवे साठे विकसीत करण्यात येणार आहेत.
धर्मेंद्र मंत्री प्रधान यांनी सांगितले की, "सध्या जेथून उत्पादन घेतले जाते त्या ‘मुंबई हाय तेलक्षेत्रा’च्या पश्चिमेस खोदलेल्या ‘डब्ल्यूओ-24-3’ या विहिरीने या नव्या साठ्यांचा शोध लागला. खोदकामाच्या वेळी जी काही माहिती मिळत गेली, त्याआधारे नऊ ठिकाणची चाचणी करुन, खोदकाम केले. यानंतर या सर्व ठिकाणांतून तेल/वायू प्रवाहित झाला."
दरम्यान, ‘ओएनजीसी’ने या नव्या शोधाची माहिती हायड्रोकार्बन महासंचालकांना दिली असून, या साठ्यांची अधिक विश्वसनीय माहिती गोळा केली जात आहे. निधी व तांत्रिक सज्जता वेळेत झाली तर या नव्या साठ्यांचा विकास करून तेथून येत्या दोन वर्षांत उत्पादन सुरू केले जाऊ शकेल.
भारताच्या दृष्टीकोनातून तेल आणि नैसर्गिक वायूसाठी ‘मुंबई हाय’ हे अतिशय महत्ताचे ठिकाण आहे. देशाच्या एकूण तेल उत्पादनापैकी 44% मुंबई हायमधून मिळते. मुंबई हायचे वार्षिक उत्पादन १६ दशलक्ष टनच्या जवळपास आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
अमरावती
ठाणे
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement