एक्स्प्लोर

बालमजुरी रोखता न येणाऱ्या अधिकाऱ्यांनी घरी बसावं : हायकोर्ट

काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात फौजदारी कारवाई केली तरच ते वठणीवर येतील अशा शब्दात कोर्टाने सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले आहेत.

मुंबई : राज्यात बालमजुरी रोखण्यात अपयशी ठरणाऱ्या कामचुकार अधिकाऱ्यांनी घरी बसावं, अशा शब्दात मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारचे कान उपटले. इतकंच नाही तर काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात फौजदारी कारवाई केली तरच ते वठणीवर येतील अशा शब्दात कोर्टाने सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले आहेत. न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठापुढे यासंदर्भात दाखल सुमोटो प्रकरणाची सुनावणी सुरु आहे. ''अनेकदा मुख्य सचिवांना दिल्लीत सुप्रीम कोर्टातही फटकारलं जातं, तरीही त्यांच्या वृत्तीत फरक पडत नाही. जर सुप्रीम कोर्टाने झापल्यानंतरही फरक पडत नसेल तर आमच्या आदेशांनी काय फरक पडेल? आपण काही तरी केलं पाहिजे हे तुमच्या मनातून यायला हवं, तरंच परिस्थितीत काही बदल होईल. तुमचं काम हे फक्त सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत ऑफिसमध्ये बसणं नाही. मंत्री बदलतील पण घटनेने मोठी जबाबदारी तुमच्यावरही सोपवली आहे. ती सरकारी अधिकाऱ्यांनी पार पाडली पाहिजे,'' या जबाबदारीची जाणीवही कोर्टाने करुन दिली. ''आम्ही मुंबई पोलीस, ठाणे पोलीस, मग पुणे पोलीस असा कारवाईचा बडगा उगारु मगच पुढचे सगळे कामाला लागतील का? असंही कोर्टाने सरकारला खडसावलं आहे. तुमच्या अधिकाऱ्यांना इथे कोर्टात आणून हजर केलं पाहिजे तेव्हाच ते कामाला लागतील,'' असंही कोर्टाने सुनावलं. ''दरवेळी फक्त कागदावर असलेली यंत्रणेची वर्गवारी सांगता. त्या पलीकडे काहीच करत नाही आणि यावेळी तुम्हाला टास्क फोर्स नावाचा गोंडस शब्द सापडला आहे. या बालमजुरी संदर्भात तर टास्कही आमचेच आहे आणि फोर्सही आमचाच आहे,'' असं हायकोर्टाने सरकारला सुनावलं. ''हा प्रश्न सोडवण्यासाठी संबंधित सगळ्या खात्यांनी एकत्रितपणे विचार करावा आणि त्यातून मार्ग काढावा, असे आदेश कोर्टाने दिले. मुख्य सचिवांनी या प्रकरणात लक्ष घालावं तरच यातून काही मार्ग निघू शकेल,'' असंही कोर्टाने म्हटलं आहे. बालमजुरीतून सुटका केलेल्या मुलांची योग्य ती काळजी घेणं ही राज्य सरकारची जबाबदारी असल्याचंही हायकोर्टाने सांगितलं. येत्या गुरुवारी हायकोर्ट या प्रकरणी निर्देश जारी करण्यात येतील.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Weather Updates: चीनच्या 'डॉल्फिन'ने महाराष्ट्राचा पाऊस रोखला; आता पुन्हा मान्सूनचा जोर वाढणार, नेमकं काय घडलं?
चीनच्या 'डॉल्फिन'ने महाराष्ट्राचा पाऊस रोखला; आता पुन्हा मान्सूनचा जोर वाढणार, नेमकं काय घडलं?
PM Modi and Rohit Pawar: PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
Mumbai Rain news: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi and Rohit Pawar: PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
AR Rahman Son AR Ameen Car Accident: ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; गायकाची पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
Mumbai Rain news: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
Embed widget