एक्स्प्लोर

बेस्टनंतर आता पालिका कर्मचाऱ्यांचा संप?

फेब्रुवारीत पालिका कर्मचाऱ्यांचे मतदान घेण्यात येणार असून कामगारांचा जो कौल असेल त्यानुसार पुढील पावले उचलली जातील, अशी माहिती मिळाली आहे. यामुळे मुंबईकरांना पुन्हा एकदा त्रास सोसावा लागण्याची शक्यता आहे.

मुंबई : बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप नवव्या दिवशी मिटल्यानंतर मुंबईकरांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.  मात्र, येत्या काही दिवसांत मुंबईकरांना आणखी एका संपाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.  मुंबई महापालिकेत गेल्या पाच वर्षांपासून वेतन करार झालेला नाही. या प्रश्नाची तड लावण्यासाठी संप करायचा का? या मुद्द्यावर फेब्रुवारीत कर्मचाऱ्यांचे मतदान घेण्यात येणार आहे. फेब्रुवारीत पालिका कर्मचाऱ्यांचे मतदान घेण्यात येणार असून कामगारांचा जो कौल असेल त्यानुसार पुढील पावले उचलली जातील, अशी माहिती मिळाली आहे. यामुळे मुंबईकरांना पुन्हा एकदा त्रास सोसावा लागण्याची शक्यता आहे. तब्बल 9 दिवसांनंतर बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मिटला तब्बल 9 दिवसांनंतर बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप आज मिटला. संपावर सुनावणी करताना मुंबई हायकोर्टाने तासाभरात कर्मचारी संघटनांना संप मागे घेतल्याची घोषणा करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर बेस्ट कर्मचारी कृती समितीचे अध्यक्ष शशांक राव यांनी वडाळा आगारात कृती समितीचा मेळावा घेत संप मागे घेण्याची घोषणा केली. कामगारांच्या पगारात सात हजार रुपयांची वाढ करण्यात येणार आहे, तसेच ज्युनिअर ग्रेड कर्मचाऱ्यांच्या पगारातही पुढील महिन्यापासून वाढ करण्यात येणार आहे. शिवाय बेस्टच्या कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई होणार नसल्याचं आश्वासनही मिळालं असल्यांचे शशांक राव यांंनी सांगितलं. दरम्यान 9 दिवसांनी संप मागे घेतल्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. बेस्ट कामगार कृती समितीने 'या' निकषांवर संप मागे घेतला.
  •  कामगारांच्या मागण्याबाबत मध्यस्थाची नेमणूक - माजी मुख्य न्यायाधीश (अलाहाबाद उच्च न्यायालय) एफ. आय. रिबेलो यांची बेस्ट कामगार कृती समिती आणि बेस्ट प्रशासन यांच्यातील मध्यस्थी
  • कनिष्ठ श्रेणी कर्मचाऱ्यांवर रोल बँक ग्रेडमुळे अन्याय झाला हे मान्य करण्यात आलं असून कनिष्ट श्रेणी कर्मचाऱ्यांना वेतनाचे 20 टप्पे वाढवले जावेत हे सत्र न्यायालयाने मान्य केलं आहे.  मात्र, सध्या 10 टप्पे वाढीची 1 जाने 2019 पासून अंमलबजावणी
  •  उर्वरीत 10 टप्पे लागू करण्यासाठी मध्यस्थ माजी न्यायमूर्ती रिबेलो यांच्या मार्फत एक महिन्यात निर्णय घेण्यात येईल
  • बेस्ट कामगारांच्या मागणीपत्रावर मध्यस्थांचा अहवाल तीन महिन्यात उच्च न्यायालयात सादर करण्यात येणार आहे
  • बेस्ट अर्थसंकल्प हा महापालिका अर्थसंकल्पात विलिनीकरणाच्या मुद्द्यावर तीन महिन्यात मध्यस्थ उच्च न्यायालयाला अहवाल सादर करणार आहेत
  • प्रलंबित वेतनकराराबाबत मध्यस्थ उच्च न्यायालयाकडे शिफारसी करतील
  • बेस्टच्या आर्थिक सुधारणांबाबत बेस्ट संघटना आणि बेस्ट प्रशासनाच्या बाजू ऐकूण घेतल्या जातील
  • बेस्टवरची खाजगीकर‌णाची टांगती तलवार सध्या तरी टळली
  • मध्यस्थांच्या नेमणुकांमुळे बेस्ट प्रश्नाबाबतचा राजकीय हस्तक्षेप कायमचा दूर झाला
संबंधित बातम्या बेस्टचा संप अखेर मागे, शशांक राव यांची घोषणा, कामगारांच्या पगारात 7 हजार रुपयांची वाढ टीएमटी,केडीएमटी,पीएमटी सुरळीत, मग बेस्टचं काय चुकतंय? बेस्ट संप : आठवडाभरात काय काय झालं? बेस्ट संप : जनतेला वेठीस धरणं चुकीचं, हायकोर्टाने खडसावलं बेस्ट संपात मनसेची उडी, कोस्टल रोड आणि मेट्रो 3 विरोधात आंदोलन बेस्टला वाली कोण? महापालिका, सरकार जबाबदारी घेईना!

महत्त्वाच्या बातम्या

बारामतीत भीषण अपघात! भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक, एका भावाचा जागीच मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी
बारामतीत भीषण अपघात! भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक, एका भावाचा जागीच मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता टोलकरी गडकरींचा राजीनामा झाला पाहिजे, हर्षवर्धन सपकाळांची मागणी 
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता टोलकरी गडकरींचा राजीनामा झाला पाहिजे, हर्षवर्धन सपकाळांची मागणी 
Eknath Shinde : मोदींनी विद्यार्थ्यांच्या भावनांना प्राधान्य दिले, त्यांचे आभार मानतो; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर एकनाथ शिंदे काय म्हणाले?
मोदींनी विद्यार्थ्यांच्या भावनांना प्राधान्य दिले, त्यांचे आभार मानतो; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर एकनाथ शिंदे काय म्हणाले?
Gunaratna Sadavarte on Mumbai Tiranga Rally: ठाकरे दोन लेकरांचे प्रमोशन करण्यासाठी आले, घोषणा देण्यास रोजाने माणसं लावली; तिरंगा रॅलीवर गुणरत्न सदावर्तेंची घणाघाती टीका
ठाकरे दोन लेकरांचे प्रमोशन करण्यासाठी आले, घोषणा देण्यास रोजाने माणसं लावली; तिरंगा रॅलीवर गुणरत्न सदावर्तेंची घणाघाती टीका

व्हिडीओ

Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report
Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Zimbabwe vs India, 3rd T20I: वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
Revanth Reddy on Election Age: देशातील जेन झीने दिल्ली अन् मोदी सरकार हादरवून सोडताच तेलंगणा सरकारच्या निर्णयाची भलतीच चर्चा! मोदी सरकार मान्यता देणार?
देशातील जेन झीने दिल्ली अन् मोदी सरकार हादरवून सोडताच तेलंगणा सरकारच्या निर्णयाची भलतीच चर्चा! मोदी सरकार मान्यता देणार?
भाजप खासदाराच्या लेकीचा धर्मेंद्र प्रधानांविरोधात एल्गार! म्हणाली, ती पोस्ट अजिबात डिलीट करणार नाही, दुसरीकडे चक्क भाजप मंत्र्याच्या लेकीची सुद्धा मोदींविरोधोत घोषणाबाजी!
भाजप खासदाराच्या लेकीचा धर्मेंद्र प्रधानांविरोधात एल्गार! म्हणाली, ती पोस्ट अजिबात डिलीट करणार नाही, दुसरीकडे चक्क भाजप मंत्र्याच्या लेकीची सुद्धा मोदींविरोधोत घोषणाबाजी!
Siddaramaiah: 'प्रामाणिक राजकारणाला जागा राहिलेली नाही!..' कर्नाटकात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर दोन महिन्यातच सिद्धरामय्यांनी केलेल्या घोषणेनं राजकीय भूवया उंचावल्या
'प्रामाणिक राजकारणाला जागा राहिलेली नाही!..' कर्नाटकात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर दोन महिन्यातच सिद्धरामय्यांनी केलेल्या घोषणेनं राजकीय भूवया उंचावल्या
Zimbabwe vs India, 3rd T20I: टीम इंडियात आज चार बदल होणार? झिम्बाब्वेला क्लीन स्वीप देण्याच्या प्रयत्न
टीम इंडियात आज चार बदल होणार? झिम्बाब्वेला क्लीन स्वीप देण्याच्या प्रयत्न
‘धन्यवाद मोदीजी’ या कार्यक्रमातून विद्यार्थी, युवकांसाठी मोदीजींनी घेतलेला प्रत्येक ऐतिहासिक निर्णय जनतेपर्यंत पोहोचविणार : मंगलप्रभात लोढा
‘धन्यवाद मोदीजी’ या कार्यक्रमातून विद्यार्थी, युवकांसाठी मोदीजींनी घेतलेला प्रत्येक ऐतिहासिक निर्णय जनतेपर्यंत पोहोचविणार : मंगलप्रभात लोढा
Paper Leak: पेपर लीकविरोधात नवीन विधेयक उद्या येणार? चौकशीसाठी 2 महिने, 10 वर्षांचा तुरुंगवास अन् 50 लाख दंड
पेपर लीकविरोधात नवीन विधेयक उद्या येणार? चौकशीसाठी 2 महिने, 10 वर्षांचा तुरुंगवास अन् 50 लाख दंड
गेल्या 12 वर्षांत 116 पेपरफुटी, 7.5 कोटी मुलांच्या भविष्याच्या अन् स्वप्नाच्या चिंधड्या; तब्बल 19 राज्यात पेपर माफियांचा हैदोस, नीटमुळे अनेक वर्षांपासून दबलेल्या संतापाचा उद्रेक
गेल्या 12 वर्षांत 116 पेपरफुटी, 7.5 कोटी मुलांच्या भविष्याच्या अन् स्वप्नाच्या चिंधड्या; तब्बल 19 राज्यात पेपर माफियांचा हैदोस, नीटमुळे अनेक वर्षांपासून दबलेल्या संतापाचा उद्रेक
Embed widget